Search This Blog

Friday 11 March 2022

महाराष्ट्राला विकासाची दिशा देणारा अर्थसंकल्प – पालकमंत्री विजय वडेट्टीवार


 

महाराष्ट्राला विकासाची दिशा देणारा अर्थसंकल्प

                                      – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

Ø ‘वढा’ तीर्थक्षेत्र विकास, व्याघ्रसफारी व वन्यजीव बचाव केंद्राची अर्थसंकल्पात घोषणा

चंद्रपूर दि. 11 मार्च : महाविकास आघाडी सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे. गत दोन वर्षे कोरोनाच्या संकटात गेली असली तरी राज्य विकासाच्या बाबतीत अग्रेसर आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी हे सरकार काम करीत असून आज सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प महाराष्ट्राला विकासाची दिशा देणारा आहे. विशेष म्हणजे ‘वढा’ तीर्थक्षेत्र, व्याघ्रसफारी आणि वन्यजीव बचाव केंद्राची निर्मिती व गडचिरोली येथे नवीन विमानतळ यासह अनेक बाबींची घोषणा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केलीचंद्रपूरगडचिरोली जिल्ह्यासाठी ही नक्कीच उपलब्धी आहेअसे मत राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, बहुजन कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

वर्धा – पैनगंगा नदीच्या संगमावर वसलेले व साक्षात प्रति पंढरी असलेल्या ‘वढा’ तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 25 कोटी रुपये आजच्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले आहे. राज्यात वनांच्या क्षेत्रात वाढ झाली असून चंद्रपूरमध्येही वनांचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे शहरालगत 171 हेक्टरवर व्याघ्र सफारी साकारण्यात येणार आहे. तसेच चंद्रपूरमध्ये वन्यजीव बचाव केंद्राची निर्मिती याबाबसुध्दा अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली आहे. वन्यप्राण्यांपासून शेतमालांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सौरकुंपण लावण्यात येणार आहे. कोविड मुळे मृत्यु झालेल्या कुटुंबियांच्या नजीकच्या नातेवाईकाला 50 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात 503 कोटी 63 लक्ष रुपयांचा लाभ बँकेत जमा करण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले, कृषी निर्यात धोरण ठरविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले असून 1 ट्रिलीयनची अर्थव्यवस्था असणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. प्रत्येक जिल्ह्यात 100 खाटांचे स्त्री रुग्णालय उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री कृषी सिंचन योजनेचा विस्तार करण्याला सरकारचे प्राधान्य आहे. तसेच कर्जफेड करणा-या शेतक-याला अनुदान देण्यात येणार आहे. भरड धान्यावर विशेष जोर दिला जाईल.

पुणे जिल्ह्यातील संत जगनाडे महाराज तीर्थक्षेत्रासाठी 10 कोटी रुपये, गोसुखुर्द प्रकल्पासाठी 850 कोटी, विदर्भ – मराठवाडा कापूस सोयाबीन विकासासाठी एक हजार कोटी, विमुक्त, भटक्या व इतर मागस वर्गाच्या सक्षमीकरणाकरीता महाज्योतीला 250 कोटी, कौशल्य विकास योजनेंतर्गत राज्यात पाच हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, आश्रम शाळांसाठी 400 कोटींचा निधी, थोर समाजसेवकांच्या नावाने अध्यापन केंद्र, महापुरुषांच्या जन्मगावातील शाळांना अतिरिक्त निधी, शबरी आदिवासी योजनेंतर्गत शौचालय आदींचा अर्थसंकल्पात समावेश आहे. हा अर्थसंकल्प शेतकरी, सामान्य नागरीक, विद्यार्थी, महिला, मजूरवर्ग या सर्व घटकांच्या विकासासाठी आहे, असे पालकमंत्री अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देतांना म्हणाले.

०००००००

No comments:

Post a Comment