Search This Blog

Thursday 4 February 2021

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचा सुधारित दौरा

 


पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचा सुधारित दौरा

 चंद्रपूर, दि.4 फेब्रुवारी :  राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार हे दिनांक 5 व 6 फेब्रुवारी रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

दि. 5 फेब्रुवारी 2021 रोजी स. 11 वा. नियोजन भवन चंद्रपूर येथे नागपूरहून आगमन व राखीव. स. 11 वा. गारमेंट क्लस्टर, ब्रम्हपूरीच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील वीसकलमी सभागृह येथे आढावा बैठक. स.11.30 वा. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील चारगाव व रानतळोधी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या समस्येबाबत संबंधीत अधिकाऱ्यांची वीसकलमी सभागृह येथे आढावा बैठक. दु. 12.30 वा. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना दिलेल्या निधीच्या संदर्भात संबंधीत अधिकाऱ्यांची वीसकलमी सभागृह येथे आढावा बैठक.  दु. 2 वा. कर्नाटक एम्हा कंपनीच्या प्रकल्पबाधित / पुनर्वसन संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत वीस कलमी सभागृह येथे आढावा बैठक. दु. 2.30 ते 3 राखीव. दु. 3 वा. चंद्रपूर वरून घुघ्घुसकडे प्रयाण. दुपारी 3.20 वा. एस.एस.सी. सिमेंट कंपनीस भेट व कंत्राटी कामगार समस्या आणि पर्यावरण संदर्भात प्राप्त तक्रारीबाबत कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत बैठक. सायं. 5 वा. घुघ्घुस वरून चंद्रपूरकडे प्रयाण. सायं. 5.30 वा. हिराई विश्रामगृह उर्जानगर, येथे आगमन व मुक्काम.

दि. 6 फेब्रुवारी 2021 रोजी स. 9.30 वा. चंद्रपूर वरून सिंदेवाहीकडे प्रयाण. स. 11 वा. कृषी संशोधन केंद्र, सिंदेवाही, येथे आगमन व कृषी संशोधन केंद्राच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. दु. 12.30 वा. सिंदेवाही शासकीय विश्राम गृह येथे आयोजित सभेस उपस्थिती दु. 2.30 ते 3 वा. राखीव. सायं. 4 वा. सिंदेवाही वरून नागपूरकडे प्रयाण.

0 0 0

No comments:

Post a Comment