चंद्रपूर, दि.18 नोव्हेंबर- चंद्रपूर जिल्ह्याच्या विविधांगी विकासासाठी जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीत असणाऱ्या सर्वसाधारण योजना तसेच विशेष घटक योजना याचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात घेण्यात आला
आमदार ॲड.संजय धोटे यांनी या बैठकीची अध्यक्षता केली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, चंद्रपूर आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी तथा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, चिमूरचे प्रकल्प अधिकारी केशव बावनकर, जिल्हा नियोजन अधिकारी जी.आर.वायाळ, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद कुलकर्णी आदींची या बैठकीला उपस्थिती होती. या बैठकीमध्ये गेल्या वर्षभरात करण्यात आलेल्या ऑक्टोबर अखेरच्या खर्चाबाबतही आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला. जिल्हयासमोर आवश्यक व प्राधान्याची कामे आहेत. ती कामे तातडीने या योजनेमधून पार पाडण्यात यावी, असा आदेश आमदार ॲड.संजय धोटे यांनी दिला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी श्री.वायाळ यांनी विविध विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. रक्कमेचा योग्य व आवश्यक ठिकाणी खर्च करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी डॉ.खेमणार यांनी केल्या.
No comments:
Post a Comment