23 मार्च रोजी पालकमंत्री चंद्रपूरात
चंद्रपूर, दि. 21 मार्च : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमीन विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे 23 मार्च रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दि. 23 मार्च 2022 रोजी सकाळी 10.15 वा. शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे आगमन व राखीव, सकाळी 11 वा. वीस कलमी सभागृह चंद्रपूर येथे जिल्हा वार्षिक योजनेसंदर्भात आढावा बैठक, दुपारी 12.30 वा. चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब संदर्भात आढावा बैठक, दुपारी 1 वा. कोविड संदर्भात आढावा बैठक, दुपारी 1.30 वा. आदिवासी विकास विभागाची आढावा बैठक, दुपारी 2 ते 2.30 राखीव, दुपारी 2.30 वाजता वीस कलमी सभागृह, चंद्रपूर येथे सिंदेवाही नगर पंचायत अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना व एक्सप्रेस फिडर संदर्भात संबंधित विभागाची आढावा बैठक. सायंकाळी 4 वाजता चंद्रपूर वरून नागपूरकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.
००००००००
No comments:
Post a Comment