Search This Blog

Saturday 6 April 2024

इलेक्टोरल रोल जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिध्द

 

इलेक्टोरल रोल जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिध्द

चंद्रपूर, दि. 6 : मतदान करण्यासाठी पात्र व्यक्तिचे नाव मतदार यादीत असणे अत्यंत आवश्यक आहे.  जिल्ह्यातील मतदारांचे नाव असलेली इलेक्टोरल रोल चंद्रपूर जिल्ह्याच्या chanda.nic.in वर प्रसिध्द करण्यात आली आहे. मतदारांनी आपले नाव यादीत आहे किंवा नाही, ते तपासून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

13 - चंद्रपूर लोकसभा मतदार संघात राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर आणि वरोरा हे चार विधानसभा मतदार संघ तसेच यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि आर्णि विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो. तर ब्रम्हपूरी आणि चिमूर हे चंद्रपूर जिल्ह्यातील मतदार संघ गडचिरोली लोकसभा मतदार संघात समाविष्ट आहेत. चंद्रपूर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघनिहाय सदर इलेक्टोरल रोल संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून सदर यादी संबंधित मतदान केंद्र, तहसील कार्यालय, मतदान नोंदणी अधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुध्दा प्रसिध्द करण्यात आली आहे.

०००००  

No comments:

Post a Comment