Search This Blog

Wednesday 23 March 2022

रामाळा तलावाच्या खोलीकरणातून निघालेला गाळ पिकांच्या लागवडीस योग्य


रामाळा तलावाच्या खोलीकरणातून निघालेला गाळ पिकांच्या लागवडीस योग्य

Ø शेतक-यांनी स्वखर्चाने नेण्याचे आवाहन

            चंद्रपूर दि. 23 मार्च शहरातील रामाळा तलावात वर्षानुवर्षांपासून वाहून आलेला गाळ मोठ्या प्रमाणात जमा झाला आहे. या तलावाच्या सौंदर्यीकरणास शासनाने मंजुरी दिली असून खोलीकरणाच्या कामाला प्रारंभ झाला आहे. या तलावाच्या गाळाची / मातीची तपासणी जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळा येथे केली असता मातीचा सामू, क्षारता पिकांच्या लागवडीस योग्य आहे. तसेच सेंद्रिय कर्बाचे प्रमाणही चांगले आहे.

            पिकांच्या उत्पादन वाढीस आवश्यक असलेले उपलब्ध नत्राचे प्रमाण चांगले असून या मातीमध्ये स्पुरद व पालाश यांचे प्रमाण भरपूर आढळून आले आहे. मागील वर्षी या सुपिक गाळात टरबूज, कोथिंबीर, भाजीपाला पिकाची प्रायोगि‍क तत्वावर लागवड केली असता चांगले उत्पादन हाती आले.  त्यामुळे शेतीयोग्य असलेला हा गाळ ट्रॅक्टर किंवा इतर साधनांनी शेतात टाकण्यासाठी नि:शुल्क उपलब्ध आहे. या संधीचा शेतक-यांनी लाभ घ्यावा व तलावाचा सुपिक गाळ आपल्या शेतात टाकून शेतीची उत्पादकता वाढवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी व कृषी विभागाने केले आहे.

००००००० 

1 comment:

  1. गाळ वाहतूक करण्याकरिता परवानगी आवश्यक आहे व त्या करिता सिंचन विभाग चंद्रपूर येथील कार्यालयात २ दिवस भेट दिली असता तिथे कुणालाच या संदर्भात माहिती नाही किंवा हेतू पुरस्पर माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. दफ्तर दिरंगाई मुळे गरज असून सुद्धा आम्ही गाळ नेऊ शकत नाही

    ReplyDelete