Search This Blog

Thursday 18 February 2021

महाडीबीटी पोर्टल - लॉटरी मध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना सूचना

 महाडीबीटी पोर्टल - लॉटरी मध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना सूचना

 

चंद्रपूर, दि. 18 फेब्रुवारी : राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टल वर शेतकरी योजना या शीर्षकाअंतर्गत विविध कृषि विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधे अंतर्गत लाभार्थीनी आपल्या नावाची एकदाच नोंदणी करावयाची असून एकाच अर्जाद्वारे अनेक योजनांचा लाभ त्यांना घेता येणार आहे. सदर सुविधा कार्यान्वित केल्याचे सन २०२०-२१ हे पहिले वर्ष आहे. कृषि विभागाने वरील पोर्टल वर अर्ज करण्यासाठी दि.11 जानेवारी 2021 ही अंतिम तारीख घोषित केली होती. त्यानुसार प्राप्त सर्व अर्जासाठी लॉटरी प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यामध्ये प्राधान्याने कृषि यांत्रिकीकरण, अनुसूचित जाती / अनुसूचित जमातीसाठी नवीन विहीर, कांदाचाळ, प्लॅस्टिक मल्चिंग, सूक्ष्म सिंचन इत्यादी योजनांचा समावेश आहे. निवड झालेल्या शेतकरी बंधूंना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर लघुसंदेश देण्यात आले आहे. निवड झाल्याचा संदेश ज्या शेतकर्‍यांना/लाभार्थिंना प्राप्त झाला आहे. त्यांनी महाडीबीटी पोर्टल वर खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.

संबंधीतांनी https://mahadbtmahait.gov.in/ या महाडीबीटीसंकेतस्थळावर जावे व शेतकरी योजना या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर वापरकर्ता आयडी या पर्यायावर क्लिक करावे. वापरकर्ता आयडी वर क्लिक केल्यानंतर वापरकर्ता आयडी व पासवर्ड व त्याखाली प्रतिमेत दर्शविलेले शब्द भरून लॉग इन यावर क्लिक करा. प्रोफाइल स्थिती पृष्ठावर मुख्य मेनू मधील मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर अप्लाइड घटक मध्ये छाननी अंतर्गत अर्ज  या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपण केलेल्या सर्व अर्जाची स्थिती दिसेल. स्थितीमध्ये Upload Document Under Scrutiny अशा शेरा ज्या घटकासमोर असेल त्या घटकासाठी लॉटरीद्वारे आपली निवड झाली आहे, असे समजावे.

अप्लाइड घटक याच पृष्ठावरील मुख्य मेनूमधील कागदपत्रे अपलोड करा’ या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर वैयक्तिक कागदपत्रे या पर्यायावर क्लिक केल्यानंतर दर्शविलेल्या स्क्रीन वरील कागदपत्र अपलोड करा या पर्यायावर क्लिक करा. कागदपत्र अपलोड करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर कागदपत्र अपलोड स्क्रीन दिसेल. त्यात नमूद केलेली विहित कागदपत्रे १५ केबी ते ५०० केबी या आकारमानातच अपलोड करून ‘जतन करा’ या पर्यायावर क्लिक करा.

वरील कागदपत्रांच्या छाननीनंतर पुढे करावयाच्या कार्यवाही बाबत लाभार्थिंना वेळोवेळी सूचना प्राप्त होतील. सदर कामासाठी आपण आपल्या जवळच्या सामूहिक सेवा केंद्राची मदत घेऊ शकता तसेच यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या ई-मेल वर किंवा ०२० -२५५११४७९   या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उदय पाटील यांनी केले आहे.

000

No comments:

Post a Comment