संबधित संस्थेच्या नोंदणी संदर्भात हरकती व आक्षेप असल्यास कळविण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 25 मार्च : नियोजित हिरा नागरी सहकारी पतसंस्थेचा नोंदणी प्रस्ताव सहाय्यक निबंधक, चंद्रपूर कार्यालयास प्राप्त झाला असून या संस्थेच्या नोंदणी संदर्भात चंद्रपूर तालुका कार्यक्षेत्रातील नागरी सहकारी संस्थाना काही हरकती असल्यास सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, चंद्रपूर या कार्यालयात दि. 28 मार्च 2022 पूर्वी सादर कराव्यात. किंवा 28 मार्च रोजी दुपारी 12 वाजता सदर संस्थेची सुनावणी ठेवण्यात आली असून सुनावणीच्या वेळी सदर हरकती दाखल कराव्यात. या कार्यालयात हरकती प्राप्त न झाल्यास किंवा सुनावणीला हजर न झाल्यास संबंधितांना काहीही म्हणावयाचे नाही, असे गृहीत धरून पुढील कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था,चंद्रपूर कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
००००००
No comments:
Post a Comment