Search This Blog

Saturday 6 April 2024

7 व 8 एप्रिल रोजी नो – पार्किंग व नो हॉकर्स झोन घोषित


 7 व 8 एप्रिल रोजी नो – पार्किंग व नो हॉकर्स झोन घोषित 

चंद्रपूर, दि. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 8 एप्रिल 2024 रोजी मोरवा येथे प्रचार दौरा आयोजित करण्यात आला आहे. सदर सभेकरीता नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याकरिता दिनांक 7 एप्रिलच्या दुपारी 2 वाजता पासून ते 8 एप्रिल 2024 च्या रात्री 8 वाजेपर्यंत मोरवा विमानतळ पासून ते मोरवा टी- पॉईंट-पडोली चौक-वरोरा नाकापर्यंत तसेच मोरवा टी पॉईंट ते साखरवाही फाटा हे दोन्ही मार्ग नो पार्किंग व नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे.

 पंतप्रधानांच्या दौ-याकरीता नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे सदर मार्गावर वाहतूक सुरळीत चालावी, वाहतुकीस कुठल्याही प्रकारचा अरथळा निर्माण होऊ नये व जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र पोलिस अधिनियम - 1951 च्या कलम 33 (1)(ब) नुसार सार्वजनिक ठिकाणी सुरळीत रहदारी व सुव्यवस्था राखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व नियमनासाठी प्राप्त असलेल्या कायदेशीर अधिकारान्वये जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सदर आदेश निर्गमीत केले आहे.

तरी सदर मार्गावर कोणत्याही नागरिकांनी वाहने पार्किंग करू नये तसेच या मार्गावर कोणीही दुकाने / हातठेले लावू नये. नागरिकांनी सदर आदेशाचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे अवाहन असे पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment