Search This Blog

Saturday 6 April 2024

नवीन दुचाकी वाहन क्रमांक मालिका लवकरच होणार सुरू


नवीन दुचाकी वाहन क्रमांक मालिका लवकरच होणार सुरू

चंद्रपूर, दि. 6 : प्रादेशिक परिवहन कार्यालयातील परिवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहनांसाठी एमएच 34 सीके-001 ते एमएच सीके-9999 ही नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ज्या वाहनधारकांना आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असेल त्यांचे अर्ज 10 एप्रिल 2024 दुपारी 4 वाजेपर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्वीकारण्यात येतील.

अर्जदारांनी आपल्या पसंतीच्या क्रमांकाच्या अर्जासोबत क्रमांकानुसार विहित केलेले शासकीय शुल्क ( DD उप प्रादेशिक परिवहन अधिकारीचंद्रपूर यांचे नावे) विहीत शुल्काच्या रकमेचा भरणा मालिका सुरू झाल्यावर करून आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक प्राप्त करून घ्यावेत. नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका 10 एप्रिल 2024 पासून सुरू करण्यात येणार आहे. आकर्षक क्रमांकासाठी शुल्क भरल्यावर वाहनाचे कागदपत्र तात्काळ सादर करणे अर्जदारास अनिवार्य राहील. प्राप्त झालेले अर्ज 10 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येऊन त्याच दिवशी अर्जाची छाननी करण्यात येणार आहे.

एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज प्राप्त झाल्यासवाढीव शुल्काच्या धनाकर्षाद्वारे निर्णय घेण्यात येईल. अर्जदारांनी 10 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत एकापेक्षा ज्यास्त अर्ज आले आहेत का याची चौकशी करावी व त्यानुसार वाढीव शुल्काचा धनाकर्ष ( DD ) स्वतंत्र बंद लिफाफ्यातून सादर करणे बंधनकारक राहील. दुपारी 4.30 वाजता बंद लिफाफे उघडण्यात येईल. जास्त रकमेचे धनाकर्ष सादर केलेल्या अर्जदारास सदर क्रमांक देण्यात येईल व उर्वरित धनादेश परत करण्यात येतील. सदर मालिका चालू असतांना वाहन 4.0 प्रणाली कार्यान्वयीत झाल्यानंतर बंद करण्यात येईल, याची नोंद घेण्याचे तसेच पसंतीचा क्रमांक घेण्यास अर्ज करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment