पालकमंत्री 28 व 29 मार्च रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर
चंद्रपूर, दि. 25 मार्च : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमीन विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे 28 मार्च रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दि. 28 मार्च 2022 रोजी दुपारी 1 वा. शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे आगमन व राखीव, दुपारी 1.30 वा. बिपीन मेहता यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट, दुपारी 1.45 वा. वीस कलमी सभागृह चंद्रपूर येथे जिल्हा वार्षिक योजनेसंदर्भात आढावा बैठक, दुपारी 3 वा. चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब संदर्भात आढावा बैठक, दुपारी 3.30 वा. कोविड संदर्भात आढावा बैठक, दुपारी 4 वा. आदिवासी विकास विभागाची आढावा बैठक, दुपारी 4.30 वाजता वीस कलमी सभागृह, चंद्रपूर येथे सिंदेवाही नगर पंचायत अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना व एक्सप्रेस फिडर संदर्भात संबंधित विभागाची आढावा बैठक. सायंकाळी 5 सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक. त्यानंतर सोयीनुसार हिराई विश्रामगृह, चंद्रपूर येथे मुक्काम.
दि. 29 मार्च रोजी सकाळी 10.30 वा. वीसकलमी सभागृह येथे इरई नदीच्या पूरप्रतिबंधक उपाययोजनेसंदर्भात आढावा, सकाळी 11.30 वाजता वढा पर्यटन क्षेत्राच्या विकासासंदर्भात आढावा बैठक, दुपारी 12 वा. एकोना माईन्स व केपीएल कंपनीमध्ये प्रकल्पग्रस्तांना व स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्याबाबत आढावा. दुपारी 1 ते 1.30 राखीव, दुपारी 1.30 वा.शासकीय विश्रामगृह येथे पदाधिका-यांशी चर्चा, सायंकाळी 5 वा. चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.
००००००००
No comments:
Post a Comment