Search This Blog

Tuesday 22 March 2022

मंगळवारी जिल्ह्यात 1 कोरोनामुक्त तर 1 बाधित


मंगळवारी जिल्ह्यात 1 कोरोनामुक्त तर 1 बाधित

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 2

चंद्रपूर दि. 22 मार्च : गत 24 तासात जिल्ह्यात एकाने कोरोनावर मात केली असून त्या रुग्णाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 1 नवीन रुग्ण बाधीत झाला आहे. जिल्ह्यात मंगळवारी मृत्यु संख्या शुन्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चिमूर येथे 1 रुग्ण आढळून आला असून चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र, चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, राजुरा, वरोरा, कोरपना, जिवती व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 956 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 97 हजार 387 झाली आहे. सध्या 2 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 90 हजार 907 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 90 हजार 850 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1567 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment