Search This Blog

Friday, 19 February 2021

बचतगटांच्या महिला झाल्या व्यावसायिक



 

बचतगटांच्या महिला झाल्या व्यावसायिक

देलनवाडी येथे प्रथमच महिलांच्या पुढाकाराने आठवडी बाजार

 

चंद्रपूर, दि. 19 फेब्रुवारी : सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी येथे प्रथमच महिलांच्या पुढाकाराने आठवडी बाजार सुरू झाला आणि पहिल्याच दिवशी सुमारे 17 हजारांची विक्री झाली. सेंद्रिय पद्धतीने उत्पादित भाजीपाला, स्टेशनरीसह मत्स्यविक्री असे एकुण 25 स्टॉलनी यात सहभागी झाले होते. यामुळे स्थानिक उत्पादक तसेच स्थानिक खरेदीदार यांची सोय झाली आहे.

उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, पंचायत समिती सिंदेवाही यांच्या अंतर्गत कार्यरत स्वयंसहायता समुहांच्या महिलांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी महिलांनी पुढाकार घेतला. माउली महिला ग्रामसंघ यांनी ग्रामपंचायत कडून बाजारपेठ सुरू करण्याची परवानगी मिळवली. दि.16 फेब्रुवारी 2021 रोजी या बाजारपेठेचे उद्घाटन करण्यात आले.  कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून जि. प. चे समाजकल्याण सभापती  नागराज गेडाम, अध्यक्ष म्हणून मंदा बाळबुद्धे सभापती,प.स.सिंदेवाही, तर विशेष अतिथी म्हणून गट विकास अधिकारी कुणाल उंदिरवाडे, सरपंच सौ डोंगरावर, श्री रितेश अलमस्त, सदस्य पं.स.सिंदेवाही,  श्री अर्जुनकर, उपसरपंच ग्रा.प.देलनवाडी, श्री बोरकर, ग्रामसेवक व संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक नागरे, तालुका अभियान व्यवस्थापक, सिंदेवाही यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्विते करिता उद्धव मडावी, तालुका व्यवस्थापक, ज्ञानेश्वर मलेवार, प्रभाग समन्वयक सविता उईके प्रभाग समन्वयक, ग्रामसंघ अध्यक्ष लीना आंनदे , सुनीता आंनदे, सुलभा गरमडे, विशाखा रामटेके, अस्मिता लेंझे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. मयूर खोब्रागडे, सचिन लोधे,यांनी सहकार्य केले.

0000

No comments:

Post a Comment