Search This Blog

Thursday 31 March 2022

पशुधनावर आधारित शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्धव्यवसाय प्रशिक्षण

 

पशुधनावर आधारित शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्धव्यवसाय प्रशिक्षण

Ø युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 31 मार्च : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे 7 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक- युवतींकरीता दि. 18 ते 22 एप्रिल 2022 या कालावधीत रोज दुपारी 12 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

या प्रशिक्षणामध्ये शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्धव्यवसाय यामधील उद्योगसंधी, शेडची रचना, व्यवसायाचे फायदे, शेळी, गाय व कोंबड्याच्या विविध जाती, पैदास, निवड, प्रजनन, औषधोपचार, लसीकरण, निगा व संरक्षण प्रतिबंधक उपाय, त्यांचे संगोपन व व्यवस्थापन, संतुलित आहार, जीवनसत्वाचे महत्व, संसर्गजन्य रोग व त्यावर उपचार तसेच शासनाच्या विविध अनुदानित योजना, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, यशस्वी उद्योजक यांचे मार्गदर्शन, कर्ज प्रकरण तयार करण्याचे मार्गदर्शन, पशुधन विकास कार्यालयाच्या योजना व व्यवसाय संधी इत्यादी विषयांवर विशेष तज्ञ व शासकीय अधिकारी वर्गाद्वारे ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

            या प्रशिक्षणात ऑनलाईन प्रवेश घेण्याकरीता इच्छुक युवक-युवतींनी www.mced.co.in या संकेतस्थळावर दि. 16 एप्रिल 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के. व्ही. राठोड, दुरध्वनी क्र. 9403078773, कार्यक्रम आयोजक मिलींद कुंभारे 9011667717, कार्यक्रम आयोजिका लक्ष्मी खोब्रागडे 9309574045 यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रकल्प अधिकारी के. व्ही. राठोड यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment