Search This Blog

Tuesday 9 April 2024

धान खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणी सुरू

 धान खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणी सुरू

चंद्रपूर, दि. :  शासकीय आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम 2023-24 मधील जिल्ह्यातील धान /भरडधान्य (मका) खरेदीकरिता NeML पोर्टलवर नोंदणी 25 मार्चपारून सुरू झाली असून 30 एप्रिल 2024 पर्यंत शेतकऱ्यांना या पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे.    

शेतकरी नोंदणी करताना हंगाम 2023-24 पासून ज्या शेतकऱ्याचा 7/12 आहेत्याच शेतकऱ्याचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नोंदणी पूर्ण होणार नाहीत्यामुळे ज्या शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे. त्याच शेतकऱ्यांनी लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी स्वतः खरेदी केंद्रावर उपस्थित राहून दिलेल्या कालावधीत म्हणजे 30 एप्रिल 2024 पर्यंत आपल्या नजिकच्या खरेदी केंद्रावर मुदतीत धान /भरडधान्य (मका) खरेदीसाठी नोंदणी पूर्ण करावी, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment