Search This Blog

Thursday 25 April 2024

मतदानाचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् स्पर्धेचा निकाल जाहीर






 मतदानाचा सेल्फीरिल्स्पोस्टर्समिम्स् स्पर्धेचा निकाल जाहीर

Ø मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली होती स्पर्धा

चंद्रपूरदि. 25 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक  - 2024 अंतर्गत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदान केल्याचा सेल्फीरिल्स्पोस्टर्स आणि मिम्स् स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यात सहकार्य केले. या स्पर्धांचा निकाल जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ च्या माध्यमातून नुकताच घोषित करण्यात आला आहे.

सन 2019 च्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी असल्यामुळे यावर्षी 2024 मध्ये मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह निर्माण व्हावालोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवून मतदानाची टक्केवारी वाढावीया उद्देशाने स्वीप अंतर्गत जिल्हा प्रशासनाने वेगवेगळे उपक्रम राबविले. तरुण मतदारांमध्ये रिल्स्पोस्टर्समिम्स् बाबत असलेली प्रचंड उत्सुकता पाहता जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी माय व्होट इज माय फ्युचरपॉवर ऑफ वन व्होट’ या थीमवर रिल्स्पोस्टर्समिम्स् तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरून अपलोड करणेतसेच तुमचे मत द्या आणि आकर्षक बक्षीसे जिंका’ या थीमवर आधारीत मतदान केल्यानंतर शाई लावलेले बोट दाखवत मतदान केंद्रासमोर सेल्फी क्लिक करून फोटो अपलोड करण्याबाबत स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून विजेत्या स्पर्धकांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुढील आठवड्यात नियोजन भवन येथे पारितोषिक वितरीत करण्यात येणार आहे. स्पर्धेचा लकी ड्रा काढतांना जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपवनसंरक्षक श्वेता बोड्डूउपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) श्याम वाखर्डे व इतर अधिकारी उपस्थित होते.

हे आहेत स्पर्धेतील विजेते मतदार : मतदान केंद्रासमोर सेल्फी क्लिक करणे

            या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक (अपाची मोटरसायकल) सुरेंद्र देवराव पोहाणेरा. तुकुम चंद्रपूर यांनाद्वितीय पारितोषिक (रेसींग सायकल) प्रशांत मधुकर गेडामरा. मूल यांना तर तृतीय पारितोषिक (ॲन्ड्रॉईड मोबाईल) अशोक ऋषी बारसागडेरा. चंद्रपूर यांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून घोषित करण्यात आले आहे.

            रिल्स् स्पर्धा : प्रथम पारितोषिक (15 हजार रुपये) आशिष बोबडेरा. टिळक वॉर्डबालाजी मंदीरजवळचिमूर यांनाद्वितीय पारितोषिक (10 हजार रुपये) मंगेश साखरकररा. पालगावपो. आवाळपूरता. कोरपना यांनातृतीय पारितोषिक (5 हजार रुपये) कोमील ज्ञानेश्वर मडावीरा. वॉटर सप्लाय कॉर्टरगोपालनगरतुकुमचंद्रपूर यांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून घोषित करण्यात आले आहे.

            पोस्टर्स स्पर्धा : प्रथम पारितोषिक (5 हजार रुपये) प्रथमेश यशवंत निकोडेरा. नेहरू नगरनवीन वस्तीडीआरसी रोडचंद्रपूर यांनाद्वितीय पारितोषिक (3 हजार रुपये) आचल राजू धोगडेरा. शासकीय कन्या वसतीगृहभिवकुंड (विसापूर) यांनातृतीय पारितोषिक (2 हजार रुपये) वैष्णवी राजू मिलमिलेरा. तिलक वॉर्डबोर्डाता. वरोरा यांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून घोषित करण्यात आले आहे.

            मिम्स् स्पर्धा : प्रथम पारितोषिक (5 हजार रुपये) येवन संतोष येलमुलेरा. सुब्बईता. राजुरा यांनाद्वितीय पारितोषिक (3 हजार रुपये) संजय बाबुराव सोनुनेरा. हुडको कॉलनीअमर चौकचंद्रपूर यांनातृतीय पारितोषिक (2 हजार रुपये) अनुप रंगलाल शाहारा. मच्छीनालामुक्तीकॉलनीचंद्रपूर यांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून घोषित करण्यात आले आहे.

०००००००

Wednesday 24 April 2024

खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा



 

खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

Ø जिल्हाधिका-यांच्या कृषी विभागाला सुचना

Ø जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक

चंद्रपूर दि. 24 : खरीप हंगामाला आता सुरवात होणार आहे. शेतक-यांच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा हंगाम आहे. जिल्ह्यात खते, बियाणे, कृषी निविष्ठा आदींची कमतरता जाणवणार नाही, याबाबत दक्षता घेऊन खरीप हंगामाचे योग्य नियोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी कृषी विभागाला दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रिती हिरुळकर, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, महावितरणच्या अधिक्षक अभियंता संध्या चिवंडे, कृषी विकास अधिकारी विरेंद्र राजपूत, नाबार्डचे व्यवस्थापक तृणाल फुलझेले, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगळे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात बोगस बियाणांची वाहतूक व विक्री होणार नाही, याबाबत पोलिस विभागाच्या सहकार्याने मोहीम राबवावी, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, कृषी यंत्रणांनी पावसाळ्याला सुरवात होण्यापूर्वीच सुक्ष्म नियोजन करावे. जिल्ह्यात खते, बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले पाहिजे, यादृष्टीने आतापासूनच कार्यवाही करावी. खरीप विमा मंडळनिहाय काढणे गरजेचे आहे. जेवढे खरीपाचे क्षेत्र आहे, त्यापेक्षा जास्त क्षेत्राचा विम्यामध्ये समावेश असू नये. यासाठी तालुका कृषी अधिका-यांनी फिल्डवर जावे. तसेच ई-केवायसी बाबत विशेष मोहीम राबवावी. तृणधान्याला चांगली मागणी व भाव असून जिल्ह्यात तृणधान्याचे उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेत. कृषी विषयक माहिती शेतक-यांना बांधावर मिळण्यासाठी प्रात्यक्षिकांची संख्या वाढवावी, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

जिल्ह्यात रब्बी क्षेत्रात वाढ : सादरीकरण करतांना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. तोटावार म्हणाले, जिल्ह्यात एकूण 5 लक्ष 52 हजार 729 हेक्टर (48.30 टक्के) क्षेत्र लागवडीखाली असून खरीप हंगाम 2024 – 25 मध्ये धानासाठी 1 लक्ष 91 हजार हेक्टर, कापूस 1 लक्ष 80 हजार हेक्टर, सोयाबीन 75 हजार हेक्टर, तूर 36 हजार हेक्टर व इतर पिकासांठी पेरणी क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात सरासरी पेरणी क्षेत्र  88245 हेक्टर असून प्रत्यक्षात 1 लक्ष 20 हजार 84 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ही पेरणी सरासरीच्या 136 टक्के आहे.

जिल्ह्यात खतांची उपलब्धता : जिल्ह्यासाठी युरीया, डीएपी, एमओपी, एसएसपी, संयुक्त खते आणि मिश्र खते असे एकूण 1 लक्ष 56 हजार 300 मेट्रीक टन खते कृषी आयुक्तालयाकडून मंजूर झाले आहे. 24 एप्रिल 2024 अखेर जिल्ह्यात 89329 मेट्रीक टन साठा शिल्लक आहे.

०००००

Tuesday 23 April 2024

जिल्हाधिका-यांकडून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा




 

जिल्हाधिका-यांकडून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा

चंद्रपूर दि. 22 : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पार पडली. यावेळी अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटरे, जिल्हा मौखिक कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप पिपरे, डॉ. श्वेता सावलीकर, डॉ. वनिता गर्गेलवार, शिक्षणाधिकारी (माध्य) निकिता ठाकरे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, तंबाखू प्रतिबंध उपाययोजनेबाबत जिल्हाभरात जनजागृती कार्यक्रम घेऊन नागरिकांना तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत अवगत करावे. तसेच शाळा – महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरात तंबाखू विक्री करण्यास मनाई आहे. याबाबत शाळांकडून माहिती मागवून त्यांच्या परिसरात तंबाखू विक्रीची दुकाने नाहीत, याबाबत हमीपत्र घ्यावे. शासकीय कार्यालयामध्येही तंबाखू प्रतिबंधासाठी भरारी पथके स्थापन करावीत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

करण्यात आलेली दंडात्मक कार्यवाही : सिगारेट व इतर तंबाखुजन्य पदार्थ कायदा (कोटपा) कलम – 4 अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने सन 2023-24 मध्ये 566 नागरिकांकडून 55370 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलिस विभागाच्या वतीने गत वर्षी 2076 प्रकरणांमध्ये 4 लक्ष 15 हजार 200 दंड ठोठावण्यात आला. तर अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत नियम व नियमन 2011 प्रतिबंध अन्नपदार्थ कार्यवाही अंतर्गत एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीतमध्ये 15 प्रकरणात 13329 किलो (एकूण किंमत 1 कोटी 44 लक्ष 80 हजार 227 रुपये) साठा जप्त करण्यात आला.

यावेळी मागील सभेचे इतिवृत्त, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत करण्यात येणा-या कार्याचा अहवाल सादर करणे, 31 मे रोजी जागतिक तंबाखु नकार दिन साजरा करणे, जिल्ह्यामध्ये कोटपा कायदा कलम 4, कलम 5, कलम 6 (अ) आणि (ब) प्रभावी अंमलबजावणीबाबत चर्चा करणे, पोलिस, अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेणे, जिल्ह्यातील शाळा तंबाखु मुक्त करणे, तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

०००००००

आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30 एप्रिलपर्यंत

 आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30 एप्रिलपर्यंत

चंद्रपूर दि. 22 : शैक्षणिक वर्ष सन 2024-25 करिता आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया  ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार वंचितदुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना आरटीर्इ अतंर्गत 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेअंतर्गत 16 ते  30 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम2009 मधील सुधारित अधिसूचना नुसार वंचितदुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना आरटीई 25 टक्के  प्रवेशाच्या अनुषंगाने प्राधान्यक्रम ठरविताना विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळाशासकीय शाळा/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा व स्वंयअर्थसहाय्यीत शाळा अशा सर्व प्रकारच्या शाळा असतील. तथापिएखाद्या पालकांनी प्राधान्य म्हणून अनुदानित शाळेऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांची / शासकीय शाळांची निवड करावयाची असल्यास त्यानुसार त्या पालकास शाळा  निवडता येईल. विद्यार्थ्यांच्या निवास स्थानापासून 1 किलोमीटर पर्यंतच्या अतंरावर अनुदानित शाळाशासकीय शाळा,स्थानिक स्वराज्य संस्थांच्याशाळा नसतील व 1 किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर स्वंयअर्थसहाय्यीत शाळा असेल तर अशा परिस्थितीत त्या स्वंयअर्थसहाय्यीत शाळेत मुलांना 25 टक्के प्रवेशांतर्गत प्रवेश दिला जाईल.

अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थ्याच्या निवास स्थापासून 1 किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर शाळा नसेल तर ३ किलोमीटर पर्यंतच्या अंतरावरील शाळांमध्ये प्रवेश उपरोक्त प्राधान्यक्रमांने होतील. मुलांना 25 टक्के प्रवेशअंतर्गत प्रवेशासाठी महानगरपालिका शाळानगरपालिका /नगरपरिषद /नगरपंचायत शाळाकॅन्टोमेंट बोर्डशाळाजिल्हा परिषद प्राथमिक शाळामहानगरपालिका शाळा (स्वंयअर्थ्सहाय्यीत) ,जिल्हा परिषद (माजी शासकीय),खाजगी अनुदानितस्वयअर्थसहाय्यीत शाळा इ. व्यवस्थापनाच्याशाळा निश्चित करण्यात आल्या आहेत. 

प्रवेशाकरीता आवश्यक कागदपत्रे व इतर बाबी : 1. प्रवेश प्रक्रियेसाठी निवासी  पुराव्याकरीता रेशनिंग कार्डड्रायव्हिंग  लायसन्सवीज /टेलीफोन देयकप्रॉपर्टी टॅक्स  देयक /घरपट्टीआधार कार्ड, मतदान ओळखपत्रपासपोर्टराष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ई. यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य राहील. 2. जन्म तारखेचा पुरावा 3. जातप्रमाणपत्र पुरावा (सक्षम अधिकाऱ्यांनी प्रमाणित करून दिलेले जात प्रमाणपत्र असावे)  4. उत्पन्नाचा दाखला उ (उत्पन्नाचा दाखला रु. 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न) प्रवेश प्रक्रिया सुरू होणाऱ्या एक वर्षापूर्वीच्या आर्थिक वर्षातील असावा. 5. दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा- जिल्हा शल्य चिकित्सक/ वैद्यकीय अधिक्षकअधिसूचित जिल्हा शासकीय रुगणालय यांचे 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र 6. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता बालकाचे वय 6 वर्ष आणि अधिक गृहित धरताना मानिव दिनांक 31 डिसेंबर निश्चित करणेत आलेली आहे. 7. पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना Singal Parent,  विधवाघटस्फोटितआई अथवा वडील यापैकी कोणताही एक पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकाचे पालकत्व स्विकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र ग्राह्य धरण्यात येईल

शाळा पुढील कारणांमुळे आरटीई 25 टक्के प्रवेश नाकारू शकेल : अवैध निवासाचा पत्ताअवैध जन्मतारखेचा दाखलअवैध जातीचे प्रमाणपत्रअवैध उत्पन्नाचे प्रमाणपत्रअवैध फोटो आयडीअवैध दिव्यांग प्रमाणपत्र. ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई 25 टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही. प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज भरावा, अनेक अर्ज भरू नयेत. अनेक अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास सदर अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही. अशा पालकांचे अर्ज रद्द करण्यात येतील याची नोंद घ्यावी. पडताळणी समितीद्वारे प्रवेशपात्र  बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल. गटशिक्षणाधिकारी यांनी प्रत्येक बालकाला 3 वेळा प्रवेशाकरिता संधी देवून पालकांनी संपर्क केला नाही अथवा प्रवेशासाठी आले नाही तर विहित मुदतीत आरटीई पोर्टल वर Not Approch करण्यात येईल.

पडताळणी समिती द्वारे रहिवासी पत्तागुगल वरील  पत्ता व वय याबाबत पात्र विद्यार्थ्यांची अचूक खात्री करण्यात येईल. सामाजिक वंचित संवर्गातील विद्यार्थ्यांकरिता जात प्रमाणपत्राची तर आर्थिक  दुर्बल संवर्गातील विद्यार्थ्यांकरिता उत्पन्न प्रमाणप्रत्राची पडताळणी करण्यात येईल. प्रतिक्षा यादीमध्ये नाव आहे याचा अर्थ प्रवेश निश्चित होईलच असा नाही. पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता  RTE Portal वर  वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे व सदरील माहितीचा लाभ घ्यावा. विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी कोणत्याही पालकांच्या अर्जाची किंवा निवेदनाची दखल  घेतली जाणार नाही, याची सर्व पालकांनी गांभिर्याने नोंद घ्यावी. तरी इच्छूक व पात्र पालकांनी आपल्या पाल्याचे सदर ऑनलाईन अर्ज विहित कालावधीमध्ये भरावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केले आहे.

००००००

Monday 22 April 2024

शासकीय अनुदानित आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांकरीता उन्हाळी शिबिराचे आयोजन

 

शासकीय अनुदानित आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांकरीता उन्हाळी शिबिराचे आयोजन

चंद्रपूर दि. 22 : विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून त्यांना समाजात मानाचे स्थन प्राप्त व्हावे, तसेच त्यांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिने  आदिवासी विभाग नियमित प्रयत्नशील असतो.  त्या अनुषंगाने एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत या शैक्षणिक  सत्रात 23 एप्रिल ते 22 मे 2024 या कालावधीत उन्हाळी शिबीर हा उपक्रम राबविला जात आहे. प्रकल्पात पहिल्यादांच अशा उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. सदर उपक्रमाचे आयोजन शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा, बोर्डा ता. जि. चंद्रपूर येथे करण्यात येत आहे.

उन्हाळी शिबिरात शासकीय /अनुदानित आश्रम शाळेतील एकूण 150 विदयार्थी (75 मुले व 75 मुली ) सहभागी होणार आहेत. या शिबिराकरीता विद्यार्थ्यांच्या निवासाचीभोजनाची व प्रशिक्षणाची मोफत सोय करण्यात येणार आहे.

शिबिरात घेण्यात येणारे उपक्रम : 1. योगा प्रशिक्षण  2. आर्चरी प्रशिक्षण 3. गोंडी पेटींग प्रशिक्षण  4. तायक्वांडो प्रशिक्षण 5. व्यक्तिमत्व  विकास प्रशिक्षण 6.  इंग्लिश स्पीकिंग कोर्स 7. संगीत कला प्रशिक्षण.            

या उपक्रमाचे पालकांकडून स्वागत करण्यात आले असून या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टीत शिक्षणाची नाळ जुळून राहण्यास मदत होणार आहे. शिबिरात प्रशिक्षित प्रशिक्षकामार्फत वरील सर्व उपक्रमाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होणार आहेत्यामुळे भविष्यात स्वत: च्या पायावर उभे राहण्याकरीता सदर प्रशिक्षण हे उपयोगी पडणार आहे. प्रकल्पात पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम राबविला जात असल्यामुळे सर्व विद्यार्थी उत्सुक आहेत. शिबिरादरम्यान प्रकल्प कार्यालयातील विविध अधिकारी प्रशिक्षण स्थळी भेट देतील, अशा प्रकारचे नियोजन करण्यात आल्याचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी कळविले आहे.

०००००

Saturday 20 April 2024

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 67.57 टक्के मतदान









चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 67.57 टक्के मतदान

उन्हाच्या तडाख्यातही तीन टक्क्यांची वाढ

चंद्रपूर, दि. 20 : 13 - चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण  67.57 टक्के मतदान झाले. 19 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी 67.57 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे गत आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हाचा तडाखा 42-43 अंशावर असतांनासुध्दा मतदारांनी भरघोस प्रतिसाद देत मतदानाचे कर्तव्य पार पाडले. त्यामुळेच 2019 च्या तुलनेत 2024 च्या निवडणुकीत तीन टक्क्यांची वाढ झाली आहे.  

शुक्रवारी झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राजूरा विधानसभा मतदार संघात 70.09 टक्के, चंद्रपूर 58.43 टक्के, बल्लारपूर 68.36 टक्के, वरोरा 67.73 टक्के, वणी 73.24 टक्के तर आर्णि विधानसभा मतदारसंघात 69.52 टक्के मतदान झाले. 

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लक्ष 37 हजार 906 मतदार आहे. यात 9 लक्ष 45 हजार 736 पुरुष मतदार, 8 लक्ष 92 हजार 122 स्त्री मतदार तर 48 इतर मतदार आहेत. यापैकी 6 लक्ष 58 हजार 400 पुरुष मतदारांनी (69.62 टक्के), 5 लक्ष 83 हजार 541 स्त्री मतदारांनी (65.41 टक्के) तर 11 इतर नागरिकांनी (22.92 टक्के) असे 12 लक्ष 41 हजार 952 (67.57 टक्के) मतदारांनी मतदान केल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

००००००००

Friday 19 April 2024

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 55.11 टक्के मतदान









 

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 55.11 टक्के मतदान

Ø जिल्हाधिका-यांचे रांगेत लागून मतदान

चंद्रपूरदि. 19 : 13 - चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता सकाळी 7 ते दुपारी 5 या वेळेत 55.11 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यात राजूरा 59.14 टक्के, चंद्रपूर 48.20 टक्के, बल्लारपूर 59.06 टक्के, वरोरा 57.56 टक्के, वणी 58.87 टक्के, आर्णि विधानसभा मतदारसंघात 49.70 टक्के मतदान झाले.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लक्ष 37 हजार 906 मतदार आहे. यात 9 लक्ष 45 हजार 736 पुरुष मतदार, 8 लक्ष 92 हजार 122 स्त्री मतदार तर 48 इतर मतदार आहेत. यापैकी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 5 लक्ष 26 हजार 229 पुरुष मतदारांनी (55.64 टक्के), 4 लक्ष 86 हजार 708 स्त्री मतदारांनी (54.56 टक्के) तर पाच इतर नागरिकांनी (10.42 टक्के) असे 10 लक्ष 12 हजार 942 (55.11 टक्के) मतदारांनी मतदान केले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी आज चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदानाला सुरुवात झाली. मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजतापासूनच मतदारांनी हजेरी लावली होती. ठिक-ठिकाणी मतदारांच्या लांब रांगा दिसल्या. दिव्यांग व वरिष्ठ मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाजेपर्यंत 55.11 टक्के मतदान झाले. काही मतदान केंद्रांवर महिला व युवा मतदारांची गर्दी दिसून आली. तसेच पहिल्यांदाच मतदान करणा-यांमध्ये उत्साह निदर्शनास आला. जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदार संघात महिला व्यवस्थापन मतदान केंद्र, दिव्यांग व्यवस्थापन मतदान केंद्र, युवा कर्मचारी व्यवस्थापन मतदान केंद्र आणि आदर्श मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते.

जिल्हाधिकारीही मतदानासाठी रांगेत : जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सहपरिवार येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात सकाळी मतदानाचा हक्क बजावला. सुरवातीला मतदान केंद्राची पाहणी केल्यानंतर मतदान करण्यासाठी ते स्वत: रांगेत उभे राहिले.

०००००००

वाढतोय उष्माघाताचा धोका, खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 वाढतोय उष्माघाताचा धोकाखबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

चंद्रपूर, 19 : चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा वाढत असून तापमान सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताची शक्यता असल्याने नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

जसजसा उन्हाळा तापत जातो तसतसेउष्माघाताचा धोका प्रत्येकासाठी चिंतेचा विषय बनतो. विशेषतः जे घराबाहेर बराच वेळ घालवतात. त्यामुळे शरीरातून घामाच्या धारा निघत असतील तर जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण शरीराला पुरेसे पाणी न मिळाल्यास उष्णता जीवघेणी ठरु शकते. जेव्हा शरीराचे तापमान घोकादायक पातळीपर्यंत वाढते आणि शरीराची शीतकरण यंत्रणा योग्यरित्या कार्य करण्यास अपयशी ठरते तेव्हा ही स्थिती उद्भवू शकते .

उष्माघाताच्या लक्षणांमध्ये शरीराचे उच्च तापमानअनेकदा १०४°F (४०°C) पेक्षा जास्त असते. यामुळे गोंधळचक्कर येणे आणि मळमळ होऊ शकते. नाडीचे ठोके वाढणे आणि डोकेदुखी ही देखील सामान्य लक्षणे आहेत. त्वचा उष्ण आणि कोरडी किंवा ओलसर आणि घाम वाटू शकते. गंभीर प्रकरणांमध्ये बेशुद्ध पडणे किंवा झटके येऊ शकतात. स्वतःला किंवा इतर कोणाला ही लक्षणे दिसल्यास तत्काळ वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे सूर्यप्रकाशात दीर्घकाळ राहणे टाळावे. टोपी तसेच हलक्या रंगाचे कपडे वापरावे. भरपूर पाणी प्यावेसोबतच ओआरएसचा वापर करावा. पाणीयुक्त फळे खावीत. उन्हाळ्यात कॅफिनयुक्त पेये तथा अल्कोहोल पिणे टाळावे. नागरीकांनी सुरक्षित राहण्यासाठी खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे असून वृद्धलहान मुले तसेच पूर्व- अस्तित्वात असलेली वैद्यकीय परिस्थिती ज्यांची चांगली नाही त्यांनी अतिरिक्त काळजी घेणे गरजेचे आहे.

उष्माघात ही एक गंभीर स्थिती आहे मात्र ती साध्या उपायांनी टाळता येते. लक्षणे आढळल्यास ताबडतोब वैद्यकिय मदत घेणे गरजेचे आहे. याकरिता जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे विशेष मार्गदर्शनात जिल्ह्यातील सर्व ग्रामीणउपजिल्हा रुग्णालयप्राथमीक आरोग्य केंद्र तसेच शासकिय वैद्यकिय महाविद्यालयामध्ये कोल्ड वार्ड कार्यान्वित करण्यात आलेले आहे. तसेच आवश्यकता पडल्यास मोफत संदर्भसेवा सुध्दा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. नागरीकांच्या सुविधेकरिताशासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर ०७१७२- २५२१०३ तसेच हेल्पलाईन क्रमांक १०७७११२१०२१०४१०८ टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधता येऊ शकतो. उन्हाळ्यात योग्य ती काळजी घेण्याचे तसेच लक्षणे आढळल्यास ताबडतोब रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याबाबतचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

उष्ण लाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने घ्यावयाची दक्षता

काय करावे ?

पुरेसे पाणी प्याशरीरातील पाण्याची पातळी योग्य राखा. घराबाहेर पडतांना डोके झाकण्यासाठी टोपीरुमाल किंवा छत्रीचा वापर करावा. दुपारी १२ ते ४ वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळावे. थेट येणाऱ्या सुर्यप्रकाशाला/उन्हाला अडविण्याकरिता घरातील पडदे आणि झडपांचा वापर करावा. उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओटिव्हीकिंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा. हलकीपातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.

काय करु नये ?

उन्हात अतिकष्टाची कामे करु नये. दारुचहाकॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नये. दुपारी १२ ते ४ च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नये. लहान मुले किवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. गडदघट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावेतसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्या. चप्पल न घालता अनवाणी उन्हात चालू नये.

उष्णतेचा त्रास झालेल्या व्यक्तीची मदत करीत असतांना या गोष्टीचा अवलंब करावा.

संबंधित व्यक्तीला ताबडतोब थंड ठिकाणी हलवावे. शरीराच्या जास्तीत जास्त भागावर किंवा कपड्यावर थंड पाण्याचा मारा करावाशक्य असेल तेवढा वेळ त्या व्यक्तीला वारा घालावा.

००००००००

जिल्हा परिषदेच्या आकर्षक मतदान केंद्रावर पार पडले मतदान

 

जिल्हा परिषदेच्या आकर्षक मतदान केंद्रावर पार पडले मतदान

चंद्रपूर, दि. 19 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा परिषद चंद्रपूर तर्फे स्वीप मोहीम राबविण्यात येऊन 19 एप्रिल रोजी झालेल्या मतदानप्रसंगी जिल्हा परिषदेतील 9 मतदार केंद्र आकर्षक स्वरूपात सजविण्यात आले होते.  

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवार 19 एप्रिल रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे SVEEP (Systematic Voter's Education and Electoral Participation) अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे सामान्य प्रशासन विभाग - 2, बांधकाम विभाग - 2, उपविभाग बांधकाम - 2 समाजकल्याण विभाग - 2, व सिंचाई विभाग - 1 अशी एकूण 9 मतदान केंद्रे आकर्षक सजावटीने सजविण्यात आली होती.

या मतदान केंद्रांना आकर्षक स्वरूप देतांना जिल्हा परिषदेद्वारे परिसरात विविध आकारातील रंगीत फुगे लावण्यात आले. मुख्य द्वाराला सजविण्यात येऊन मतदानास येणाऱ्या मतदारांचे स्वागत करण्यात येत होते. मतदानाचा टक्का वाढीचा संदेश देणारे घोषवाक्य परिसरात लावण्यात येऊन सेल्फी पॉईंट दर्शनी भागात ठेवण्यात आले होते. उन्हापासून त्रास होवू नये म्हणून प्रत्येक मतदान केंद्रासमोर मंडप उभारण्यात आले. त्याचप्रमाणे मतदारांसाठी थंड पाण्याचीही सोय करण्यात आली होती. मतदारांना त्यांचे नाव शोधण्यास अडचण उद्भवू नये म्हणुन बीएलओ व मतदान केंद्रावरील कर्मचारी वर्गाने मतदारांना पूर्ण सहकार्य केले व मतदान यशस्वीरीत्या पार पाडण्यात महत्वाची भुमिका बजावली.

०००००००

Thursday 18 April 2024

आरटीओ कार्यालयाच्या कामकाज वेळेत बदल


आरटीओ कार्यालयाच्या कामकाज वेळेत बदल

चंद्रपूर दि. १८ :   चंद्रपूर ‍जिल्ह्यातील तापमान वाढ होत असल्यामुळे उष्माघातामुळे कोणीही  बाधित होऊ नये. करिता कार्यालयातर्फे करण्यात येणारे वाहन योग्यता प्रमाणपत्र तपासणी,  पक्की अनुज्ञप्ती चाचणी विषयक कामकाज दि.२२.०४.२०२४ पासून सकाळी ७.०० ते १२.०० वाजेपर्यंत व दुपारी ४.००ते ६.०० वाजेपर्यंतच्या कालावधीत करता येणार आहे. तरी सर्व वाहन चालकांनी याची  नोंद घ्यावीअसे  किरण मोरेप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

000000000

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 18 लक्ष 37 हजार 906 मतदार

 







चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 18 लक्ष 37 हजार 906 मतदार

Ø मतदान साहित्य घेऊन पोलिंग पार्टी रवाना

चंद्रपूरदि. 15 : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 19 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लक्ष 37 हजार 906 मतदार आहे. यात 9 लक्ष 45 हजार 736 पुरुष मतदार, 8 लक्ष 92 हजार 122 स्त्री मतदार तर 48 इतर मतदार आहेत.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 70 – राजुरा, 71 – चंद्रपूर, 72 – बल्लारपूर, 75 – वरोरा, 76 – वणी आणि 80 – आर्णि या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. राजूरा मतदारसंघात 330 मतदान केंद्र, चंद्रपूर मतदारसंघात 383 मतदान केंद्र, बल्लारपूर मतदारसंघात 361 मतदान केंद्र, वरोरा मतदारसंघात 340 मतदान केंद्र, वणी मतदारसंघात 338 मतदान केंद्र तर आर्णि मतदारसंघात 366 मतदान केंद्र असे एकूण 2118 मतदान केंद्र आहेत. या सर्व मतदान केंद्रावर मतदानाचे संपूर्ण साहित्य घेऊन पोलिंग पार्टी रवाना झाल्या आहेत.

टोकन सुविधा : उन्हाचा तडाखा लक्षात घेता मतदान केंद्रावर मतदारांकरीता निवारा / प्रतिक्षालय तयार करण्यात आले आहे. तसेच मतदान केंद्रावर गर्दीची परिस्थिती उद्भवून मतदारांना अडचण होणार नाही, याकरीता टोकन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दिव्यांग व्यक्तिंसाठी उपाययोजना : जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदाराकरीता त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर जिल्हा प्रशासनाकडून मतदारांच्या मदतीकरीता मदतनीस / स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

००००००