जिल्हातील सर्व यंत्रणा सज्ज 27 नोव्हेंबर पासुन प्रत्यक्ष लसीकरण
चंद्रपूर, दि.22 नोव्हेंबर- चंद्रपूर जिल्हयातील गोवर रुबेला लसीकरणाच्या 100 टक्के अमंलबजावनीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. या मोहिमेचा शुभारंभ 27 नोव्हेंबर पासून संपूर्ण चंद्रपूर जिल्हयात करण्यात येणार आहे. यामध्ये 100 टक्के शाळा, पालक व वैदयकिय व्यवसायिकांनी सहभागी होणार असून जिल्हयातील 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील मुले-मुंली गोवर, रुबेला लसीकरणापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही डॉ.कुणाल खेमनार यांनी प्रत्रकार परिषदेत दिली.
यावेळी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, मनपाचे अतिरीक्त आयुक्त भालचंद्र बेहेरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश साठे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.संदिप गेडाम, आयएमएचे अध्यक्ष डॉ.प्रमोद राऊत, डॉ.एम.जे.खान, डॉ.मंगेल गुलवाडे, नागपूरचे एसएमओ डॉ.श्रीधर, शैलेश बागला आदी उपस्थित होते.
भारत सरकारने सन 2020 सालापर्यंत गोवर या आजाराचे निर्मूलन व रुबेला या आजाराचे नियंत्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार 27 नोव्हेंबर 2018 पासून महाराष्ट्रात गोवर रुबेला लसीकरण मोहिम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमे अंतर्गत 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील सर्व मुलां-मुलींना लसीकरण करण्याचे लक्ष निर्धारीत केले आहे. सदर मोहिम 5 आठवडयाच्या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. यात जिल्हातील सर्व शाळा, सरकारी, निमसरकारी, खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित, आश्रम शाळा, मदरसे, सिबीएससी, आयसीएससी, केंद्रीय विदयालय इत्यादी शाळामध्ये पहिल्या दोन ते तिन आठवडयात व त्यानंतर अंगणवाडी केंद्र व सर्व सरकारी आरोग्य संस्थेत मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. अशा प्रकारे 5 आठवडे सदर मोहिम जिल्हयात राबविण्यात येणार आहे. सदर मोहिम आरोग्य विभागासोबतच, शिक्षण विभाग, एकात्मिक बालविकास विभाग यांचे समन्वयाने राबविण्यात येत आहे. याकरीता लायन्स क्लब, रोटरी क्लब, आयएएम, आयएपी, निमा, युनानी या संस्थांचे सहकार्य लाभत आहे.
चंद्रपूर जिल्हयाची शहरी व ग्रामिण क्षेत्र मिळुण एकूण लोकसंख्या 22,31,090 आहे. सदर लसीकरण मोहिमेअंतर्गत 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील ग्रामीण/अर्बन भागातील 4,43, 582 व कार्पोरेशन भागातील 83,870 असे एकूण 5,27,452 मुलां-मुलींना 3244 शाळेच्या माध्यमातून तर 2306 अंगणवाडी/बाहयसत्रअंतर्गत मिळून असे एकूण 5550 सत्राचे नियोजित करुन लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून या मोहिमेत 100 टक्के लसीकरणाचे करण्याचे निर्धारीत केले आहे.
या लसीकरण मोहिमेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांना गोवर-रुबेला या दोन्ही आजाराचे नियंत्रणाकरीता एक इंजेक्शन व्दारे लसीकरण केले जाणार आहे. गोवर हा अत्यंत संक्रामक आजार आणि घातक आजार आहे. हा मुख्यता लहान मुलांना होतो असून या आजारानंतर होणा़-या गुंतागुंतीमुळे बालकाचा मृत्यू होउ शकतो. तसेच रुबेला हा सौम्य संक्रामक आजार असला तरी गर्भवती स्त्रियांना रुबेला आजाराचा संसर्ग झाल्यानंतर अचानक गर्भपात किंवा नवीन जन्म झालेल्या बाळास जन्मजात दोष अंधत्व, बहिरेपणा, मतीमंदत्व, हृदय विकृती होवू शकते. या करीता गोवर-रुबेला आजारापासून संरक्षणाकरीता सर्व मुलां, मुलींना लसीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. या पासुन कोणताही धोका नाही.
गोवर रुबेला मोहिम ( पार्श्वभू मी )
लहान वयाच्या मुलांच्या मृत्यूसा ठी गोवर हा आजार एक प्रमुख कारण आहे गोवर या आजाराची बाजारामध् ये किफायतशीर सुरक्षित लस उपलब् ध असली तरी लहानवयाच्या मुलां मध्ये या आजारामुळे मृत्यूमूखी पडण्याचे प्रमाण खुप मोठे आहे.
सन 2015 मध्ये जगभरात जवळपास 1. 35 लक्ष मृत्यू हे केवळ गोवर या आजारामुळे झाली आहेत म्हणजे दर रोज 367 मृत्यू किंवा दर तासाला 15 मृत्यूजगभरात होत आहेत.
गोवर लसीकरणामुळे सन 2000 ते 20 15 या कालावधीमध्ये जगभरात गोवर या आजारामुळे मृत्यूमूखी पडण् याचे प्रमाण 79 टक्के पर्यंत कमी झाले आहे सन 2016च्या जागतिक आ कडेवारीनुसार गोवर आजारामुळे हो णा-या मृत्यूपैकी अंदाजे 37 टक् के मृत्यू हे भारतामध्ये झाले आ हेत.
गोवरच्या लसीकरणामुळे सन 2000 पा सून सन 2015 पर्यंत सुमारे 2 करो ड गोवर मुळे होणा-या मृत्यूंना प्रतिबंध लागला.
रुबेला हा एक संक्रामक, सामान् यता सौम्य व्हायरल संसर्ग असून तो मुख्यता मुले आणि तरुण पिढी मध्ये होतो.
गर्भवती स्त्रीयामध्ये रुबेला या आजाराच्या संसर्गामुळे गर्भाचा मत्यु किंवा जन्मता दोष, (जसे अंधत्व, बहिरेपणा आणि ह् रदय विकृती ) होऊ शकते हे बा लकजन्मजात रुबेला सिन्डोम (सि आरएस) म्हणून ओळखले जाते.
जगभरात, दरवर्षी एक लाखापेक्षा जास्त बालकांचा सिआरएस सह जन्म होतो रुबेला साठी विशिष्ट उपचार उपलब्ध नाही परंतु हा रोग लसी करणाने प्रतिबंधित करता येतोदर वर्षी अंदाजे 40 ते 50 हजार जन् मजात रुबेला सिन्डोम (सिआरएस) के सेस भारतामध्ये होतात.मोहिमेसाठी लक्ष्य करण्यात आले ला वयोगट 9 महिने ते 15 वर्षापर् यंतची मुले मुली. फक्त एकदा मोहिमेमध्ये लसीकरण क रुन गोवर आणि रुबेला या दोन आजा रापासून आपल्या बालकांना सुरक् षित करु शकता (जरी यापुर्वी दे खील आपण आपल्या बालकासगोवर रुबे ला चे लसीकरण केले असेल तरी मोहिमेमध्ये लसी करण करणे अनिवार्य आहे.
भारतामध्ये गोवररुबेला लसीकरणा ची सुरुवात फेब्रुवारी 2017 पा सून सुरु करण्यात आली आहे या मो हिमेअंतर्गत 30 मे 2018 पर्यंत एकूण 19 राज्य केंद्र शासितप् रदेशामध्ये मोहिम यशस्वीरित्या राबविण्यात आली आहे व यामध्ये ज वळपास 9 कोटीहून अधिक बालकांचे यशस्वीरित्या लसीकरण करण्यात आले महाराष्ट राज्यात हीमोहिम 27 नो व्हेंबर 2018 पासून सुरु होणार आहे.लसीकरण 9 महिने ते 15 वर्षा खालील पात्र लाभार्थ्यांचे 100 टक्के लसीकरण करण्याचे उदिदष्ट आहे.
No comments:
Post a Comment