Search This Blog

Tuesday 16 April 2024

मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी

 

मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी

Ø अपवादात्मक परिस्थितीत दोन तासांची सवलत

चंद्रपूर, दि. 16 :  निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या 19 एप्रिल या मतदानाच्या दिवशी एकही कामगार मतदानापासून वंचित राहू नयेयासाठी मतदानाच्या दिवशी सर्व कामगारअधिकारीकर्मचारी यांना भरपगारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अपवादात्मक परिस्थितीत ज्या औद्योगिक संस्थाकंपनी बंद ठेवल्याने त्यांचे नुकसान होत असेलतेथील कामगारांना मतदान करण्यासाठी दोन ते तीन तासांसाठी सुट्टी देणे संबंधितांना बंधनकारक असल्याची माहिती सहाय्यक कामगार आयुक्त यांनी दिली आहे.

महाराष्ट्र शासनाचे उद्योगउर्जाकामगार व खनिकर्म विभागशासन निर्णय 5 एप्रिल 2024 अन्वये निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, यासाठी सर्व दुकानेआस्थापनाव्यापारी संस्थाहॉटेलरेस्टारेन्टनाट्यगृहेऔद्योगिक उपक्रमकारखाने किंवा इतर व्यापारी आस्थापना यांच्या व्यवस्थापक मालकांना सुट्टी देणे बंधनकारक आहे. 

            राज्यात तसेच महाराष्ट्र राज्याच्या सिमेलगतच्या भागातील निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांनामग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.  सदर सुट्टी उद्योगऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनाकारखानेदुकाने इत्यादीना लागु राहील, (खाजगी कंपन्या यामधील आस्थापनासर्व दुकाने व इतर आस्थापनानिवासी हॉटेलखाद्यगृहेअन्नगृहेनाट्यगृहेव्यापारऔद्योगिक उपक्रमकिंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्याशॉपिंग सेंटर्समॉल्सरिटेलर्स इत्यादी.)

अपवादात्मक परिस्थितीत कामगारअधिकारीकर्मचारी यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तरमतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन ते तीन तासांची सवलत देता येईलमात्र त्याबाबत आस्थापना व्यवस्थापनास संबंधित महानगरपालिका आयुक्त किंवा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहीलकोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेलयाची दक्षता संबंधित आस्थापना मालकांना घेणे आवश्यक राहील,

मतदारांकडून मतदानाकरीता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनेविरुध्द कारवाई करण्यात येईल. कामगारांना मतदान करण्यास सुट्टी न दिल्यास चंद्रपूर जिल्हयातील कामगारांनी आपली तक्रार सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालयप्रशासकीय इमारततळमजला चंद्रपूर येथे स्थापित केलेल्या नियंत्रण कक्षात प्रत्यक्ष किंवा assttcommrehd@gmail.com या ई-मेलवर करावी, असे सहायक कामगार आयुक्त यांनी कळविले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment