जिल्ह्याची रब्बी पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर
चंद्रपूर, दि. 15 मार्च : सन 2021-22 या वर्षातील चंद्रपूर जिल्ह्यातील रब्बी पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. यात रब्बीचे क्षेत्र असलेल्या तीन गांवाचा समावेश असून या तिनही गावांची 50 पैसे वरील सरासरी पैसेवारी 0.57 आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 1836 गावे असून यापैकी खरीप लागवडीखालील गावांची संख्या 1833 आहे. तर उर्वरीत तीन गावे ही रब्बी लागवडीची गावे म्हणून ओळखली जातात. सदर तीनही गावे ही बल्लारपूर तालुक्यातील आहेत. यात माना, दहेली आणि लावारी गावांचा समावेश आहे.
माना गावात रब्बीचे एकूण लागवडीखालील क्षेत्र 2 हे.आर. असून प्रत्यक्ष पेरणी केलेले क्षेत्र 2 हे.आर. (50 पैसे वरील पैसेवारी 0.58) आहे. दहेली गावात एकूण लागवडीचे क्षेत्र 129 हे.आर. व प्रत्यक्ष लागवडीचे क्षेत्र 129 हे.आर. (50 पैसे वरील पैसेवारी 0.56) तर लावारी गावात एकूण लागवडीचे क्षेत्र 31 हे.आर. असून प्रत्यक्ष पेरणी केलेले क्षेत्र 31 हे. आर. (50 पैसे वरील पैसेवारी 0.56) आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
०००००००
No comments:
Post a Comment