Search This Blog

Wednesday, 17 February 2021

अध्ययन नागरी पतसंस्था नोंदणी संबंधात आक्षेप आमंत्रीत

 अध्ययन नागरी पतसंस्था नोंदणी संबंधात आक्षेप आमंत्रीत 

जिमाका, चंद्रपूर, दि: 17, नियोजीत अध्ययन नागरी पत संस्था, मर्या. चंद्रपूर चा नोंदणी प्रस्ताव सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयास प्राप्त झालेला असुन चंद्रपूर तालुक्यातील नागरी / ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था यांनी या संस्थेच्या नोंदणी संबंधाने आपल्या हरकती कार्यालयात नोंदवाव्या. सदर हरकती दि. 24 फेब्रुवारी 2021 पुर्वी सादर कराव्यात किंवा 24 फेब्रुवारी रोजी दु. 12 वाजता सुनावणी ठेवण्यात आलेली असून सुनावणीचे वेळी सदर हरकती दाखल कराव्यात. कार्यालयात हरकती प्राप्त न झाल्यास किंवा सुनावणीला हजर न झाल्यास संबंधीतांना काही ही म्हणावयाचे नाही, असे गृहीत धरुन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, चंद्रपूर यांनी कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment