Search This Blog

Sunday 28 February 2021

गत 24 तासात 16 कोरोनामुक्त

 


गत 24 तासात 16 कोरोनामुक्त  ; 70 पॉझिटिव्ह

Ø आतापर्यंत 22,953 जणांची कोरोनावर मात

Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 323

 

चंद्रपूर, दि. 28 फेब्रुवारी :  जिल्ह्यात मागील 24 तासात 16 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 70 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 674 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 953 झाली आहे.  सध्या 323 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 14 हजार 752 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 89 हजार 116 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

  जिल्ह्यात आतापर्यंत 398 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 360, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 70 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 15, चंद्रपूर तालुक्यातील तीन, बल्लारपूर तीन, भद्रावती चार, ब्रम्हपुरी एक, मुल पाच, राजुरा एक, चिमूर एक व येथील वरोरा 37 रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0000

Saturday 27 February 2021

गत 24 तासात 22 कोरोनामुक्त

 

गत 24 तासात 22 कोरोनामुक्त  ; 46 पॉझिटिव्ह  

Ø  आतापर्यंत 22,937 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 269

 

चंद्रपूर, दि. 27 फेब्रुवारी :  जिल्ह्यात मागील 24 तासात 22 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 46 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 604 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 937 झाली आहे.  सध्या 269 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 13 हजार 958 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 88 हजार 474 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

  जिल्ह्यात आतापर्यंत 398 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 360, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 46 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 14, चंद्रपूर तालुक्यातील एक, बल्लारपूर चार, भद्रावती 13, ब्रम्हपुरी एक, मुल एक, गोंडपिपरी तीन, राजुरा दोन, वरोरा तीन, कोरपना दोन व इतर ठिकाणच्या दोन रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0000

सलुन पार्लर आता दर सोमवारी बंद

 सलुन पार्लर आता दर सोमवारी बंद  

Ø  कोरोना पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी यांचे आदेश

 

चंद्रपूर दि.२७ , कोरोना पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्हयातील सलुन, स्पा, बार्बर शॉप, ब्युटीपार्लर, केस कर्तनालय इ. दुकाने व आस्थापना आता दर सोमवारी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले आहेत.

  महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांनी जिल्ह्यातील सर्व सलुन/पार्लर सप्ताहातील एक दिवस पुर्णत: बंद ठेऊन, दुकान/आस्थापना व त्यातील सर्व साहित्यांची साफसफाई करुन निर्जंतुकीकरण करण्याकरिता जिल्हा प्रशासनास याबाबतचे आदेश निर्गमीत करण्यास विंनती केलेली होती. सदर विनंती ही कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीकोणातून योग्य वाटत असल्याने जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी वरील आदेश दिले आहेत. सदर निर्देशाचे पालन न केल्यास संबंधितांवर

 साथरोग प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम  तसेच भारतीय दंड संहिता मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमूद केले आहे.

0000

कृषी विज्ञान केंद्रातर्फे हरभरा पीक शेतीदिनाचे आयोजन


 कृषी विज्ञान केंद्रातर्फे हरभरा पीक शेतीदिनाचे आयोजन  

 चंद्रपूर दि.२७, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान  योजनेअंतर्गत रब्बी हगांमाकरिता हरभरा या पिकाचे प्रात्यक्षिक चंद्रपुर आणि सिंदेवाही या तालुक्यातील हिंगनाळा अणि घोट या गावातील ५० शेतकरी लाभार्थ्यांच्या एकुण २० हेक्टरवर कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाहीतर्फे नुकतेच राबविण्यात आले.

 शेतीदिनाचे आयोजन डॉ. व्ही. जी. नागदेवते, कार्यक्रम समन्वयक, कृविके,सिंदेवाही यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.उमाताई राजु लोनगाडगे,सरपंच हिंगनाळा होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविकेत डॉ.विजय एन. सिडाम, विषय विशेषज्ञ (विस्तार शिक्षण) कृविके, सिंदेवाही यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा तसेच कृषी विद्यापीठ विकसीत वाणाचा वापर करून कडधान्य पिकामधील उत्पन्न वाढवावे त्यातून शेतक-यांनी आपले उत्पन्न व कृषि क्षेत्रात विकास घडुन आणावा अशी अपेक्षा व्यक्त केले. शेतक-यांना प्रात्यक्षिकासाठी देण्यात आलेल्या हरभरा या पिकाची जॉकी -९२१८ या वाणाचे लागवड तंत्रज्ञानविषयी आणि हरभरा या पिकाचे काढणी पश्चात तंत्रज्ञान विषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

 डॉ.सोनाली लोखंडे विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या)यांनी माती परिक्षणाचे महत्व व पध्दत याविषयी प्रा. पी. पी. देशपांडे विषय विशेषज्ञ (पीकसंरक्षण)यांनी हरभरा पिकामधील एकात्मीक किड व रोग नियंत्रण विषयी आणि भास्कर एन.गायकवाड(कृषी अधिकारी)यांनी पिकेल ते विकेल अभियान तसेच शासनाच्या विविध योजना विषयी सखोल मार्गदर्शन केले. गजानन लोनगाडगे आणि आनंदराव लोनगाडगे या लाभार्थी शेतकरी, यांनी हरभरा या पिकाच्या जॉकी -९२१८ या वाणाच्या उत्पादनाविषयीक प्रात्यक्षिक राबवितांना कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केल्याचे समाधान व्यक्त केले.

उपस्थित शेतक-यांना कृषी संवादीनीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन कु.यु.एस.नाईक,कृ.स.हिंगनाळा यांनी केले. शेती दिनाला गावातील लाभार्थी शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित होते. सदर शेतीदिनाचे आयोजन यशस्वीरीत्या राबविण्याकरीता व्ही.जी.माने,यांनी मोलाचे सहकार्य केले.

0000

दुचाकी वाहनाकरिता नवीन मालिका सुरु

 दुचाकी वाहनाकरिता नवीन मालिका सुरु  

 चंद्रपूर दि. २७, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथे दुचाकी वाहनाकरिता एम.एच. ३४ बी.व्ही.-०००१ ते एम.एच. ३४ बी.व्ही.-९९९९ ही मालिका सुरु करण्यात आली असुन दुचाकी वाहनाचा आकर्षक क्रमांक व पसंती क्रमांक  शासनाने नेमुन दिलेली विहित फी भरुन प्राप्त करून घेता येईल.

आकर्षक क्रमांकाविषयी आवश्यक ती माहिती  परिवहन विभागाची वेबसाईट https://parivahan.gov.in/fancy या पोर्टल वर असून यावर पसंतीचा क्रमांक ऑनलाईन पध्दतीने आरक्षित करता येईल. तसेच सदर क्रमांकाकरिता ऑनलाईन रक्कम अदा करता येईल असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.

0000

Friday 26 February 2021

अपघातग्रस्त रुग्णांची पालकमंत्र्यांकडून सांत्वना




 

अपघातग्रस्त रुग्णांची पालकमंत्र्यांकडून सांत्वना

चंद्रपूर, दि. 26 फेब्रुवारी :   सिंदेवाही येथे काल लग्न वऱ्हाडाच्या ट्रक अपघातात जखमी झालेल्या नागरिकांची पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज जिल्हा शासकीय रुग्णालयात भेट घेऊन आस्थेने चौकशी केली. यावेळी रुग्णालयात उपचरार्थ भरती असलेल्या देवराव अटरगडे, यशवंत मेश्राम, मंजू कोरटनाके, पवन टिकरे, आलीशा उईके, निशा मेश्राम व इतर जखमींना 'काही काळजी करू नका, सर्व व्यवस्थित होईल'  असा धीर त्यांनी दिला.

            मतदार संघात काल मोठा अपघात झाल्याने सर्व कामे थांबवून जखमींना पाहण्यासाठी मुंबईहून तातडीने चंद्रपूर येथील रुग्णालयात आलो असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अपघातातील जखमींची काळजी घेण्यात येत असून जखमींवर आवश्यकतेनुसार ऑपरेशन व तातडीने उपचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले असून अपघात थांबविण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री यांच्यासमवेत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता निलेश तुमराम, शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख ललित तामगाडगे, समन्वयक उमेश आडे सोबत होते.

0 0 0

जळीत बांबू प्रशिक्षण केंद्राची पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून पाहणी



 

जळीत बांबू प्रशिक्षण केंद्राची पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून पाहणी

Ø आगीच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय तज्ञ समिती नेमणार

 

चंद्रपूर, दि. 26 फेब्रुवारी :   चिचपल्ली येथील बांबू प्रशिक्षण केंद्राच्या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या घटनेची चौकशी करण्यासाठी आय.ए.एस. अधिकारी यांच्या मार्गदर्शनात तांत्रीक बाबींची माहिती असलेल्या तज्ञ सदस्याची उच्चस्तरीय समिती नेमण्यात येईल, असे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज सांगितले.

चिचपल्ली येथील बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्राची निर्माणाधीन इमारत काल आगीत जळाल्याने त्याची पाहणी आज पालकमंत्री वडेट्टीवार यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी त्यांचेसमवेत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता सुषमा साखरवडे, चिचपल्ली बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्राच्या संचालक के.एम.अभर्णा, वन अधिकारी सुशील मंतावार प्रामुख्याने उपस्थित होते.

000

गत 24 तासात 18 कोरोनामुक्त


 गत 24 तासात 18 कोरोनामुक्त  ; 45 पॉझिटिव्ह

Ø  आतापर्यंत 22,915 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 245

चंद्रपूर, दि. 26 फेब्रुवारी :  जिल्ह्यात मागील 24 तासात 18 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 45 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 558 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 915 झाली आहे.  सध्या 245 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 13 हजार 117 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 87 हजार 644 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

  जिल्ह्यात आतापर्यंत 398 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 360, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 45 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 15, चंद्रपूर तालुक्यातील तीन, बल्लारपूर चार, भद्रावती तीन, नागभिड एक, मुल तीन, राजुरा एक, चिमूर पाच, वरोरा आठ व कोरपना येथील दोन रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0 0 0

कोव्हिड-19 अनुषंगाने प्रवासी वाहतुकदारांना प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना

 


कोव्हिड-19 अनुषंगाने प्रवासी वाहतुकदारांना प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना

Ø  प्रत्येक फेरीअंती प्रवासी बसचे निर्जंतुकिकरण आवश्यक

Ø  मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देऊ नये

Ø  बसच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर व अतिरिक्त मास्क ठेवावे

Ø  प्रवाशांचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, शरीराचे तापमान याबाबतचे अभिलेख ठेवणे

Ø  वाहन चालक व वाहक यांची १५ दिवसांमध्ये एकदा आरटीपीसीआर चाचणी

Ø  नमुद आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूकीस मनाई

 

चंद्रपूर, दि. 26 फेब्रुवारी :  चंद्रपूर जिल्ह्यात व लगतच्या यवतमाळ, वर्धा, नागपूर व अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने खाजगी बस वाहतुकदार, टॅक्सी व ऑटोरिक्षा संघटना यांच्यासाठी आंतरजिल्हा व जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी मानक कार्यपद्धतीचे पालन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले आहेत.

या मानक कार्यपद्धतीनुसार खाजगी प्रवासी बस ऑपरेटर व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी कोव्हीड-19 महामारी च्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने तसेच परिवहन विभागाने निर्गमित केलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे. मोटार वाहन नियमातील तरतुदीनुसार लोकसेवा वाहनाच्या प्रत्येक चालकाने प्रवासाच्या प्रत्येक दिवशी/प्रत्येक फेरीअंती प्रवासी बसचे निर्जंतुकिकरण करावे. बसचे आरक्षण कक्ष/कार्यालय, चौकशी कक्ष यांची वेळोवेळी स्वच्छता करावी. तसेच सदर ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर असताना मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. बसेस जिथे उभ्या राहतात त्याठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये. बसच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर ठेवण्यात यावे. तसेच बसमध्ये प्रवाशांच्या वापरासाठी काही अतिरिक्त मास्क ठेवण्यात यावेत. बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात यावी.

एखाद्या प्रवाशास ताप, सर्दी-खोकला इ. प्रकारची कोव्हीड १९ आजाराची लक्षणे दिसत असल्यास, अशा प्रवाशांना बसमधून प्रवास करण्यास प्रतिबंध करण्यात यावा व याबाबत तात्काळ शासकिय यंत्रणेला रुग्णाची माहिती कळविण्यात यावी. चालकाने प्रवासादरम्यान जेवण /अल्पोपहार/प्रसाधनगृहाचा वापर याकरीता बस थांब्यावरील ठिकाणे स्वच्छ असल्याची खातरजमा करावी. बसमध्ये चढताना/उतरताना तसेच प्रवासादरम्यान खानपानाकरीता व प्रसाधनगृहाच्या वापराकरीता बस थांबविली असताना प्रवाशांनी एकमेकांशी सुरक्षित अंतर ठेवण्याची दक्षता घेण्याबाबत प्रवाशांना सुचना देण्यात याव्यात. प्रवाशांना बसमध्ये कचरा फेकू देवू नये, कचऱ्यासाठी कचराकुंडीची वापर करण्याच्या व बसमध्ये स्वच्छता राखण्याच्या सुचना देण्यात याव्यात. प्रवासी बसचे निर्जंतुकिकरण करणे तसेच प्रत्येक फेरीतील प्रवाशांचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, शरीराचे तापमान याबाबतचे अभिलेख ठेवणे याची जबाबदारी परवानाधारकाची असेल.  बसचे वाहन चालक व वाहक यांची आरटीपीसीआर चाचणी १५ दिवसांमध्ये किमान एकदा करुन परिवहन व पोलीस विभागाचे तपासणी अधिकारी यांना मागणी केल्यानंतर दाखविण्यात यावे.

ऑटोरिक्षा/टॅक्सी/पर्यटक कॅब यांकरीता मानक कार्यपध्दती :-

मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना ऑटोरिक्षा/टॅक्सी/पर्यटक कॅब मध्ये प्रवेश देण्यात येऊ नये. तसेच वाहनामध्ये सॅनिटायझर ठेवण्यात यावे. तसेच प्रवाशांच्या वापरासाठी काही अतिरिक्त मास्क ठेवण्यात यावेत. वाहनाच्या प्रत्येक चालकाने आपले वाहन स्वच्छ व निर्जंतुकिकरण केलेल्या स्थितीत ठेवणे आवश्यक आहे. ऑटोरिक्षा/टॅक्सी/पर्यटक कॅब मध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांपैकी एखादया प्रवाशास ताप, सर्दी-खोकला इ. प्रकारची कोव्हीड १९ आजाराची लक्षणे दिसत असल्यास, अशा प्रवाशांना वाहनातून प्रवास करण्यास प्रतिबंध करण्यात यावा व याबाबत तात्काळ शासकिय यंत्रणेला रुग्णाची माहिती कळविण्यात यावी. नमुद आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक वाहनातुन करण्यात येऊ नये.

उपरोक्त सुचनांचे पालन न केल्यास परवानाधारकांविरुध्द मोटार वाहन अधिनियम १९८८, केंद्रीय मोटार

वाहन नियम १९८९ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदिनुसार उचित कायदेशिर कारवाई करण्यात

येइल असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

0000

उद्योजकांनी महास्वयंम या संकेतस्थळावर नोंदणी करून सुविधांचा लाभ घ्यावा

 

उद्योजकांनी महास्वयंम या संकेतस्थळावर नोंदणी करून सुविधांचा लाभ घ्यावा

चंद्रपूर, दि. 26 फेब्रुवारी :  महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभागाच्या सर्व सेवा आता www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने विनामुल्य

पुरविण्यात येतात. यामुळे कोणीही कोठूनही अत्यल्प श्रम व कालावधीत विनामूल्य यांचा लाभ घेवू शकतो. हे

संकेतस्थळ वापरकर्त्यासाठी समजण्यास अतिशय सुलभ असून,पुरविण्यात आलेल्या सर्व सुविधा गरजू

उद्योजकांसाठी निश्चितच उपयुक्त आहेत. त्याकरीता उद्योजकांना www.rojgar.mahaswayam.gov.in या

संकेतस्थळावर नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यास तत्पर असल्याचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंदा्रतर्फे कळविण्यात आले आहे.

उद्योजकांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा.

उद्योजक म्हणून नोंदणी करणे,नवीन प्लान्ट/शाखेची स्वतंत्र नोंद करणे. प्रोफाईल अद्यावत करणे,(पत्ता,संपर्क अधिकारी,दूरध्वनी, भ्रमणध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी, यामधे दुरुस्ती करणे),पासवर्ड रिसेट करणे, वेळोवेळी निर्माण होणारी रिक्तपदे अधिसूचित करणे, त्याअन्वये नोंदविलेल्या मागणीनुसार सिस्टीमव्दारे पुरस्कृत पात्र उमेदवारांची यादी मिळविणे, विनामुन्य या पदाची प्रसिध्दी देणे. सदर यादी पीडीएफ किंवा एक्सेल मध्ये डाऊनलोड करणे, मुलाखती आयोजित करणे. प्राथमिकरित्या निवडलेल्या उमेदवारांना सिस्टीमव्दारे विनामुल्य पाठविण्यांची सुविधा, मुलाखत प्रक्रियेनंतर रुजू झालेल्या उमेदवारांचे प्लेसमेंट नोंदविणे या सुविधा उद्योजकांना उपलब्ध करून दिल्या आहेत.

त्रैमासिक मनुष्यबळ विवरणपत्र ईआर-1  करणे, तसेच प्रत्येक आस्थापनांमध्ये निर्माण झालेली रिक्तपदे प्रत्यक्षात भरण्यापूर्वी कमीत कमी १५ दिवस अगोदर स्थानिक जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे रितसर अधिसूचित करणे आवश्यक आहे. अशाप्रकारे कळविलेल्या जागांसाठी उमेदवारांची शिफारस केल्यानंतर, त्याच्या निवडीबाबतचा निर्णय झाल्यावर १५ दिवसात कार्यालयास कळविणे आवश्यक आहे. त्यामूळे नोकरी मिळालेल्या उमेदवारांची माहिती बिनचूक मिळवून इतर गरजू उमेदवारांचीच शिफारस केली जाते, म्हणून निवडीची माहिती त्वरीत देणे जरुरीचे ठरते.

विविध रोजगार मेळाव्यांची सर्वकष माहिती मिळविणे, त्यासाठी रिक्तपदे अधिसूचित करुन थेट सहभाग नोंदविण्याची सुविधा, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेमध्ये सहभाग घेणे, प्रशिक्षणार्थीची निवड करणे, त्यांना योजनेमध्ये समाविष्ठ होण्यास अनुमती देणे, उमेदवारांची मासिक उपस्थिती नोंदविणे, विद्यावेतन प्रतिपूर्ती मागणी सादर करणे, ही सर्व कामे ऑनलाईन पध्दतीने करता येतात. यासाठीचे विद्यावेतनाच्या प्रतिपूर्तीचे सर्व क्लेम आरटीजीएस पध्दतीने थेट उद्योजकांच्या खात्यात विनाविलंब जमा करण्यांत येतात.

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी तसेच केंद्र शासनामार्फत जिल्हा कार्यालयाद्वारे राबविण्यांत येत असलेले विविध कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे किंवा त्यामध्ये सहभाग घेणे. उद्योजकांसाठी विविध शैक्षणिक पात्रता व कौशल्य प्राप्त नोंदणीकृत होतकरू उमेदवारांचा नोंदणीपट तर उमेदवारांसाठी सर्वच वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत उद्योग, उपक्रमातील नोंदणीकृत सक्षम उद्योजकांचा नोंदणीपट उपलब्ध आहे.

            उद्योजकांना पोर्टलवर नोंदणी करण्यासंदर्भात काही अडचणी असल्यास कार्यालयात अथवा chandrapurrojgar@gmail.comasstdiremp.chandrapur@ese.maharashtra.gov.in  या इमेलवर किंवा 07172-252295 यावर संपर्क करावा असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंदा्रचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी कळविले आहे.

Thursday 25 February 2021

गत 24 तासात चार कोरोनामुक्त

 


गत 24 तासात चार कोरोनामुक्त 

42 पॉझिटिव्ह ; एक मृत्यू

Ø  आतापर्यंत 22,897 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 218

चंद्रपूर, दि. 25 फेब्रुवारी :  जिल्ह्यात मागील 24 तासात चार जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 42 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधीताचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 513 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 897 झाली आहे.  सध्या 218 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 12 हजार 162 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 86 हजार 786 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये वरोरा तालुक्यातील 16 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 398 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 360, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 42 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 16, बल्लारपूर दोन, भद्रावती सहा, मुल एक, राजुरा चार व वरोरा येथील 13  रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0 0 0

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा

 

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा

कोरोना टास्क समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे निर्देश

चंद्रपूर, दि. 25 फेब्रुवारी :   कोरोना पॉझेटिव्ह अहवाल येणाऱ्या बाधीत रूग्णांच्या संपर्कातील जास्तीत जास्त नागरिकांचा शोध घेवून त्यांच्या तपासण्या करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज कोरोना टास्क समितीच्या आढावा बैठकीत दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वीस कलमी सभागृहात आयोजित कोरोना टास्क समितीच्या बैठकीला अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, जिल्हा आरोग्य अधिकारी, राजकुमार गहलोत, प्रभारी वैद्यकीय अधिष्ठाता बंडू रामटेके, म.न.पा.चे वैद्यकीय अधिकारी अविष्कार खंडारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, लसीकरण अधिकारी डॉ. संदिप गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की ज्या भागात कोरोना बाधीत रूग्णवाढीचा दर जास्त प्रमाणात आहे, त्या भागात विशेष चमुद्वारे सर्वेक्षण करून कोरोना सदृष लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांच्या तपासण्या वाढविल्यास कोरोना फैलाव रोखता येईल व वेळीच रूग्णाची ओळख पटल्याने औषधोपचाराद्वारे कोरोना मृत्यूचा संभाव्य धोकादेखील टाळता येईल. दुसरा सिरो सर्व्हे तातडीने सुरू करण्याचे निर्देश देतांना सामान्य रूग्णालयाने कोरोना प्रश्नावर गंभीर होण्याची आवश्यकता असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

दि. 1 मार्च पासून 45 वर्षावरील व्याधीग्रस्त व 60 वर्षावरील सर्व  नागरिकांचे लसिकरण करण्याचे शासनाचे निर्देश असून याबाबत आरोग्य यंत्रणेने पुर्ण तयारी करून ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.

बैठकीला आरोग्य व प्रशासकीय यंत्रणेचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

0 0 0

बांबू प्रशिक्षण केंद्राला आग

 

बांबू प्रशिक्षण केंद्राला आग : पालकमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

 

चंद्रपूर, दि. 25 फेब्रुवारी :   चंद्रपूर येथील चिचपल्ली बांबू प्रशिक्षण केंद्राच्या निर्माणाधीन इमारतीला आज दु. 3.45 च्या सुमारास आग लागली. ही इमारत बांबूपासून बनवण्यात येत होती. आग कशामुळे लागली व सुरक्षेसाठी काय खबरदारी म्हणून काय उपाययोजना आखण्यात आल्या होत्या यासह इतर बाबींची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यंत्रणेला दिले आहेत.

            दरम्यान आगीच्या ठिकाणी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी भेट देवून पाहणी केली. आगीत कोणतीही जीवीत हाणी झाली नसून सुमारे 9 ते 10 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसाण झाले असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

0000

अपघातग्रस्त लग्न वऱ्हाडातील जखमीकरिता



अपघातग्रस्त लग्न वऱ्हाडातील जखमीकरिता

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तातडीने केली उपचाराची व्यवस्था

चंद्रपूर, दि. 25 फेब्रुवारी :   सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे आज दुपारी विवाह सोहळा आटोपून परत जात असलेल्या लग्न वऱ्हाडाच्या ट्रकला कच्छेपार येथे नर्सरीजवळील झाडावर आदळून अपघात झाल्याने पाच वऱ्हाडी ठार तर 22 वऱ्हाडी जखमी झाले होते. याबाबत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना फोनवर माहिती मिळताच त्यांनी याची तात्काळ दखल घेवून जखमींवर उपचाराची व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या.

पालकमंत्री वडेट्टीवार आज मंत्रालयातील बैठकीत व्यस्त असतांनाही त्यांनी तात्काळ जिल्हा आरोग्य अधिकारी, सिंदेवाही येथील आरोग्य यंत्रणा व प्रशासकीय यंत्रणेला तसेच पालकमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या व जखमीवर उपचाराची व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या. अपघातात जखमींना तातडीने उपचाराची सोय झाली असल्याचे पालकमंत्री यांचे कार्यालयातून कळविण्यात आले आहे.

0000

Wednesday 24 February 2021

गत 24 तासात 19 कोरोनामुक्त

 


गत 24 तासात 19 कोरोनामुक्त ; 34 पॉझिटिव्ह

Ø  आतापर्यंत 22,893 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 181

चंद्रपूर, दि. 24 फेब्रुवारी :  जिल्ह्यात मागील 24 तासात 19 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 34 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 471 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 893 झाली आहे.  सध्या 181 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 11 हजार 294 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 86 हजार 140 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 397 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 359, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 34 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 10, चंद्रपूर तालुका सात, बल्लारपूर एक, भद्रावती नऊ, मुल दोन, सावली एक, गोंडपिपरी एक, राजुरा एक, चिमुर एक व वरोरा येथील एका रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0 0 0

रोजगार हमी योजनेत भागीदारीसाठी स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव आमंत्रित

 रोजगार हमी योजनेत भागीदारीसाठी स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव आमंत्रित

               चंद्रपूर, दि. 24 फेब्रुवारी :  शासनाच्या दि. 13 जानेवारी, 2021 च्या परिपत्रकान्वये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये सिएसओ, एफपीओ, सीबीओ, एनजीओ इत्यादी स्वयंसेवी संस्थांच्या अखर्चिक भागीदारी बाबत निर्देश असून त्याअनुषंगाने विहित बाबींची पुर्तता करणाऱ्या इच्छुक स्वयंसेवी संस्थांकडून 3 मार्च 2021 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

               अर्ज सादर करण्यासाठी  संबंधीत संस्थेची विना आर्थिक सहाय्याचे काम करण्याची तयारी असावी,  शासकीय क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असावा, जलसंधारण किंवा सामुदायिक विकासाचे नियोजन क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असणाऱ्या प्राधान्य देण्यात येईल. अशा स्वयंसेवी संस्थांचे प्रशासकीय संघटन आवश्यक त्या जिल्हयात असावे. सदर स्वयंसेवी संस्था निती आयोगाच्या एनजीओ पोर्टलवर नोंदणीकृत असावी.

               उपरोक्त निकषांची पुर्तता करणाऱ्या स्वयंसेवी संस्थानी दि. 03 मार्च 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत उपजिल्हाधिकारी (रोहयो) शाखा जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावेत.  स्वयंसेवी संस्थांची निवड प्राप्त अर्जानुसार प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे करण्यात येणार असून मुलाखतीचा वेळ व दिनांक स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.

0000

मास्क न वापरणाऱ्यांकडून तीन दिवसात दहा लाख दंड वसूल

 मास्क न वापरणाऱ्यांकडून तीन दिवसात दहा लाख दंड वसूल

               चंद्रपूर, दि. 24 फेब्रुवारी :  जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने मास्क वापरणे, सामाजिक अंतराचे पालन करणे व गर्दी न करण्याबाबत नागरिकांना आवाहन केले आहे. कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या गैरजबाबदार नागरिकांवर प्रशासनाने कडक कारवाई सुरू केली असून दि. 19 फेब्रुवारी  ते 21 फेब्रुवारी 2021 या तीन दिवसात प्रशासनाने 1337 आस्थापनांना भेट देवून पाहणी केली. याप्रसंगी कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या 20 आस्थापनांवर 39 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला तर मास्कचा वापर न करणाऱ्या 4625 नागरिकांकडून रु.9 लाख 86 हजार 540 दंड वसूल करण्यात आला असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड यांनी कळविले आहे.

000

Tuesday 23 February 2021

गत 24 तासात 25 कोरोनामुक्त

 

गत 24 तासात 25 कोरोनामुक्त ; 55 पॉझिटिव्ह

Ø  आतापर्यंत 22,874 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 166

चंद्रपूर, दि. 23 फेब्रुवारी :  जिल्ह्यात मागील 24 तासात 25 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 55 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 437 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 874 झाली आहे.  सध्या 166 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 10 हजार 511 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 85 हजार 250 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 397 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 359, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 55 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 20, बल्लारपूर चार, भद्रावती आठ, मुल तीन, सावली दोन, राजुरा दोन, चिमुर चार, वरोरा 10  व इतर ठिकाणच्या दोन रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0 0 0

पंडीत दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा 24 ते 26 फेब्रुवारीला

 


पंडीत दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा 24 ते  26 फेब्रुवारीला

 

चंद्रपूर, दि. 23 फेब्रुवारी :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर या कार्यालयाचे वतीने दिनांक 24 ते 26 फेब्रुवारी,2021 रोजी पंडीत दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा  आयोजित केलेला आहे.

            च्छुक ऊमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर स्वत:ची नांव नोंदणी करावे. ज्यांनी यापूर्वी नाव नोंदणी केलेले असेल अशा सर्व उमदवारांनी आपल्या युजर आयडी व पासवर्डने लॉग ईन करुन दिनांक 24 ते 26 फेब्रुवारी 2021, रोजी  वेबपोर्टलवर नोंद केलेल्या उद्योजकांच्या रिक्त पदांकरीता उद्योजकांनी नमुद केलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अप्लाय करावे. यानंतर उद्योजकांसोबत व्हाट्सअप, गुगल मिट व्हिडिओ कॉलींग इ. च्या माध्यमातून मेळावयाचे दिवशी संपर्क साधून ऑनलाईन मुलाखत द्यावी व ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे लाभ घ्यावा, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्याजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भै.गो. येरमे यांनी कळविले आहे.

*****

ऑनलाईन जातवैधता अर्जासाठी 25 फेब्रुवारीला वेबीनारद्वारे मार्गदर्शन

 ऑनलाईन जातवैधता अर्जासाठी 25 फेब्रुवारीला वेबीनारद्वारे मार्गदर्शन

चंद्रपूर, दि. 23 फेब्रुवारी :  जिल्ह्यातील मागासवर्गीय उमेदवारांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीकरीता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, चंद्रपूर कार्यरत असून, समितीद्वारे विज्ञान बारावीचे मागासवर्गीय विद्यार्थी, व्यावसायीक अभ्यासक्रमातील विद्यार्थी, मागास प्रवर्गातून नियुक्त असणारे अधिकारी/कर्मचारी, मागासप्रवर्गातून निवडणूकांकरीता इच्छूक उमेदवार इत्यादींच्या मागणीनुसार  जात वैधता प्रमाणपत्र निर्गमीत करण्यात येते. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव लक्षात घेता कार्यालयीन गर्दी कमी करुन अर्जदारांना ऑनलाईन पध्दतीने वैधता प्रमाणपत्र मिळावे याकरीता शासनाने ऑगस्ट 2020 पासून ऑनलाईन सुविधा सुरु केलेली आहे. मात्र यावर अर्ज करतांना उमेदवारांना अनेकदा अडचणी निर्माण होतात. त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्राकरीता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  दिनांक 25 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 2.30 वाजता गुगल मिटद्वारे https://meet.google.com/wsp-nrtk-xkij या लिंकवर वेबीनारद्वारे मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 बेबीनारमध्ये अर्ज सादर कसे करावे, अर्ज सादर करातांना सोबत कोणते दस्तावेज सादर करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन द्वारे ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

            तरी वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज करणाऱ्या मागास प्रवर्गातील उमेदवारांनी, महाविद्यालयीन कर्मचारी, प्राचार्य, विद्यार्थी, पालक, इंटरनेट कॅफे व्यावसायिक इत्यादींनी सदरील वेबीनारमध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर यांनी केले आहे.

 

*****

स्टँडअप इंडिया अंतर्गत मार्जीन मनी योजनेसाठी प्रस्ताव आमंत्रीत

 

स्टँडअप इंडिया अंतर्गत मार्जीन मनी योजनेसाठी प्रस्ताव आमंत्रीत

 

चंद्रपूर, दि. 23 फेब्रुवारी :  , सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 8 मार्च 2019 च्या शासन निर्णयान्वये केंद्र शासनाच्या स्टॅंड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरीता मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आलेली आहे. सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचना दि. 9 डिसेंबर 2020 रोजीच्या शासन  निर्णयानुसार निश्चित करण्यात आलेल्या आहे. सदरचा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे.

सदर योजनेकरीता इच्छूक लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर यांचे कडे शासन निर्णयातील नमूद करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तीची पूर्तता करुन प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.

0000

जिल्हा परिषदेचा वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध

 

जिल्हा परिषदेचा वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध

 

         चंद्रपूर, दि. 23 फेब्रुवारी :  महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 चे कलम 142 व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या नियम 1964 मधील तरतूदीनुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेचा  सन 2019-20 करीताचा वार्षिक प्रशासन अहवाल जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत दि. 05 फेब्रुवारी, 2021 रोजी विषय क्र.2 व ठराव क्र. 2 अन्वये प्रसिध्द करण्यात आला असल्याचे जिल्हा परिषदेद्वारे कळविण्यात आले आहे.

*****

शेतकऱ्यांना हवामान आधारीत कृषी सल्ला


 शेतकऱ्यांना हवामान आधारीत कृषी सल्ला

चंद्रपूर, दि. 23 फेब्रुवारी :  पुढील पाच दिवसात दिनांक २४ ते २८ फेब्रुवारी २०२१ रोजी चंद्रपूर जिल्ह्यात आंशिक ढगाळ हवामान राहून कमाल तापमान ३४.८ ते ३७.० अंश सेल्सिअस तर किमान तापमान १६.८ ते १८.३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून शेतकऱ्यांना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी पुढीलप्रमाणे हवामान आधारीत कृषी सल्ला दिला आहे.

उन्हाळी भुईमूंग-पेरणी –

१.उगवणीनंतर १० दिवसाच्या आत खांडया भरून घ्याव्यात.

२.तननाशकाच्या सहाय्याने तन  व्यवस्थापन करावयाचे असल्यास उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉस इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० टक्के एस.एल.१०० ग्राम क्रियाशील घटक यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टरी ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

हरभरा –फुल ते घाटे अवस्था

१.परिपक्व झालेल्या हरभरा पिकाची तात्काळ काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

२.घाटे अळीने आर्थिक नुकसानीची पातळी (१-२ प्रती मिटर ओळ किंवा ५ टक्के किडग्रस्त घाटे) पार केल्यास नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निबोंळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडीरेक्टीन प्रती ५० मि.ली. किंवा एच.ए.एन.पि.व्ही.(१X१०९) पिओबी/मिली) ५०० एल.ई/हे. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के इसी २० मिली किंवा इमामेक्टीन बॅझोएट ५ टक्के एस.जी. ३ ग्रम किंवा क्लोरॉनट्रीनीप्रोल १८.५ एस.सी. २.५ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

उन्हाळी धान –फुटवे अवस्था

१.         उन्हाळी धान पिकाच्या रोवणीस ३० दिवसानंतर उरलेल्या ५० टक्के नत्राच्या मात्रेपैकी अर्धी मात्रा २५ टक्के (५४किलो) युरीया प्रति हेक्टरी दयावे. खते दिल्यानंतर धान बांधीतील पाणी बांधून ठेवावे.

२.         गादमाशी प्रवण क्षेत्रात रोवणीनंतर १० आणि ३० दिवसांनी दाणेदार फोरेट १० टक्के १० किलो किंवा दाणेदार क्विनालफॉस ५ टक्के ५ किलो प्रति हेक्टरी बांधीमध्ये ५ ते ७ सें.मी. पाणी असतांना टाकावे.

३.         पिकाची वाढीच्या प्राथमिक अवस्थेत २ ते ३ सेंमी व फुटवे फुटण्याच्या अवस्थेत ३ ते ५ सेंमी पाण्याची पातळी ठेवावी.

गहु- दाण्याची दुधाळ अवस्था

१.गहु पिकांमधील उंदीरांचा बंदोबस्त करण्यासाठी आमिषाचा वापर करावा त्यासाठी धान्याचा भरडा ४९ भाग, थोडे गोडे तेल व १ भाग झिंक फॉस्फाईड किंवा ब्रोमोडिओलॉन एकत्र मिसळावे. १० ग्रॅम विषारी आमिष प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळामध्ये टाकावे व बिळाचे तोंड बंद करावे.

२.ढगाळ हवामानामूळे गव्हावरील मावा किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तरी त्याच्या नियंत्रणासाठी थायोमिथाक्झाम २५ टक्के डब्ल्यूजी  १० ते १५ ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही इसी ४० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

करडई –फुल ते बोन्डे

करडई पिकाची पाने व बोन्डे पिवळया पडल्यानंतर पिकाची ताबडतोब कापणी करावी व मळणी करून बी अलग करावे व बियाणे स्वच्छ करून, वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

लाखोळी-शेंगा पक्वता

लाखोळी पिकाची पक्वतेनुसार काढणी कापणी करून उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी केलेले बियाणे स्वच्छ करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

उन्हाळी तीळ- वाढीची अवस्था

१.उन्हाळी तीळ पिकाच्या पेरणीनंतर ७ ते ८ दिवसांनी नागे भरावेत. पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी पहिली व त्यानंतर ८ दिवसांनी दुसरी विरळणी करून दोन रोपात १० ते १५ सें.मी. अंतर ठेवावे.

२.आवश्यकतेनुसार २ ते ३ कोडपण्या/खुरपण्या देऊन व निंदण करून शेत स्वच्छ ठेवावे. तीळ पीक एक महिण्याचे होईपर्यंत शेतात तण होणार नाही याची काळजी घ्यावी.

भाजीपाला पिके- वाढीची अवस्था

भाजीपाला पिकावरील रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के एस.एल. २ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्यात विरघळणारे गंधक २५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून २-३ फवारण्या दर १५ दिवसाचे अंतराने फवारणी करावी.

रासायनिक तणनाशक व किटकनाशकाची फवारणी पावसाची उघडीप पाहूनच करावी. फवारणी करताना संरक्षक किटचा वापर आवश्य करावा. सदर माहिती www.atmachandrapur.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.

000

सावली तालुक्यात प्रतिदिवशी 10 हजार मजुरांना रोजगाराचे नियोजन



सावली तालुक्यात प्रतिदिवशी 10 हजार मजुरांना रोजगाराचे नियोजन

तालुका आढावा बैठकीत पालकमंत्री वडेट्टीवार यांचे प्रतिपादन

Ø  24 तास पाणीपुरवठासाठी एक्सप्रेस फीडर

Ø  कर्मचारी वसाहतीसाठी निधी मंजूर

Ø  सावली पर्यटनाच्या नकाशावर आणण्याचे नियोजन

 

चंद्रपूर, दि. 23 फेब्रुवारी :  सावली तालुक्यात रोजगार हमी योजनेच्या कामावर माहे मार्चपासून प्रतिदिवशी 10 हजार मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल दिली.

            सावली तालुक्यातील विकास कामांचा आढावा काल पालकमंत्री वडेट्टीवार यांनी सिंचई विश्रामगृह, सावली येथे घेतला. यावेळी तहसिलदार परिक्षीत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी मनिषा वजाडे, वन अधिकारी वसंत कांबळे, विस्तार अधिकारी अनिरूद्ध वाडके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभिंयता सुधीर राऊत, विलास चांदेकर, मनसुखलाल बोंगले इ. प्रामुख्याने उपस्थित होते.

            सावली येथे दररोज 24 तास पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी अखंडीत विद्युत उपलब्ध व्हावी म्हणून एक्सप्रेस फीडर बसविण्याकरिता दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्यचे पालकमंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रशासकीय इमारत व आरोग्य विभाग, भूमी अभिलेख, पीडब्ल्युडी च्या कर्मचाऱ्यांकरिता निवासस्थान बांधकामासाठी 13.5 कोटी रुपये व पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाकरिता 5.5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. सावली येथे स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाकरिता ई-लायब्ररी देखील सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

            सावली तालुका पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी असोलामेंढा येथे पर्यटन केंद्र विकसीत करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून सर्व सुविधायुक्त 50 कॉटेज, हॉल, बोटींग सुविधा, आयफेल टॉवर, लाल किल्ला, ताजमहल असे सात जागतिक आश्चर्याच्या फायबर प्रतिकृती येथे बसविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. यातुन किमान 500 स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल असेही त्यांनी सांगितले.

            कोरोनाचा आढावा घेतांना सावली तालुक्यात कोरोना तपासण्या वाढविण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले. तसेच नागरिकांना नियमित मास्क वापरण्यासाठी उद्युक्त करण्याचे व मास्क  न वापरणाऱ्या गैरजबाबदर नागरिकांवर कडक दंडात्मक कार्यवाही करण्याचे त्यांनी सांगितले असता मास्क न वापरणे व कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या नागरिकांकडून मागील चार दिवसात 27 हजार रुपये दंड वसूल केला असल्याची माहिती तहसिलदार परिक्षीत पाटील यांनी दिली.    यावेळी पालकमंत्री वडेट्टीवार यांनी सार्वजनिक बांधकाम, सिंचन, नगरपरिषद, वन विभाग, आरोग्य विभागासह विविध विभागाचा आढावा घेतला. बैठकीला संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

0 0 0