Search This Blog

Thursday 19 September 2019

कृषी ग्रंथालयातून घडेल हरीत क्रांती : भोंगळे


ग्रामपंचायतींत कृषी ग्रंथालये
नाविण्यपूर्ण योजनेचा थाटात शुभारंभ
चंद्रपूर, दि. 17 सप्टेंबरजिल्ह्यातील नागरिकांची उपजिविका साधरणातः शेतीवर अवलंबून आहे. या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना कृषी विषयक नवतंत्रज्ञान उपलब्ध व्हावेहा दृष्टीकोन उराशी बाळगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील संपूर्ण ग्राम पातळीवर कृषी ग्रंथालयांची निर्मिती केली जात आहे. या ग्रंथालयांची कल्पना स्थानिक ग्राम पंचायतींनी शेतकर्‍यांना द्यावी. एक नव्हे तर तब्बल 227 पुस्तकांतील वेगवेगळे कृषीविषयक ज्ञान शेतकर्‍यांना मिळेल. ही ग्रंथालये शेतकर्‍यांची आर्थिक प्रगती साधणारी ठरावीत. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकर्‍यांची प्रगती झाली. तर देशाची प्रगती निश्‍चित होईल. शेतकर्‍यांनी या माध्यमातून हरीतक्रांती घडवावीअसे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने जिल्हा वार्षिक योजनेतून कृषी ग्रंथालय निर्मितीचा शुभारंभ 17 सप्टेंबर 2019 रोजी जिल्हा परिषदेच्या मा. सा. कन्नमवार सभागृहात झाला. त्यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला कृषी व पशुसंवर्धन सभापती अर्चना जिवतोडेमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिलेजिल्हा कृषी अधिक्षक डॉ. उदय पाटीलअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी काळभोरकृषी विकास अधिकारी शंकर किरवे आदींची उपस्थिती होती.
राहुल  कर्डिले यांनी वाचनामुळे ज्ञान वाढते.कृषी ग्रंथालयातील पुस्तके हे एक शस्त्र आहे. या शस्त्राच्या माध्यमातून शेतकर्‍यांनी निश्‍चित केलेले ध्येय गाठावेअसे आवाहन त्यांनी केले. डॉ. उदय पाटील यांनी शेतीविषयक संदेश दिला. उपस्थितांनी यावेळी मार्गदर्शन केले.
शेतकर्‍यांना शेतीविषयक नवतंत्रज्ञानाची माहिती मिळावीत्यांच्या उत्पन्नात भरभराटी यावीयासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. आता शेतकर्‍यांना त्यांच्या गावातच कृषी विषयक ज्ञानाच्या माहितीचा खजीना मिळणार आहे. जिल्ह्यातील तब्बल 800 ग्राम पंचायतींमध्ये कृषी ग्रंथालयाची निर्मिती केली जाणार आहे. प्रत्येकी ग्राम पंचायत स्तरावर दोन आलमारी देण्यात आली असूनत्यात हळद लागवडकापूस लागवडकिडरोग नियंत्रणसेंद्रीय शेतीविषमुक्त शेतीशेतीपुरक पक्षी यासह 227 पुस्तकांचा भांडार उपलब्ध राहणार आहे. या योजनेसाठी 3 कोटी 20 लाखाचा निधी खर्च केला जाणार आहे. याप्रसंगी कृषी विषयक पुस्तकांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तर 10 ग्राम पंचायतींना पुस्तकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर किरवे यांनी केले. संचालन व आभार जिल्हा कृषी अधिकारी लक्ष्मीनारायण दोडके यांनी मानले.
00000

महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार : ना. मुनगंटीवार



v मूल येथे सामाजिक सभागृह उभारणार
v महात्मा ज्योतीबा फुले चौकाचे सौंदर्यीकरण करणार
v परिसरात बॅरेजची श्रृंखला निर्माण करणार
v मुलच्या कृषी विद्यापीठाला मत्स्यदुग्ध व्यवसायाची जोड देणार
चंद्रपूर दि. 15 सप्टेंबर : पुणे विद्यापीठाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा नामविस्तार करण्यासाठी जी सांसदीय लढाई मी लढली. त्याच पद्धतीने राज्यकेंद्र ज्या ज्या व्यासपिठावर शक्य आहे त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळावेयासाठी प्रयत्न करेलअसे प्रतिपादन राज्याचे वित्तनियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीर मुनगंटवार यांनी मूल येथील मेळाव्यामध्ये दिले.
मूल येथे आयोजित एका सामाजिक मेळाव्यामध्ये आज ते संबोधित करीत होते. यावेळी त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुस्तिकेचे देखील विमोचन केले.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वारसांना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून देणेस्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणेपुणे विद्यापीठाला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठ हे नाव देण्यासाठी केलेले प्रयत्नया लढया संदर्भातील त्यांच्या विधिमंडळातील कामकाजावर आधारित पुस्तकाचे देखील आज प्रकाशन झाले. माळी समाज बांधवांच्या भव्य मेळाव्याला ते संबोधित करीत होते.
महाराष्ट्रातील थोर पुरुषांच्या महात्म्याला जनतेपुढे आणण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी विरोधी पक्षात असताना पासूनचा आपला संघर्ष देखील कायम आहे. विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे विद्यापीठाचा नामविस्तार करताना आपली भूमिका निश्चित होती. ज्या भूमिकेतून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सर्व समाजाच्या लोकांना शिक्षित करण्यासाठी संघर्ष केला. त्यांचे अंतिम ध्येय लक्षात घेऊन समाजाने विचार करावा. सब जाती समान हैया मानवतेच्या मंत्राला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी त्या काळात बळ दिले आहे. त्यामुळे क्रांतीज्योती सावित्रीबाईचा वारसा प्रत्येक मुलींनी चालवावाअसे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
ज्या महामानवाने शिक्षणाचा मंत्र आमच्या हाती दिला. मजबूत समाजव्यवस्था घडविण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता समाजाला पटवून दिली. त्यांच्या वंशजाला न्याय देणे हे माझे कर्तव्य होते. त्यासाठी आपण प्रयत्न केला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले .
   यासोबतच त्यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न या उपाधीने सन्मानित करण्यासाठी आपले प्रयत्न आणखीन वाढविण्यात येईलअसे स्पष्ट केले.
आज पर्यंत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संदर्भात उचललेल्या प्रत्येक विधायक कार्याला आपल्याला यश आले असून राज्य व केंद्र शासन स्तरावर हा प्रश्न निकाली लावू असे आश्वस्त उद्गार त्यांनी यावेळी काढले.
मूल याठिकाणी माळी समाजाचे सभागृह निर्माण करण्याबाबत मागणी या मेळाव्यात करण्यात आली होती. त्याला देखील त्यांनी यावेळी मंजुरी दिली. महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव देण्यात आलेल्या मुल येथील चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
गेल्या पाच वर्षात या परिसरात केलेल्या विकासकामांचा आढावा त्यांनी सादर केला. ते म्हणाले कीहा जिल्हा महाराष्ट्रातला सर्वाधिक पाणीदार जिल्हा बनावा यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी सोयी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपण प्रयत्नशील असून बॅरेजची श्रृंखला निर्माण केली जाईल. पाटाच्या पाण्याद्वारे बंधन नलिकेद्वारेजिथे शक्य असेल तिथे विहिरीतून पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. मात्र प्रत्येक शेताला जिल्ह्यामध्ये पाणी मिळावे यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातला सर्वाधिक पाणीदार जिल्हा म्हणून चंद्रपूर लवकरच नावलौकिकास येईलअसेही त्यांनी यावेळी आत्मविश्वासाने सांगितले.
महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांची शिक्षणासाठी आपले आयुष्य वेचले. या परिसरात दर्जेदार शिक्षण मिळावेयासाठी आपले प्रयत्न सुरू असून शून्य ते सहा वयोगटातील मुलांना आपला अधिकांश वेळा ज्या ठिकाणी काढावा लागतोअशा अंगणवाडी दर्जेदार करण्याकडे आपले लक्ष अधिक आहे. जिल्ह्यातील 403 अंगणवाड्या आयएससो करण्यात आलेल्या आहे. बल्लारपूर येथे नुकतेच मुलींच्या डीजीटल शाळेचे भूमिपूजन करण्यात आले आहे. महिला बचत गटांच्या चळवळीला जिल्ह्यामध्ये बळकट करण्यात येत असून संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुषमा स्वराज महिला उद्योग केंद्रांच्या माध्यमातून आर्थिक बळकटीकरण प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील प्रत्येक गरिबाला कोणत्याही कार्डधारकाला दोन ते तीन रुपये दराने अन्नधान्य मिळेल व कोणत्याही जाती-जमातीचा भेदभाव न करता सर्वांना गॅस कनेक्शन मिळेलअसे त्यांनी स्पष्ट केले.           
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी घरे ही कल्पना राबविली असून या परिसरातील प्रत्येक बेघर माणसाला वेगवेगळ्या योजनांमधून सबसिडी देत त्यांचे हक्काचे घर निर्माण होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. निराधारांना आधार देण्यासाठी संजय गांधी निराधार योजनेसह वेगवेगळ्या योजनांमधील निधीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचा निर्णय आपण घेतला असून या मतदारसंघातील कोणत्याही गरिबाला रोजच्या जेवणाचीस्वतःच्या हक्काची घराची चिंता पुढील काळात राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला जिल्ह्यातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. व्यासपीठावर ओबीसी महामंडळाचे उपाध्यक्ष अविनाश ठाकरेराजेंद्र गांधीअरुण तिखेनिलेश खरबडेरामभाऊ महाडोळेविजय राऊतवासुदेव लोन बळे,संजय घाटे,समीर केने,वंदनाताई तिखेवर्षाताई लोणबळेशीतल गुरनुलेवासुदेव लोणबळे आदींची उपस्थिती होती.
     प्रास्ताविक संध्याताई गुरनुले यांनी केले तर यावेळी ओबीसी महामंडळाचे उपाध्यक्ष अविनाश ठाकरे रामभाऊ महाडोळे यांनी देखील संबोधित केले. कार्यक्रमाचे संचालन प्रवीण मोहुर्ले आणि आभार गुरुदास गुरनुले यांनी केले.
000000

आवश्यक सुविधांनी परिपूर्ण अशा स्वयंपूर्ण महानगराकडे चंद्रपूरची वाटचाल : ना. सुधीर मुनगंटीवार



दीक्षाभूमी जवळ कोट्यवधीच्या विकासकामांच्या
भूमिपूजन कार्यक्रम संपन्न
चंद्रपूर दि 15 सप्टेंबर : शिक्षण ,आरोग्यपेयजल व सांडपाण्याची उत्तम व्यवस्था असणाऱ्या आवश्यक सेवांनी परिपूर्ण अशा एका स्वयंपूर्ण महानगराकडे चंद्रपूर शहराची वाटचाल होत आहे. आगामी काळात यामध्ये उत्तरोत्तर भर पडेलअसे सूतोवाच राज्याचे वित्तनियोजन व वन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.
रामनगर परिसरातील दीक्षाभूमी येथे कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन करताना ते बोलत होते. आमदार नानाभाऊ शामकुळे  यांच्या नेतृत्वात शहरातील विकासाला नवी दिशा दिली जात आहे. देशाचे लक्ष वेधून घेणारे अनेक प्रकल्प चंद्रपूर मध्ये उभे राहत आहेत. आगामी काळात चंद्रपूर हे महानगर सर्व सुविधांनी युक्त असे छोटे महानगर म्हणून नावलौकिकास येईल असेहीत्यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आमदार नानाभाऊ शामकुळेमहापौर अंजलीताई घोटेकरआयुक्त संजय काकडेस्थायी समिती सभापती राहुल पावडेनगरसेवक राहुल घोटेकरछ्बुताई वैरागडेरवी आसवाणीशीतलताई आत्रामव सर्व नगरसेवक उपस्थित होते.
आजच्या भूमिपूजन कार्यक्रमांमध्ये संत कंवरराम चौक ते जुना वरोरा नाका चौका पर्यंतचा रस्ता विकसित करण्याचे 2.85 कोटी सीएचएसएल हॉस्पिटल ते चव्हाण कॉलनी पर्यंतच्या 2.85 कोटी रुपयांच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकामसंविधान चौक तुकूम ते गुरुद्वारा छत्रपती मेडिकल चौक पर्यंतच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे 3 कोटी 38 लक्ष रुपयांचा कामाचा प्रामुख्याने समावेश होता.
चंद्रपूर शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात भर पडत असून शहराचा चेहरामोहरा बदलत आहे. मात्र हे काम होत असताना काही दिवस त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी या परिसरातील जनतेने कोणतीही प्रतिक्रिया न देता मोठ्या प्रमाणात सुरू असणार्‍या विकास कामांना साथ दिल्याबद्दल त्यांनी उपस्थित जनतेचे आभार मानले.लवकरच बांधकामाचे काम पूर्ण करण्याकडे आपला कल असून सुंदर रस्ते आपल्याला लवकरच अर्पण होतीलअशी आशा त्यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यामध्ये सुरू असणाऱ्या मोठ्या प्रमाणातील विकासकामांच्या प्रगती बद्दलचा आढावाही त्यांनी यावेळी सादर केला. आमदार नानाभाऊ शामकुळेमहापौर अंजलीताई घोटेकर यांच्यासोबत आपल्या विकासकामांचे डबल इंजिन अधिक गतीने सगळी विकास कामे पार पडतीलअसे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोंटू सिंग यांनी केले.
00000000



v मूल येथे बांधकाम कामगारांना साहित्य वाटप
v शेवटच्या पात्र बांधकाम कामगाराला साहित्य वाटप करण्याची हमी
v हक्काचे घर  व हक्काचे गॅस कनेक्शन घेण्याचे आवाहन

चंद्रपूर दि 15 सप्टेंबर : लोकांच्या स्वप्नातील घरांना आपल्या कष्टाने साकारणाऱ्या बांधकाम कर्मचाऱ्यांना देखील स्वतःची घरे मिळतील. त्यासाठी उपलब्ध सर्व योजनांमधून सबसिडी देण्याचे केंद्र व राज्य शासनाचे धोरण असून बांधकाम कामगारांनी योजनांचा लाभ घ्यावाअसे आवाहन राज्याचे वित्तनियोजन व वन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.
मुल येथील मा.सा. कन्नमवार सभागृहामध्ये आयोजित कामगारांना सुरक्षा किट वाटप कार्यक्रमामध्ये बोलतांना त्यांनी बांधकाम कामगारांच्या पाठीशी केंद्र व राज्य शासन असून आगामी काळात या सर्वांना आपल्या हक्काची घरे मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्याहस्ते बांधकाम साहित्याचे वाटप करण्यात आले. ज्या कामगारांना आज बांधकाम साहित्य मिळाले नाहीत्यांना नंतरच्या कार्यक्रमात बांधकाम साहित्याचे वाटप केले जाईल. जिल्ह्यातील शेवटच्या बांधकाम कामगाराला हे साहित्य वाटप होईपर्यंत वाटपाची मोहीम सुरू असेलअसे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
राज्य शासनाच्या कामगार विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व पात्र बांधकाम कामगारांना बांधकाम साहित्याची सुरक्षा किट वाटप करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष रत्नमाला भोयरराजेंद्र गांधीप्रभाकर भोयरनंदूभाऊ रणदिवे ,जिल्हा कामगार कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त उज्वल लोयानिरीक्षक श्री. कुरेशी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष कासनगोट्टूवार यांनी केले.
यावेळी उपस्थित कामगारांना संबोधित करताना जे कामगार श्रम करतात त्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी देखील प्रधानमंत्री अतिशय सकारात्मक असून सर्वांना स्वतःचे घर देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. बांधकाम कामगारांना विशेष अनुदान त्यासाठी केंद्र शासन देण्याचा विचार करत आहे .अडीच लक्ष रुपये प्रधानमंत्री आवास योजनेतून सध्या मिळत असून बांधकाम कामगारांना आणखी अडीच लक्ष रूपये शासनाकडून देण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे पाच लाख रुपयांपर्यंतचे घर आता प्रत्यक्षात उतरू शकतेया बाबीचा लाभ कामगारांनी घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले.
या योजनेसाठी उपस्थित बहुतांश महिलांकडे आव्हान करताना त्यांनी सांगितले कीमहिला बचत गटाच्या अभियानांमध्ये देखील त्यांनी सहभागी व्हावे. जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यात लवकरच आपण स्वर्गीय सुषमा स्वराज महिला उद्योग भवनाची उभारणी करणार असून या माध्यमातून महिला आर्थिक सबलीकरणाचा मार्ग प्रशस्त करण्यात येणार आहे.
चंद्रपूर जिल्हा धूर मुक्त जिल्हा करण्याचे आपले स्वप्न असून उपस्थित महिलांनी गॅस कनेक्शन साठी अर्ज करावेतअसे आवाहन देखील त्यांनी केले.या जिल्ह्यातील कोणत्याही समाज घटकातील महिलांना मोफत गॅस जोडणी दिली जाईल असे त्यांनी सांगितले. तसेच तुमच्याकडे कोणतीही कार्ड असेल तरी तुम्हाला दोन व तीन रुपये दराने अन्नधान्याचे वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले असून त्याचादेखील लाभ घ्यावाअसे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी त्यांनी या जिल्ह्यात केलेल्या विकास कामांचा आढावा सादर केला. गेल्या पाच वर्षात अनेक प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न केला. असून पुढील काळामध्ये सर्वाधिक एक योजनांची योग्य अंमलबजावणी झालेला जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचे नाव लौकिक असेल असेही त्यांनी सांगितले. कोणत्याही जातीपातीचा विचार न करता सर्वांना समान न्याय देण्याचा आपला प्रयत्न यापुढेही सुरू असेल असेही त्यांनी शेवटी सांगितले.
000000

पर्यावरणाचं संरक्षण करणाऱ्या आदिवासींच्या सुदृढ आरोग्यकरिता फिरते रुग्णालय : ना. सुधीर मुनगंटीवार




वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आदिवासींना त्रास न देण्याचे निर्देश
सुधीरभाऊ आदिवासी बांधवांचे खरे पाठीराखे
: आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके
फिरत्या रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा व विविध कामांचे भूमिपूजन
चंद्रपुर, दि. 15 सप्टेंबर: हजारो वर्षापासून पर्यावरणाचे संरक्षण आदिवासीने केले. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे शासनाचे कर्तव्य असून याकरिता ताडोबा शेजारील गावात राहणाऱ्या आदिवासींच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता फिरत्या रुग्णालयाचे व्यवस्था करण्यात आली आहे. या रुग्णालयाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन, वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. दिनांक 14 सप्टेंबर 2019 रोजी पिंपळखुट येथे आयोजित फिरत्या रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा तसेच वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी त्यांनी जंगलाशेजारी राहणाऱ्या आदिवासींना वन विभागाच्या कर्मचार्‍यांकडून कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या उपस्थितीत चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा व सावली या ठिकाणी मुलामुलींचे दोन-दोन वसतिगृहे सुरू केली असल्याचे  सांगितले. पिपळखुट याठिकाणी शहीद बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले आहे. तसेच चंद्रपूर शहरात 40 कोटी रुपये खर्चून वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने भव्य स्टेडियम निर्माण करण्यात येणार आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील युवक खेळाडू शेडमाके यांच्या प्रेरणेने सराव करतील व जिल्ह्याचे नाव उज्वल करतील. तसेच गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे राणी दुर्गावती यांच्या स्मारकाचे नूतनीकरण व्हावे यासाठी 5 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला. चंद्रपूर जिल्ह्यातील पेसा ग्रामपंचायतीला 5 टक्के निधी खर्च व्हावा यासाठी प्रयत्न केले. आदिवासी विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे. याकरिता या सरकारने नामांकित शाळा योजना सुरू केली व प्रत्येक विद्यार्थ्यामागे 50 हजार रुपयांचा शैक्षणिक खर्च सरकारने उचलला. अनेक वर्षांपासून आश्रमशाळांचे प्रतिविद्यार्थी अनुदान हे 900 रुपये होते. परंतु या सरकारने ते वाढवून पंधराशे रुपये प्रति विद्यार्थी केले. गडचिरोली जिल्ह्यात गोंडवाना विद्यापीठाकरिता प्रयत्न केले. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
कोणताही आदिवासी युवक बेरोजगार राहू नये. तर तो रोजगार निर्माण करणारा व्हावा. याकरिता 500 कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. अनेक पिढ्यांपासून पर्यावरणाचे संरक्षण आदिवासींनी केलं यामुळे जंगलाशेजारी राहणाऱ्या आदिवासींना वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून कोणताही त्रास होऊ नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर कोणताही आदिवासी बांधव पक्क्या घराविना राहू नये. याकरिता 40 हजार घरकुलाची आवश्यकता असून आदिवासी विकासमंत्र्याकडून या अभियानाला विशेष सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. चंद्रपूर जिल्ह्यात अनेक आदिवासी महिलांचे गट तयार झाले असून या माध्यमातून आर्थिक उन्नती साधली जाणार आहे. मिशन शौर्य अंतर्गत या जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी जगातील सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करून देशाचा नावलौकिक वाढवला. मिशन मंथन अंतर्गत जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना आयआयटीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या मिशनच्या माध्यमातून आदिवासी युवक रोजगार निर्माण करणारे होतील. अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या क्षेत्रासाठी अनेक विकास कामे केली असून यामध्ये निराधार महिलांचे 600 रुपये अनुदान 1000 रुपये पर्यंत वाढवून देण्यात आले आहे. नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे याकरिता आरओ मशीन लावण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न सुटावा याकरिता अनेक सिंचनप्रकल्प निर्माण करण्यात आले आहे. तसेच या क्षेत्राला पाणीदार मतदारसंघ म्हणून विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमाला गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी संबोधित केले. तसेच राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी संबोधित करताना आदिवासी बांधवांसाठी शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या अनेक योजनांची सविस्तर माहिती दिली.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी नेहमी आदिवासी बांधवांच्या हिताची भूमिका घेतली आहे , ते आदिवासी बांधवांचे खरे पाठीराखे असल्याचे डॉ उईके म्हणाले. या कार्यक्रमाला बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा, जिल्हा परिषद सदस्य गौतम निमगडे, चंद्रकांत धोडरे , वनिता  आसुटकर, रोशनी खान, सरपंच विनोद मेश्राम, अशोक आलाम तसेच आदिवासी बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000000