उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय@गडचिरोली
4 फेब्रुवारी रोजी गोंडवाना विद्यापीठात आयोजन
चंद्रपूर, दि. 2 फेब्रुवारी : 2, महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय@गडचिरोली हा उपक्रम 4 फेब्रुवारी रोजी गोंडवाना विद्यापीठात दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे उच्च व तंत्र शिक्षण विभागातील मंत्रालय व संचालक स्तरावरील अधिकाऱ्यांसमवेत गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यापीठाचे कर्मचारी, शैक्षणिक संस्था, आदि विविध घटकांच्या अडी-अडचणी ऐकूण घेऊन त्या सोडविणार आहेत.
गोंडवाना विद्यापीठाने सर्व संबंधित घटकांच्या सोयीसाठी विद्यापीठाच्या www.unigug.ac.in या वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय गडचिरोली हे विशेष पोर्टल निर्माण केलेले आहे. येथे नागरिकांना इंग्रजी अथवा युनिकोड मराठीतून आपले प्रश्न मांडता येणार आहे. निवेदनाची सॉप्ट कॉपी जोडण्याची व्यवस्थाही येथे आहे. त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांना आपली निवेदने ऑन लाईन सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ज्यांना ऑनलाईन निवेदन सादर करणे शक्य होणार नाही, त्यांनाही उपस्थित राहून मंत्री महोदयांना आपले निवेदन सादर करता येईल.
चंद्रपूर जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना त्यांच्या अडी-अडचणी विदयापीठाच्या www.unigug.ac.in वेबसाईटच्या मुख पृष्ठावरील उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय@ गडचिरोली या पोर्टल वर मांडता येणार असल्याचे नागपूर येथील सहाय्यक ग्रंथालय संचालक मिनाक्षी कांबळे यांनी कळविले आहे.
*****

No comments:
Post a Comment