Search This Blog

Sunday 18 November 2018

चिचपल्ली येथील बांबू हस्तकलेने प्रेरित होवून विदेशी चंद्रपूरात अवतरले


चंद्रपूर दि. 17 नोव्हेंबर : राज्याचे वित्त, नियोजन व वन मंत्री ना.सुधीर मुनगंटींवार यांनी आपल्या कल्पनेतील इच्छेला मूर्त रूप देण्यासाठी चंद्रपूर जिल्हयातील चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यासाठी नेटाने प्रयत्न केले. त्याची फलश्रुती म्हणून, बांबू धोरणाची  व्यापक अंमलबजावणी करण्यासाठी शास्त्रोक्त पध्दतीने नैसर्गिक व खासगी क्षेत्रात बांबू लागवड व योग्य व्यवस्थापन करण्यासाठी चंद्रपूर जिल्यातील चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून दिनांक 4 डिसेंबर 2014 अन्वये बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना चिचपल्ली येथे करण्यात आली.  
            चिचपल्ली येथे बांधण्यात येत असलेल्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची इमारत ही जागतिक दर्जाची असून बांबू व मातीपासून बनविली जाणारी आशिया खंडातील एक आगळीवेगळी अशी भव्य दिव्य पर्यावरणपूरक वास्तू प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचा सिंगापूर येथील (Future Arc)  या मॅग्झीनमध्ये विशेष उल्लेख केल्याची माहिती वाचून आणि त्याच्यात असलेली कल्पकता व कलावंत जागा होवून त्यांनी बांबू केंद्राची भेट घेण्याचे ठरविले.
             अशाच दर्जेदार बांबू हस्तकलेबद्दल ऐकून व प्रेरित होवून मूळचे मोझाम्बिंक या देशाचे असलेले मिशेल ओलोफ्सन हे एक आर्किटेक असून प्रोजेक्ट विटा या संस्थचे ते संस्थापक आहेत. त्यांची संस्था स्वीडन व मोझाम्बिंक या देशात कार्यरत आहे. मिशेल ओलोफ्सन सोबत ऐश्वर्या  शेंद्रे व त्याचे सहकारी व्यंकट हे दोघेही भारतीय आर्किटेक असून प्रोजेक्ट विटा या संस्थेचाच एक भाग म्हणून ते दोघेही त्यांचासोबत आले होते. त्यांना सुध्दा बांधकामाच्या कलेमध्ये आवड व छंद असल्याने बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली, स्थित चंद्रपूर येथे चालू असलेल्या दर्जेदार बांबू कामाची दखल घेवून प्रस्तुत केंद्रास सप्टेंबर महिन्यात भेट देवून कामाची जातीने पाहाणी केली व बांबू पासून तयार होत असलेल्या वस्तूंची  मुक्तकंठाने प्रशंसा केली. सदरची वास्तू पाहून ते इतके प्रभावित झाले की त्यांनी चालू वास्तूकलेच्या कामाचे चित्रीकरण करून घेतले.  त्यानंतर वन अकादमी परिसरात असलेल्या बांबू कार्यशाळेला भेट देवून बांबूपासून तयार करण्यात येणाऱ्या कलात्मक वस्तूचे निरीक्षण केले. या ठिकाणी तयार झालेल्या नावाच्या पाट्या, राष्ट्रीय झेंडे, बांबूची सायकल, रोजनिशी, सोफासेट, मोमेंटो इत्यादी वस्तूची पाहणी करून चित्रीकरण केले व बांबू कारागीरांशी  व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत सुरू असलेल्या वेगवेगळया कोर्सेसची व योजनांची विस्तृत माहिती त्यांना देण्यात आली.

  श्री. मिशेल ओलोफ्सनमोझांबिक व कु. ऐश्वर्या शेंद्रेश्री. व्यंकट या भारतीयांनी बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्लीस्थित-चंद्रपूर चे संचालक श्री. राहुल पाटीलभा.व.से. यांना त्यांचे कार्यालयात भेटून वेगवेगळ्या कोर्सेस बद्दल प्राथमिक चर्चा केली. त्यानंतर येथे चालू असलेल्या दर्जेदार कामाने प्रेरित होवून त्यांनी स्वीडन देशातील विद्यार्थी हे बांबू प्रशिक्षणासाठी भारतात शिकायला येवू शकतात किंवा या संस्थेतले बांबू ट्रेनर त्यांचे देशात जावून त्या ठिकाणी बांबूचे प्रशिक्षण देवू शकतात. या शक्यतांबाबत चर्चा करण्यात आली.    
बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रचिचपल्ली च्या माध्यमातून गरजूबांबूकामाची आवड असलेल्या बुरड व इतर समाजातील युवक/युवतींना बांबू वस्तू तयार करण्याचे 70 दिवसीय प्रशिक्षण देवून स्वयंरोजगाराची निर्मिती केली जाते. तसेच या केंद्रातर्फे 2 वर्षे कालावधीचे बांबू तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम सन 2017-18 या वर्षापासून सुरु करण्यात आलेला आहे. आधार योजनेंतर्गत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील दुर्गम ग्रामीण भागात आदिवासी युवक/युवतीसाठी बांबू वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देवून स्वयंरोजगाराची संधी निर्माण करण्यात येत आहे. तसेच संजीवन योजनेंतर्गत बचत गटांतील महिलांना प्रशिक्षणाद्वारे स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करून आत्मनिर्भर करणे. महिलांसाठी Bamboo Handicraft & Art Unit  (B.H.A.U.) या संकल्पनेअंतर्गत चंद्रपूरविसापूर येथे सामुहिक उपयोगिता केंद्राची सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती त्यांना देण्यात आली.
                                                            0000

No comments:

Post a Comment