चंद्रपूर जिल्ह्यातील पंच-सरपंच मेळाव्याला मार्गदर्शन
चंद्रपूर दि 30 नोव्हेंबर :- गायत्री परिवाराने महाराष्ट्रमध्ये वृक्ष लागवड मोहीमेत यापूर्वीही मोठे योगदान दिले आहे. यापुढेही गायत्री परिवाराचे वृक्ष लागवडीच्या कामांमध्ये वनविभागामार्फत सहकार्य घेतले जाईल. त्यासाठी लवकरच परस्पर सामंजस्य करार करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केली. चंद्रपूर जिल्ह्यातील पंच-सरपंच मेळाव्याचे गायत्री परिवाराने आयोजन केले होते. या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते.
हरिद्वार येथील शांती कुंज गायत्री परिवार मार्फत चंद्रपूर मध्ये दाताळा रोड येथे जिल्ह्यातील पंच- सरपंच व युवा संगोष्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, गायत्री परिवाराचे हरिद्वार येथील योगेंद्र गिरी, योगीराज बल्की, सुनील शर्मा, भास्कर पेरे पाटील,पर्यावरण तज्ञ सुरेश राठी, मनपाचे स्थायी समिती सभापती राहुल पावडे, नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, नामदेव डाहुले आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पंच आणि सरपंच यांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संबोधित केले. ते म्हणाले, देशाला बळकट करण्यासाठी प्रत्येक गावाचे दायित्व असले पाहिजे. प्रत्येकाला आपल्या देशात रामराज्य आले पाहिजे असे वाटते. मात्र यासाठी प्रत्येक गावाने नव्हे, तर प्रत्येक गावातील, प्रत्येक व्यक्तीने आपले दायित्व देणे महत्त्वाचे आहे. मानवाच्या जन्मात आल्यानंतर त्याचे जगणे त्यागी वृत्तीचे असले पाहिजे. हा देश त्यागाची भूमी म्हणून ओळखली जाते. स्वतःसाठी न जगता इतरांसाठी जगण्याची जी संकल्पना गायत्री परिवाराने समाजात रुजविली आहे, त्या संकल्पनेचा त्यांनी यावेळी गौरव केला.
000
No comments:
Post a Comment