Search This Blog

Friday, 4 March 2022

पालकमंत्री वडेट्टीवार 5 व 6 मार्च रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर


 पालकमंत्री वडेट्टीवार 5 व 6 मार्च रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर

चंद्रपूर दि. 4 मार्च : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार 5 व 6 मार्च रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार, दि. 5 मार्च 2022 रोजी दुपारी 3.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व पदाधिका-यांसोबत बैठक, दुपारी 4 वाजता जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय येथे चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक, सायंकाळी 7 वाजता मातामंदीर चौक, भिवापूर वॉर्ड लालपेठ येथे कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 8 वाजता हिराई विश्रामगृह येथे मुक्काम.

रविवार, दि. 6 मार्च रोजी सकाळी 8.30 वाजता चंद्रपूर येथून सिंदेवाहीकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे दिव्यांग व्यक्तिंना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमास उपस्थित. सकाळी 10.35 वाजता सिंदेवाही येथे विवाह सोहळ्यास उपस्थित. दुपारी 11.15 वाजता सिंदेवाही येथून व्याहाड खुर्द, ता. सावलीकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र लोंढाली येथे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया कार्यक्रमास उपस्थित. दुपारी 2 वाजता नागपूरकडे प्रयाण.

No comments:

Post a Comment