चंद्रपूर, दि.18 नोव्हेंबर- शालेय विद्यार्थ्याचे रस्ता सुरक्षा विषयक प्रबोधन होण्याच्या दृष्टीने संपूर्ण राज्यात रस्ता सुरक्षा महावॉकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे चंद्रपूर येथे सुध्दा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे आज सकाळी 8 वाजता महावॉकेथान स्पर्धा वाहतुक नियंत्रण शाखा चंद्रपूर येथून ताडोबा रोड या मार्गावर दोन कि.मी.पर्यंतची काढण्यात आली होती. यामध्ये अतिरीक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व्ही.एन.शिंदे, वाहतुक पोलीस निरीक्षक श्री.चव्हाण, कार्यकारी अभियंता मनोज जुनोनकर, श्री.जाधव, चांदा पब्लीक स्कुलच्या संचालिका श्रीमती जिवतोडे, विद्यार्थी, वाहतुक शाखेचे अधिकारी, कर्मचा-यांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने या रॅलीमध्ये भाग घेतला होता.
No comments:
Post a Comment