बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प
Ø यापूर्वी अर्ज न केलेल्या संस्थाकडुन अर्ज आमंत्रित
चंद्रपूर दि. 21 मार्च: बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प हा जागतिक बँक अर्थसहाय्यीत प्रकल्प आहे. जिल्हयातील 91 एफपीओ यांनी या प्रकल्पात सहभाग घ्यावा. या प्रकल्पाअंतर्गत मूल्य साखळी विकसीत करून शेतकऱ्यांना रास्तभाव व ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पन्न घेणे, या दोन्ही बाबी साध्य होणार आहे. या प्रकल्पांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील समुदाय आधारित संस्थाकडून मूल्य साखळी विकासाचे उपप्रकल्प राबविण्यासाठी दि. 31 मार्च 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.
सदर अर्ज हे शेतमाल, शेळया, (मांस व दुध) आणि परसबागेतील कुक्कुटपालन (अंडी) यांच्या मुल्यसाखळी विकासाच्या उप प्रकल्पासाठी आहेत. अर्ज सादर करण्यासाठी पात्र समुदाय आधारीत संस्थामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्थापित प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळाव्दारे स्थापित लोक संचालित साधन केंद्र यांचा समावेश आहे.
जाहिराती संदर्भात माहिती, पात्रतेचे निकष, अर्जाचा नमुना इत्यादी माहिती https://www.smart-mh-org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरून डाउनलोड करून प्रिंट घ्यावी. त्यामध्ये माहिती भरून व आवश्यक कागदपत्रे सोबत जोडावे. शेतकरी उत्पादक कंपन्यानी जिल्ह्याचे प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय, तसेच लोकसंचालित साधन केंद्रांनी जिल्हा समन्वयक अधिकारी, माविम आणि प्रभाग संघानी जिल्हा अभियान व्यवस्थापक, एम.एस.आर.एल.एम यांच्या कार्यालयात ऑफलाईन स्वरुपातील अर्ज दि. 31 मार्च 2022 पर्यंत सादर करावेत.
यापूर्वी ऑनलाईन अर्ज केलेल्या संस्थांनी पुनश्च: अर्ज करण्याची आवश्यकता नाही. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधीकारी कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment