Search This Blog

Monday, 14 March 2022

संवाद, पोवाडे, नकला व अभिनयाच्या माध्यमातून योजनांची माहिती



संवाद, पोवाडे, नकला व अभिनयाच्या माध्यमातून योजनांची माहिती

Ø शासनाच्या कल्याणकारी योजनांचा जागर 

चंद्रपूर दि. 14 मार्च : शासनाच्या द्विवर्षपुर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूरद्वारे शासनाच्या कल्याणकारी योजनांचा जागर करण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील सुभेदार रामजी बहुउद्देशीय संस्था, लोकजागृती नाट्यकला, शैक्षणिक, सामाजिक संस्था आणि जनजागृती कला व क्रीडा मंडळ या तीन कलापथक संस्थांद्वारे तीन कलापथकाद्वारे गावागावात जनजागृती करण्यात येत आहे. विशेष म्हणजे बोलीभाषेतील संवाद, पोवाडे, नकला, अभिनय आदींच्या माध्यमातून गावक-यांना शासकीय योजनांची माहिती मिळत असल्याने कलापथकांच्या सादरीकरणाला गावक-यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

 या कलापथकाद्वारे आतापर्यंत अवलगाव, भुज (तुकुम), मुडझा, बाळापुर (भुज), मेंडकी, अड्याळ (जाणी), कन्हाळगाव, डोंगरगाव, सिंदेवाही, अमरपुरी, गडपिपरी, भिसी, चेक ठानेवासना, नवेगाव (मोरे), फुटाणा, घाटकुळ, पानोरा, वढोली, सुपगाव, कारवार (खुर्द), कारवार (बु.), नगराळा, नागापूर, खिरडी, माठा, वडगाव, सोनुर्ली, कोहपरा, चनाखा, चुनाळा, बोरचंदेली, मारोडा, खालवंसपेठ, नलेश्वर, चिरोली, चिचपल्ली, दुर्गापूर, भटाळी, घोडपेठ, मोरवा, मोहबाळा, कोंढा या गावांत शासनाच्या विविध योजनांचा जागर करण्यात आला आहे. उशिरा रात्रीपर्यंत चालणा-या या कार्यक्रमांना गावकरी प्रतिसाद देत असून शासकीय योजनांची माहिती जाणून घेत आहे.  

कलापथकांच्या सादरीकरणातून प्रामुख्याने आघाडी सरकारची दोन वर्षातील कामगिरी, सरकारने घेतलेले विविध कल्याणकारी निर्णय, शेतकरी, शेतमजुर, सामान्य नागरीक, विद्यार्थी आदींसाठी राबविण्यात येणा-या योजनांची माहिती देण्यात येते. गावक-यांनी कलापथकांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाने केले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment