Search This Blog

Wednesday, 30 March 2022

‘परीक्षा पे चर्चा’ 1 एप्रिल रोजी होणार, पंतप्रधान मोदी साधणार विद्यार्थ्यांशी संवाद


‘परीक्षा पे चर्चा’ 1 एप्रिल रोजी होणार, पंतप्रधान मोदी साधणार विद्यार्थ्यांशी संवाद

चंद्रपूर दि. 30 मार्च: आगामी बोर्ड आणि प्रवेश परीक्षांच्या पार्श्वभूमीवर 1 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत.

विद्यार्थ्यांना आलेला परीक्षेचा तणाव दूर करणे हा या संवादाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थी, पालक व शिक्षकांशी होणाऱ्या पंतप्रधानांच्या या संवादाचे डीडी नॅशनल, डीडी न्यूज, फेसबुक या प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारण केले जाणार आहे. त्यासोबतच जवाहर नवोदय विद्यालय, बाळापूर, तळोधी यांच्यामार्फत देखील फेसबुक, ट्विटर व यूट्यूबच्या अधिकृत सोशल मीडियाद्वारे बहुउद्देशीय सभागृहांमध्ये परीक्षा पे चर्चा या संवादाचे थेट प्रसारण दाखवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. एक जबाबदार पालक या नात्याने आपल्या पाल्याच्या तणावमुक्त परीक्षांसाठी उद्भवलेल्या प्रश्नांची सोडवणूक या संवादाच्या माध्यमातून केल्या जाणार आहे.

या कार्यक्रमासाठी जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्य यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा पे चर्चा या विषयावर जिल्हयातील शाळांमध्ये ऍक्टिव्हिटी व कार्यक्रम होतील, त्या सर्व कार्यक्रमाचे फोटो व व्हिडीओ 10 एप्रिलपर्यंत प्राचार्य,जवाहर नवोदय विद्यालय बाळापूर, तळोधी यांच्याकडे पाठवावेत.

तरी, जिल्ह्यातील सर्व शाळांनी या कार्यक्रमाला ऑनलाईन माध्यमातून उपस्थिती दर्शवावी. असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्य मीना मणी यांनी केले आहे.

000000 

No comments:

Post a Comment