Search This Blog

Wednesday 17 February 2021

गत 24 तासात 26 कोरोनामुक्त

 

गत 24 तासात 26 कोरोनामुक्त

22 पॉझिटिव्ह ; एक मृत्यू

 

Ø  आतापर्यंत 22,779 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 105

 

चंद्रपूर, दि. 17 फेब्रुवारी :  जिल्ह्यात मागील 24 तासात 26 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 22 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 278 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 779 झाली आहे. सध्या 105 बाधितांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत दोन लाख सात हजार 845 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 82 हजार 744 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये आनंदवन वरोरा 76 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 394 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 356, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 22 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 11, चंद्रपूर तालुका एक, बल्लारपूर दोन,भद्रावती एक, राजुरा तीन, वरोरा एक, कोरपना दोन व इतर ठिकाणच्या एका रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0 0 0

No comments:

Post a Comment