Search This Blog

Thursday, 1 November 2018

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील कृषी पंपांना दिवसा थ्री फेज वीज पुरवठा देण्याचे निर्देश पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश

चंद्रपूर दिनांक 31 ऑक्टोबर: चंद्रपूर ,गडचिरोली जिल्ह्यातील जंगलग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात जंगली जनावरांचे अस्तित्व असल्याने रात्रीच्या वेळी शेतामध्ये ओलीत करण्यासाठी शेतकऱ्यांना धोका पत्करावा लागतो.त्यामुळे या दोन जिल्ह्यांमध्ये दिवसा थ्री फेज वीजपुरवठा कृषिपंपांना देण्याची मागणी राज्याचे वित्त,नियोजन व वने मंत्री तथा पालकमंत्री  ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. त्यांच्या मागणीला  प्रतिसाद देत ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची मागणी मान्य केली आहे. या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा फार मोठा दिलासा आहे.
              राज्यातील विजेची वाढती मागणी बघता अनेक ठिकाणी कृषिपंपांना रात्रीच्या वेळी वीज पुरवठा केला जात आहे. योग्य प्रमाणात भारनियमन व्हावे यासाठी ही उपाययोजना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने केली आहे.
        तथापिया संदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील विपरीत परिस्थिती लक्षात आणून दिल्यामुळे चंद्रपूर गडचिरोली व यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा व राळेगाव या विभागांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये दिवसा वीज पुरवठा सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे याबाबतचे अधिकृत पत्र देण्यात आले. त्यामुळे या दोन्ही  जिल्ह्यातील  शेतकऱ्यांना  मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
  पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात मागणी केली होती. चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा हा  जंगलव्याप्त जिल्हा आहे व या भागात रात्रीच्या वेळी नरभक्षक जंगली प्राण्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवितास धोका संभवू शकतो. त्यामुळे दिवसा थ्री फेज वीज पुरवठा करण्याबाबत विनंती करण्यात आली होती. पालकमंत्र्यांच्या या विनंतीला प्रतिसाद देण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा व राळेगाव या भागांमध्ये देखील जंगली प्राण्यामुळे शेतकरी चिंतित होते. या दोन भागांना देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
0000000

No comments:

Post a Comment