Search This Blog

Tuesday 9 April 2024

जिल्हाधिका-यांची मतदान प्रशिक्षण केंद्राला भेट

 

जिल्हाधिका-यांची मतदान प्रशिक्षण केंद्राला भेट

चंद्रपूर, दि. 9 : 71 - चंद्रपूर विधानसभा मतदार संघात नियुक्त मतदान कर्मचा-यांचे दुसरे प्रशिक्षण कॉर्मेल अकॅडमी येथे आयोजित केले होते. या प्रशिक्षण केंद्राला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी भेट देऊन मतदान पथकांना 19 एप्रिल 2024 रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने सूचना दिल्या. 

यावेळी ते म्हणाले, सर्वांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे अचूक कामकाज करावे. उन्हाळा असल्याने आपली स्वतःची व मतदान केंद्रात येणाऱ्या मतदारांची काळजी घ्यावी.  मतदान केंद्रावर लाईटची व्यवस्था, पिण्याचे पाणी, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प आणि व्हीलचेअर आदी बाबी असणे गरजेचे आहे. तसेच तापमान जास्त असल्यामुळे मतदारांना सावलीकरीता पेंडॉलची व्यवथा करण्यात यावी, ईव्हीएम योग्य पध्दतीने हाताळावे, अशा सुचना त्यांनी दिल्या. या प्रशिक्षणात मतदान पथकांना निवडणूक प्रकियेची सविस्तर कायदेशीर माहिती देण्यात आली. तसेच ईव्हीएम हाताळणीसाठी हॅन्डस् ऑन ट्रेनिंग देण्यात आले. मतदान कर्मचा-यांसाठी पोस्टल मतदान कक्ष सुरु होता.

            यावेळी सहा. निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी संजय पवारतहसीलदार विजय पवार, तालुका कृषी अधिकारी भास्कर गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी कोमल मुनेश्वर व त्यांचे पथक आदी उपस्थित होते.

०००००००

No comments:

Post a Comment