Search This Blog

Thursday 31 March 2022

गुरुवारी जिल्ह्यात 2 कोरोनामुक्त तर 2 बाधित


 गुरुवारी जिल्ह्यात 2 कोरोनामुक्त तर 2 बाधित

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 2

चंद्रपूर दि. 31 मार्च : गत 24 तासात जिल्ह्यात 2 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 2 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात गुरुवारी मृत्यु संख्या शुन्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये सिंदेवाही 1 तर सावली येथे 1 रुग्ण आढळून आला असून चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र, चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, नागभीड, मुल, पोंभूर्णा, गोंडपिपरी, राजुरा, चिमूर, वरोरा, कोरपना, जिवती व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.

            जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 960 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 97 हजार 391 झाली आहे. सध्या 2 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 94 हजार 138 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 94 हजार 64 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1567 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

 00000

चंद्रपुरात आशा दिवस उत्साहात साजरा

 




चंद्रपुरात आशा दिवस उत्साहात साजरा

चंद्रपूर दि. 31 मार्च: तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्यावतीने दि. 26 व 27 मार्च रोजी आशा दिवस जिल्हा परिषदेतील कर्मवीर कन्नमवार सभागृहात साजरा करण्यात आला. दोन दिवसीय आयोजित या कार्यक्रमात विविध मनोरंजनाचे व आरोग्य विषयक कार्यक्रम पार पडले.

या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शृंगारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित जैस्वाल, डॉ. आशिष वाकडे, डॉ. प्रशांत चौधरी, डॉ. विवेक बांगडे जिल्हा समूह संघटक शीतल राजापुरे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक दोसना बागेसर तसेच तालुक्यातील आशा स्वयंसेविका आशा गटप्रवर्तक प्रामुख्याने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले,  कोविड-19 च्या संक्रमण काळात आशा स्वयंसेविकानी मोलाची भूमिका पार पाडली आहे. कोविड-19 काळात आशा स्वयंसेविकांनी वाघीनी प्रमाणे कार्य केले आहे. व पुढेही करीत राहणार आहेत, या शब्दात त्यांचे कौतुक केले. तसेच यापुढे आशा स्वयंसेविका च्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहू. असे आश्वासन आमदार जोरगेवार यांनी यावेळी दिले.

या कार्यक्रमात गीत गायन, नृत्य, पथनाट्य, रांगोळी स्पर्धा, पाककला असे विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी वर्षभरात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविका, आशा गटप्रवर्तक तसेच ज्या गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांनी ई- संजीवनी बाबत गावामध्ये जनजागृती करीत ओपीडीबाबत सेवा दिली, त्यांचे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यासोबतच राष्ट्रीय लसीकरण दिवसानिमित्त पल्स पोलिओ लसीकरण अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आरोग्य सेविका व आशा स्वयंसेविकाना प्रमाणपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहिदास राठोड,मुरलीधर ननावरे,जयांजली मेश्राम,सदीप मून तसेच कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाला आरोग्य सेविका, स्टाफ नर्स व तालुका आरोग्य कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

3 एप्रिल रोजी स्टेशन हेडक्वार्टर कामठीतर्फे सैनिक रॅलीचे आयोजन

 3 एप्रिल रोजी स्टेशन हेडक्वार्टर कामठीतर्फे सैनिक रॅलीचे आयोजन

चंद्रपूर दि. 31 मार्च: जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक व माजी सैनिक विधवा करीता रविवार दि. 3 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10 वाजता सैन्य भरती कार्यालय ग्राउंड, नागपूर येथे स्टेशन हेडक्वार्टर कामठीतर्फे सैनिक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी, जिल्ह्यातील माजी सैनिक व माजी सैनिक विधवा यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी दीपक लिमसे यांनी केले आहे.

00000

पशुधनावर आधारित शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्धव्यवसाय प्रशिक्षण

 

पशुधनावर आधारित शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्धव्यवसाय प्रशिक्षण

Ø युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 31 मार्च : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे 7 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक- युवतींकरीता दि. 18 ते 22 एप्रिल 2022 या कालावधीत रोज दुपारी 12 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

या प्रशिक्षणामध्ये शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्धव्यवसाय यामधील उद्योगसंधी, शेडची रचना, व्यवसायाचे फायदे, शेळी, गाय व कोंबड्याच्या विविध जाती, पैदास, निवड, प्रजनन, औषधोपचार, लसीकरण, निगा व संरक्षण प्रतिबंधक उपाय, त्यांचे संगोपन व व्यवस्थापन, संतुलित आहार, जीवनसत्वाचे महत्व, संसर्गजन्य रोग व त्यावर उपचार तसेच शासनाच्या विविध अनुदानित योजना, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, यशस्वी उद्योजक यांचे मार्गदर्शन, कर्ज प्रकरण तयार करण्याचे मार्गदर्शन, पशुधन विकास कार्यालयाच्या योजना व व्यवसाय संधी इत्यादी विषयांवर विशेष तज्ञ व शासकीय अधिकारी वर्गाद्वारे ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

            या प्रशिक्षणात ऑनलाईन प्रवेश घेण्याकरीता इच्छुक युवक-युवतींनी www.mced.co.in या संकेतस्थळावर दि. 16 एप्रिल 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के. व्ही. राठोड, दुरध्वनी क्र. 9403078773, कार्यक्रम आयोजक मिलींद कुंभारे 9011667717, कार्यक्रम आयोजिका लक्ष्मी खोब्रागडे 9309574045 यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रकल्प अधिकारी के. व्ही. राठोड यांनी कळविले आहे.

00000

Wednesday 30 March 2022

घुग्घूस शहराच्या विकासाकरीता निधीची कमतरता पडु देणार नाही - पालकमंत्री विजय वडेट्टीवार

 






घुग्घूस शहराच्या विकासाकरीता निधीची कमतरता पडु देणार नाही - पालकमंत्री विजय वडेट्टीवार

Ø अग्निशमन वाहनाचे लोकार्पण व विकास कामांचे भुमीपुजन

चंद्रपूर दि. 30 मार्च: घुग्घूस शहरातील विकासकामांनी आता गती पकडली आहे. जनकल्याण व जनसेवेसाठी आवश्यक सर्व सुविधा घुग्घूस येथे उपलब्ध असाव्यात, हे ध्येय निश्चित करून विकासकामे हाती घेण्यात आली आहे. यापुढेही ही विकासकामे अशीच सुरु राहणार असून घुग्घूस शहराच्या विकासाकरीता निधीची कमतरता पडु देणार नाही.अशी ग्वाही आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.घुग्गुस नगरपरिषद येथे आयोजित अग्निशमन वाहनाच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रंसगी ते बोलत होते.

यावेळी, आमदार किशोर जोरगेवार, तहसिलदार निलेश गौंड, मुख्याधिकारी अर्शिया जुही, घुग्घूसचे पोलीस निरीक्षक बी. आर.पुसाटे  तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

घुग्घूस शहराच्या विकासाकरिता निधीची कुठलीही कमतरता पडणार नाही. असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, घुग्घूस,नगर परिषदेकरीता 2 अग्निशमन वाहने उपलब्ध करुन देण्यात आले असून त्याकरिता शासनाकडून रु. 86.56 लक्ष रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. त्यासोबतच दलितेत्तर सुधारणा योजनेमधुन शासनातर्फे रु. 32.47 लक्ष रुपयाचा निधी प्राप्त झाला असुन याअंतर्गत वार्ड क्र. 6 मध्ये विकास कामांचे भुमीपुजन पार पडले.

पालकमंत्री श्री. वडेट्टीवार पुढे म्हणाले, घुग्घूस शहरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे. त्याच्या नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून घुग्घूसवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यासाठी शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर देण्यात येणार असून त्यासाठी सहकार्य करणार असल्याचे ते म्हणाले.

याप्रसंगी, बांधकाम विभागाचे श्री.गुप्ता,आरोग्य विभाग तथा पाणीपुरवठा विभागाचे अमर लाड, सचिन धकाते, शहर समन्वयक शिखा दिप उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार शंकर नागरे यांनी मानले.

00000

4 एप्रिल रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

 


4 एप्रिल रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

चंद्रपूर दि. 30 मार्च: सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्यात येते. या लोकशाही दिनानिमित्त नागरिक व शेतकरी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करतात.

सोमवार दि. 4 एप्रिल2022 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार सादर करतांना विहित नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत तसेच अर्ज सादर करावा. तदनंतरच तक्रार अर्ज स्वीकारण्यात येईल, तसेच निवेदन स्वीकारण्याची वेळ दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंतच्या कालावधीत राहील.या लोकशाही दिनात नागरिकांनी मास्क घालणे व सामाजिक अंतराचे पालन करणे अनिवार्य राहील.

00000

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 2

 

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 2

चंद्रपूर, दि. 30 मार्च : जिल्ह्यात बुधवारी (दि.30) एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. तर जिल्ह्यात एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

            जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 958 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 97 हजार 389 झाली आहे. सध्या 2 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 93 हजार 781 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 93 हजार 753 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1567 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

000000

‘परीक्षा पे चर्चा’ 1 एप्रिल रोजी होणार, पंतप्रधान मोदी साधणार विद्यार्थ्यांशी संवाद


‘परीक्षा पे चर्चा’ 1 एप्रिल रोजी होणार, पंतप्रधान मोदी साधणार विद्यार्थ्यांशी संवाद

चंद्रपूर दि. 30 मार्च: आगामी बोर्ड आणि प्रवेश परीक्षांच्या पार्श्वभूमीवर 1 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत.

विद्यार्थ्यांना आलेला परीक्षेचा तणाव दूर करणे हा या संवादाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थी, पालक व शिक्षकांशी होणाऱ्या पंतप्रधानांच्या या संवादाचे डीडी नॅशनल, डीडी न्यूज, फेसबुक या प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारण केले जाणार आहे. त्यासोबतच जवाहर नवोदय विद्यालय, बाळापूर, तळोधी यांच्यामार्फत देखील फेसबुक, ट्विटर व यूट्यूबच्या अधिकृत सोशल मीडियाद्वारे बहुउद्देशीय सभागृहांमध्ये परीक्षा पे चर्चा या संवादाचे थेट प्रसारण दाखवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. एक जबाबदार पालक या नात्याने आपल्या पाल्याच्या तणावमुक्त परीक्षांसाठी उद्भवलेल्या प्रश्नांची सोडवणूक या संवादाच्या माध्यमातून केल्या जाणार आहे.

या कार्यक्रमासाठी जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्य यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा पे चर्चा या विषयावर जिल्हयातील शाळांमध्ये ऍक्टिव्हिटी व कार्यक्रम होतील, त्या सर्व कार्यक्रमाचे फोटो व व्हिडीओ 10 एप्रिलपर्यंत प्राचार्य,जवाहर नवोदय विद्यालय बाळापूर, तळोधी यांच्याकडे पाठवावेत.

तरी, जिल्ह्यातील सर्व शाळांनी या कार्यक्रमाला ऑनलाईन माध्यमातून उपस्थिती दर्शवावी. असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्य मीना मणी यांनी केले आहे.

000000 

उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी

 

उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी

चंद्रपूर दि. 30 मार्च: प्रादेशिक हवामान विभाग नागपूर यांनी दिलेल्या हवामान विषयक पूर्वसूचना मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात 31 मार्च 2022 रोजी तापमानात वाढ होणार असून उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तरी उष्माघाताच्या स्थितीत नागरिकांनी काय करावे व काय करू नये याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आल्या आहे.

उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी, उष्णतेच्या लाटेची माहिती देण्याकरिता रेडिओ, टीव्ही, सोशल मीडिया व स्थानिक वृत्तपत्रे प्रसार माध्यमांचा वापर करण्यात यावा. जिल्हा नियंत्रण कक्ष महानगरपालिका नियंत्रण कक्ष विभागीय स्तरावरील नियंत्रण कक्ष व स्थानिक संस्था आणि आरोग्य विभागांनी एकत्रित कार्य करावे. सर्व संबंधित विभाग स्थानिक पुढारी व सामाजिक संस्थांनी सदर कार्यात सामील व्हावे.

काय करावे :

तहान लागलेली नसेल तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे. हलकी, पातळ व सच्छिद्र सुतीकपडे वापरावेत. घराबाहेर पडताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चपलाचा वापर करावा. प्रवास करतांना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. उन्हात काम करतांना डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्याने डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, लस्सी, लिंबूपाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करावा. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावेत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुरांना छावणीत ठेवावे तसेच त्यांना पुरेसे पाणी द्यावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे , शटर व सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करावे. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा. बाहेर कामकाज करीत असतांना मध्ये-मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावा. गरोदर कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी. रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत. जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी.

काय करू नये:

लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी 12 ते 3.30 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालने टाळावे. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. उन्हाळ्याच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावी.

जिल्ह्यातील नागरिकांनी उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी केले आहे.

00000

Tuesday 29 March 2022

इरई नदीचे खोलीकरण व इतर कामांना गती द्या - पालकमंत्री विजय वडेट्टीवार




 इरई नदीचे खोलीकरण व इतर कामांना गती द्या

           - पालकमंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपूर, दि. 29 मार्च :  इरई नदीचे खोलीकरण तसेच पूर संरक्षणात्मक कामांना शासनाने मंजूरी दिली आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे होणे आवश्यक आहे. कारण खोलीकरण करून गॅबियन बंधारे बांधले तर नवीन गाळ नदीच्या पात्रात येणार नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तात्काळ सर्व्हे करून कामाला गती द्यावी, अशा सुचना राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात इरई नदीच्या कामाचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठे, सा.बा. विभागाच्या अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता पी.एन.पाटील, कार्यकारी अभियंता श्यामसुंदर काळे, एस.एस.दाणी, श्री. कुंभे आदी उपस्थित होते.

खोलीकरण करून इरई नदीचा गाळ काढणे सुरू असले तरी या कामाला गती देणे आवश्यक आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सात दिवसांत सर्व्हे करा.  तसेच खोलीकरण आणि पूर संरक्षणात्मक कामांचा संपूर्ण आराखडा तयार करून शासनाकडे त्वरीत पाठवा. नदी पात्राचे दोन्ही तट समतोल करणे, पावसाळ्यात नव्याने गाळ येऊ नये म्हणून गॅबियन बंधा-यांची निर्मिती करणे, संरक्षण भिंत आदी कामे करायची आहेत. या कामांना वेळ होऊ नये म्हणून अंदाजपत्रक सादर करा, अशा सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

एकोना व केपीएल कंपनीमध्ये प्रकल्पग्रस्तांना / स्थानिकांना रोजगार देण्यासंदर्भात पालकमंत्री म्हणाले, प्रकल्पात ज्यांच्या जमिनी गेल्या, त्यांच्या कुटुंबातील सदस्याला कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे. कुटुंबातील सदस्य नोकरीस पात्र नसेल तर त्याप्रमाणात मोबदला मिळणे गरजेचे आहे. प्रकल्पग्रस्तांची समस्या सोडवून समाधानकारक तोडगा काढला जाईल, असेही पालकमंत्री यांनी सांगितले.   यावेळी त्यांनी ‘वढा’ तीर्थक्षेत्र पर्यटन विकास संदर्भातसुध्दा आढावा घेतला.

०००००००

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, 1 कोरोनामुक्त

 


जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, 1 कोरोनामुक्त

Ø ॲक्टीव्ह रुग्ण 2

चंद्रपूर, दि.29 मार्च : जिल्ह्यात मंगळवारी (दि.29) एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. जिल्ह्यात एकाने  कोरोनावर मात केली असून त्या रुग्णाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर जिल्ह्यात मंगळवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 958 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 97 हजार 389 झाली आहे. सध्या 2 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 93 हजार 417 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 93 हजार 401 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1567 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

०००००००

शेतकरी आत्महत्येची 12 प्रकरणे मदतीकरीता निकाली

 



शेतकरी आत्महत्येची 12 प्रकरणे मदतीकरीता निकाली

Ø अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी घेतला आढावा

चंद्रपूर, दि.29 मार्च : जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणी समितीच्या बैठकीमध्ये शेतकरी आत्महत्येच्या एकूण 18 प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत 12 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली असून 2 प्रकरणे समितीने अपात्र ठरविली आहे, तर उर्वरित 4 प्रकरणे फेरतपासणी साठी प्रलंबित ठेवण्यात आली आहे.

आढावा बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, तहसीलदार(सामान्य) यशवंत धाईत, जिल्हा नेत्रशल्य चिकित्सक डॉ. दूधे, पोलिस उप निरीक्षक आर. के.मेंढे, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रशांत धोंगडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रतिनिधी शंकर लोडे, महसूल सहाय्यक प्रमोद गेडाम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

शेतीमध्ये सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्ज परतफेडीचा तगादा या तीन प्रमुख कारणांपैकी शेतकरी आत्महत्या झाली असल्यास संबंधित कुटुंबाला 23 जानेवारी 2006 च्या शासन निर्णयाद्वारे आर्थिक मदत देण्यात येते. जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्येच्या 18 प्रकरणांवर चर्चा झाली. यापैकी 12 प्रकरणे पात्र करून मदतीकरीता निकाली काढण्यात आली तर 2 प्रकरणे समितीने अपात्र ठरविली. उर्वरित 4 प्रकरणे समितीने फेरतपासणी साठी प्रलंबित ठेवली आहे.

०००००००

 

Monday 28 March 2022

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3

 


जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3

चंद्रपूर, दि. 28 मार्च : जिल्ह्यात सोमवारी (दि.28) एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. तर जिल्ह्यात एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

 जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 958 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 97 हजार 388 झाली आहे. सध्या 3 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 92 हजार 914 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 92 हजार 914 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1567 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

000000

क्षयरोग दूरीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने लक्ष केंद्रीत करावे - डॉ.मिताली सेठी




 

क्षयरोग दूरीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने लक्ष केंद्रीत करावे -   डॉ.मिताली सेठी

Ø जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

चंद्रपूर दिनांक 28 मार्च :  आरोग्य यंत्रणेने समन्वयाने व  सहभागाने कार्य केल्यास केंद्र शासनाने ठरविल्याप्रमाणे 2025 पर्यंत क्षयरोग दूरीकरणाचे उद्दिष्ट निश्चितपणे साध्य करता येईल, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी केले. जिल्हा परिषदेतील कन्नमवार सभागृहात जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत,  डॉ. संदीप गेडाम,  जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश साठे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद्र किन्नाके, आयएमएचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, सचिव अनुप पालीवाल आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

क्षयरोगाला हद्दपार करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी दरवर्षी 24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात येतो, असे सांगून डॉ. सेठी म्हणाल्या, जिल्ह्यात क्षयरोग दूरीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने समन्वयाने व सहभागाने कार्य करावे. क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात समाजातील विविध घटकांचा सहभाग वाढवावा. तसेच क्षयरोगाबाबत  समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनजागृतीसाठी करावी.

आरोग्य यंत्रणेने कोविड-19 मध्ये  केलेले कार्य प्रशंसनीय आहे. ज्या पद्धतीने कोरोनाला नियंत्रित केले, त्याच जोमाने क्षयरोगाविरुद्ध कार्य केल्यास क्षयरोग दुरीकरण मोहीम यशस्वी होण्यास वेळ लागणार नाही, असे अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर म्हणाल्या.

यावेळी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त, क्षयरोग  केंद्र, चंद्रपूर येथून क्षयरोग जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  मान्यवरांनी  हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली. या रॅलीमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, प्रभादेवी नर्सिंग महाविद्यालय येथील विद्यार्थी, वैद्यकीय अधिकारी, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी तसेच जिल्हा क्षयरोग केंद्रातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

क्षयरोग दिनानिमित्त 2021 मध्ये उत्कृष्ट टीबी नोटीफिकेशन केल्याबद्दल डॉ. शरयू पाझारे, डॉ. आनंद बेंडले, डॉ. भारत गणवीर, डॉ. कोतपल्लीवार, डॉ. पंत या खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच आशाधाम हॉस्पिटल राजुरा, रोशन आकुलकर अध्यक्ष संकल्प बहुउद्देशीय संस्था, प्रतिसाद बहुउद्देशीय विकास संस्था या उत्कृष्ट सहकार्य करणाऱ्या अशासकीय संस्था व स्वयंसेवी संस्थांना तर राजुरा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. लहुजी कुळमेथे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नगराळे यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

क्षयरोग  जनजागृतीसाठी चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सचिन हस्ते यांनी तर आभार हेमंत महाजन यांनी मानले.

00000

‘मार्च एंडिंग’ खर्चाबाबत पालकमंत्र्यांनी घेतला यंत्रणेचा आढावा

 




‘मार्च एंडिंग’ खर्चाबाबत पालकमंत्र्यांनी घेतला यंत्रणेचा आढावा

चंद्रपूर, दि. 28 मार्च :  चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ तीन ते चार दिवस राहिले आहे. या वर्षात जिल्हा नियोजन समिती, खनिज विकास निधी आणि आदिवासी विकास निधीअंतर्गत विविध विभागांना विकास कामांसाठी देण्यात आलेल्या निधीच्या खर्चाबाबत राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे, बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाळ आदी उपस्थित होते.

बहुतांश विभागाचा निधी खर्च झाला आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, कोणत्याही विभागाचा निधी शिल्लक असल्यास तो त्वरीत वळता करावा. जेणेकरून इतर विभागाला सदर निधी वेळेत देता येईल. मेंडकी आणि एकारा येथे आरोग्य व्यवस्थेसाठी मागणीप्रमाणे निधी उपलब्ध करून द्या. जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय तसेच चारवाढीसाठी पशुसंवर्धन विभागाने नियोजन करावे. ग्रामीण भागात उभारण्यात येणारे वाचनालय चावडीसारखे असावे. जेणेकरून सहजरितीने विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल.

जिल्ह्यातील पारधी बेड्यांवर जलशुध्दीकरण यंत्र तसेच हायमास्ट बसविण्याकरीता आदिवासी विकास विभागाने निधीची तरतूद करावी. जिल्ह्यात करडई पिकाचे उत्पन्न वाढविण्यासाठी तसेच महाज्योतीच्या माध्यमातून 100 तेल घाणीचे क्लस्टर तयार करण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिका-यांनी आराखडा तयार करून द्यावा. प्रत्येक तालुक्यात पाच मॉडेल शाळा तयार करण्यासाठी निधी देणार असून आरोग्य विभागाला फायर ऑडीटकरीता अतिरिक्त निधी दिला जाईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

बैठकीला विविध विभागाचे प्रमुख तसेच अधिकारी उपस्थित होते.

00000