Search This Blog

Monday 21 March 2022

23 मार्च रोजी डाक विभागाच्या विविध योजनांचा मेळावा

 


23 मार्च रोजी डाक विभागाच्या विविध योजनांचा मेळावा

Ø ऊर्जानगर तसेच चंद्रपूर शहरातील नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 21 मार्च:  चंद्रपूर, पोस्टल विभागातर्फे  दि .23  मार्च 2022 रोजी कामगार कल्याण मनोरंजन केंद्र मार्केटसमोर सीटीपीएस वसाहत येथे डाक विभागाच्या विविध योजनांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे.  या मेळाव्यामध्ये आधार सेवा, इंडिया पोस्ट पेमेंट बँक (नवीन खाते उघडणे, आयपीपीबी (IPPB) खाते त्यांच्या पोस्ट ऑफीस बचत (POSB) खात्याशी जोडणे, AEPS पैसे काढणे, आधार नुतनीकरण, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेत नाव नोंदणी  आदी करण्यात येणार आहे.

त्यासोबतच पोस्ट ऑफिस बचत खाते , प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेंशन योजना, माय स्टॅम्प, नवीन पोस्टल विमा तसेच ग्रामीण विमा योजना, गंगाजल विक्री या योजनांचा समावेश आहे. ऊर्जानगर तसेच चंद्रपूर शहरातील सर्व नागरिकांनी आपले ओळखपत्र, (आधारकार्ड, पॅनकार्ड), निवासी पुरावा व 2 पासपोर्ट साइज फोटोसह सकाळी 9 ते सायंकाळी 6  वाजेपर्यंत उपस्थ‍ित राहावे, आणि डाक विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन चंद्रपूर डाक विभागाचे प्रवर डाक अधीक्षक यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment