Search This Blog

Thursday 11 February 2021

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात रक्तदान शिबीर

 उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात रक्तदान शिबीर

चंद्रपूर, दि. 11 फेब्रुवारी :  ३२ वे रस्ता सुरक्षा अभियानांर्तगत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, रोटरी क्लब व मोटार ट्रेनिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहे. 

यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, यांनी रस्ता सुरक्षा बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. अनंता हजारे, प्रकल्प संचालक अमोल पोतुडे, तसेच, डॉ. विघा बांगडे, रमा गर्ग, कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

0000

No comments:

Post a Comment