Search This Blog

Wednesday 17 February 2021

नाफेडमार्फत चना खरेदीसाठी नोंदणी सुरू

 नाफेडमार्फत चना खरेदीसाठी नोंदणी सुरू

जिमाका, चंद्रपूर, दि: 17, चंद्रपूर जिल्ह्यात नाफेड मार्फत आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत चना खरेदी करने साठी शेतकरी नोंदणी दिंनाक 15 फेब्रुवारी 2021पासुन सुरु करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील ज्या तालुक्यात खरेदी केंद्र सुरु नाही, अशा तालुक्यांना खालीलप्रमाणे इतर तालुक्यांशी जोडण्यात आलेले आहे.

चना खरेदी नोंदणीसाठी चंद्रपूर केंद्राला भद्रावती, पोंभुर्णा, सावली व मुल तालुके जोडण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे खरेदी केंद्र वरोराला वरोरा व भद्रावती, खरेदी केंद्र  चिमुरला ब्रम्हपुरी, सिंदेवाही व नागभिड खरेदी केंद्र गडचांदुरला कोरपणा व जिवती तसेच खरेदी केंद्र राजुराला गोंडपिपरी व बल्लारपुर तालुके जोडण्यात आले आहेत.

तरी दिलेल्या खरेदी केंद्रावर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नोंदणी करणेसाठी आपले आधार कार्ड, मतदान कार्ड, शेतीचा 7/12, बॅक खाते पासबुक इ. संपुर्ण माहीतीसह खरेदी केंद्रावर जावुन नोंदणी करावी, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल गोगीरवार यांनी कळविले आहे.

000

No comments:

Post a Comment