Search This Blog

Monday 31 July 2023

प्रधानमंत्री पीक विमा योजनेला 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ


प्रधानमंत्री पीक विमा योजनेला 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Ø पालकमंत्र्यांच्या पत्रावर केंद्रीय कृषी विभागाचा निर्णय

चंद्रपूरदि. 31 : गत आठवड्यात चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले. अनेक गावांचा संपर्क तुटला तर विद्युत, इंटरनेट सेवा खंडीत झाली होती. त्यामुळे शेतक-यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी वेळेत नोंदणी करणे शक्य होणार नाही. ही बाब लक्षात घेत राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय कृषी सचिवांना पत्र लिहिले. या पत्राची दखल घेऊन, प्रधानमंत्री पीक विमा योजनेला आता 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतक-यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतमालाच्या नुकसानीची भरपाई या योजनेंतर्गत शेतक-यांना दिली जाते. त्यासाठी शेतक-यांनी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात गत आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. त्यामुळे शेतक-यांना 31 जुलैपर्यंत पीक विमा योजनेची नोंदणी करता येणार नाही, परिणामी अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता असल्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केंद्रीय कृषी सचिव मनोज अहुजा यांना पत्र लिहिले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नोंदणीची मुदत किमान 15 दिवसांनी वाढवून शेतक-यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली होती. त्यामुळे आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेला 3 ऑगस्टपर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे.               यापूर्वी पीक विमा योजनेंतर्गत एकूण विमा हप्ता रकमेच्या 2 ते 5 टक्के रक्कम शेतक-यांना भरावी लागत होती. त्यामुळे बहुतांश शेतकरी या योजनेत सहभागी होत नव्हते. परिणामी नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टीत नुकसान झाल्यानंतरही शेतक-यांना मदतीपासून वंचित राहावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने शेतक-यांना दिलासा देण्यासाठी केवळ 1 रुपया प्रति अर्ज या नाममात्र दराने प्रधानमंत्री पीक विमा योजना 2023-24 सुरू केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात खरीप 2023-24  या हंगामाकरीता तांदूळ, कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, मूग व उडीद या अधिसुचित पिकांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

            चंद्रपूर जिल्ह्यात खरीप हंगाम 2023 करीता सदर योजना ओरिएन्टल इन्शुरन्स कं. लि. या विमा कंपनी कडुन राबविण्यात येणार आहे. सदर विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक 1800118485 असून ई-मेल pmfby.160000@orientalinsurance.co.in आहे.

अडचण आल्यास यांच्याशी करा संपर्क : प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी नोंदणी करतांना शेतक-यांना काही अडचण आल्यास त्यांनी ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनीच्या संबंधित तालुका समन्वयकांशी संपर्क करावा. सदर कंपनीचे जिल्हा समन्वयक प्रतीक करपेनवार (मो. 8080192076) असून देवानंद रोहनकर (तालुका समन्वयक, चंद्रपूर, मो. 9579808500), निलेश धोपटे (बल्लारपूर, मो. 9881545801), आशिष तुपट (ब्रम्हपुरी, मो. 9588608847), निहाल नागापुरे (सिंदेवाही, मो. 8459735371), रुपेश रोहणकर (मूल, मो. 7972564857), सुरज चौधरी (सावली, मो. 9579957562), तिलकराम चांदेकर (पोंभुर्णा, मो. 7378664440), संदीप बोगेवार (गोंडपिपरी, मो. 7448167282), अमन हजारे (भद्रावती, मो. 8237455338), अभिजीत गोगे (कोरपना, मो. 9022982158), तुषार चौधरी (वरोरा, मो. 8806066795), राकेश गट्टेवार (राजुरा, मो. 9423319383), चंद्रशेखर रेवतकर (चिमूर, मो. 9975026352), सुशांत निकोडे (नागभीड, मो. 8975704125) आणि कुणाल सिडाम (तालुका समन्वयक जिवती, मो. 7887374512) आहेत. अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे कृषी विभागाने कळविले आहे.

००००००

नागरिकांनो ! पूर ओसरल्यावर अशी घ्या काळजी


नागरिकांनो ! पूर ओसरल्यावर अशी घ्या काळजी

चंद्रपूर, दि.31 सध्या पूर परिस्थितीमुळे चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील बरीच गावे बाधीत झाली आहे. पूर ओसरल्यानंतर योग्य प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने खालील सुचना केल्या आहेत.

पूर ओसरल्यावर गावपातळीवर घ्यावयाची काळजी ग्रामपंचायत स्तरावर ब्लिचिंग पावडर साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून ठेवावा. प्रत्येक जलस्त्रोतांचे पाणी नमुने नियमित प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठविण्यात यावे. पूर ओसरल्यानंतर संपूर्ण गावामध्ये ब्लिचिंग पावडरने डस्टिंग करण्यात यावे. दलदल व कचरा साठलेल्या जागी मॅलेथिऑन 5 टक्केची धुरळणी करावी. प्रत्येक जलस्त्रोतांचे शुद्धीकरण करण्यात यावे. पूर ओसरल्यानंतर संपूर्ण गावातील व नाल्यातील पाणी वाहते करण्यात यावे. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताजवळील परिसर स्वच्छता करावी.

गावातील नागरिकांनी पूर ओसरल्यानंतर घ्यावयाची काळजी :

घरात पिण्याचे पाणी घेतांना शक्यतो निर्जंतुकीकरण केलेले पाणी पिण्यासाठी वापरावे. पावसाळ्यातील दिवसात 20 मिनिटे उकळून थंड केलेले पाणी पिण्यासाठी वापरावे. पाणी घेतांना द्विपदरी कपड्याने गाळून पाणी द्यावे. घरातील पिण्याचे पाणी उंच जागेवर ठेवावे. पाणी घेण्यासाठी ओरघड्याचा वापर करावा. पिण्याच्या पाण्यात मेडिक्लोरचा (क्लोरीन द्रावण) व जीवन ड्रॉप चा वापर करावा. पाणी गढूळ असल्यास तुरटीचा वापर करावा. घराभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. घराजवळील डबके बुजवावे. घराशेजारी पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.

किटकजन्य आजारावर करा मात : साधारणत: पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया,जे.ई. हे आजार प्रामुख्याने वाढतात. आजार वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे डासाच्या घनतेत वाढ होते. पावसाळ्यात घराभोवती व परिसरात पाण्याचे डबके तयार होतात. या डबक्यातच डास अंडी टाकतात व डासाची उत्पती होऊन डास घनता वाढते. डेंग्यू, मलेरिया साथीच्या आजारांना रोखायचे असेल तर काळजी घेणे हाच सर्वोत्तम उपचार आहे. यंदा ही साथ वेळीच रोखण्यासाठी नागरिकांनी आतापासून सावध राहावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

पावसामुळे रहिवासी परिसर, गोडाऊन, मोकळ्या जागा, खड्डे या ठिकाणी साठणारी पाण्याची डबकी वेळोवेळी नष्ट करा. पाणी वाहते करा किंवा शक्य नसेल तर ऑइल, केरोसिनचे दोन – चार थेंब नियमित टाका आणि डासाची पैदास टाळावी. पाण्याची सर्व भांडी हवाबंद कापडाने झाकावीतपक्षी, गुरांच्या पाण्याची भांडी साफ करावीत. घरातील कूलर, फ्रीजचे ट्रीप पॅन नियमित साफ करा. एडिस इजिप्ती या डासा पासून डेंग्यूची लागण होते. हा मानवी वस्तीजवळ अधिक आढळतो. भांडी, निरुपयोगी टायर, फुलदाण्या, नारळाच्या करवंडया यासह अन्य ठिकाणी पाणी साठून राहिल्यास एडिस इजिप्ती या डासाची पैदास होते. पावसाळ्यात ही पैदास झपाट्याने होते. त्यामुळे घर, इमारत, परिसरातील  साठलेल्या पाण्याची ठिकाणे रिकामी करावी. ज्या ठिकाणी पाणी साचून अळ्या तयार होण्याची भीती आहे, अश्या वस्तु काढून टाकाव्यात.

दरम्यान घराबाहेर पडतांना किंवा घरात पूर्ण अंग झाकतील, असे कपडे घालावेत. डास चावू नये म्हणून डासरोधक मलम, अगरबत्ती, ई. चा वापर करावा. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. घराच्या खिडक्यांना जाळी बसवावी. अडचणीच्या ठिकाणी किंवा डासाची पैदास होते, अशा ठिकाणी जाणे टाळावे. कुंड्या मध्ये पाणी राहणार नाही याची काळजी घ्यावी, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, असेही आवाहन जि.प.आरोग्य विभागाने केले आहे.

००००००

वरोरा तहसील कार्यालयाच्यावतीने 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह


वरोरा तहसील कार्यालयाच्यावतीने 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह

Ø विविध उपक्रमांतून नागरिकांना सेवा

चंद्रपूर, दि.31 महसूल विभागाकडून देण्यात येणा-या सेवांची माहिती आणि विभागाद्वारे राबविण्यात येणा-या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी वरोरा तहसील कार्यालयाच्यावतीने 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह राबविण्यात येणार आहे.  या कालावधीत विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार आहे.

1 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता बचत भवन, तहसील कार्यालय, वरोरा येथे महसूल दिन व महसूल दिनाचा शुभारंभ करण्यात येईल. यावेळी रक्तदान शिबीर, आदर्श कर्मचारी प्रमाणपत्र वितरण, कलम-155 अंतर्गत 7/12 दुरुस्ती आढावा आणि स्मशानभुमीबाबत आढावा घेण्यात येईल. 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता लोकमान्य कन्या माध्य. विद्यालय, वरोरा येथे ‘युवा संवाद’ कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद, दाखले विषयक मार्गदर्शन व वाटप, निवडणूक नोंदणी व जागृत मतदार मार्गदर्शन, आधारकार्ड अपडेट करणे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

3 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता बचत भवन, तहसील कार्यालय, वरोरा येथे ‘एक हात मदतीचा’ अंतर्गत नैसर्गिक आपत्ती धनादेश वाटप, नागरिकांना 7/12 व 8-अ वाटप, ई-पीक पाहणी व आपत्ती प्रशिक्षण वर्गाचे आयोजन आहे. 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता बचत भवन, तहसील कार्यालय, वरोरा येथे जनसंवाद कार्यक्रमांतर्गत तहसील मुख्यालयी 6 मंडळाचे फेरफार अदालत शिबीर, सलोखा योजनेबाबत माहिती देणे, आपले सरकार पोर्टलवरील तक्रारी निकाली काढणे, मंडळ निहाय एक रस्ता मोकळा करण्याचे नियोजन आहे. 5 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालय, वरोरा येथे ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ अंतर्गत वृक्षारोपन व परिसराची स्वच्छता, आरोग्य तपासणी शिबीर, कार्यासन सुव्यवस्थित करणे, सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक असणारे विविध दाखले व प्रमाणपत्र वितरीत करणे.

6 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता बचत भवन, तहसील कार्यालय, वरोरा येथे महसूल संवर्गातील कार्यरत / सेवानिवृत्त अधिकारी कर्मचा-यांशी संवाद अंतर्गत सेवापुस्तक अद्ययावत करणे, सेवानिवृत्त कर्मचा-यांचे सेवाविषयक बाबी प्रलंबित असल्यास निकाली काढणे. तर 7 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता बचत भवन, तहसील कार्यालय, वरोरा येथे महसूल सप्ताहाचा समारोप करण्यात येणार असल्याचे वरोराचे तहसीलदार योगेश काटकर यांनी कळविले आहे.

००००००

सामाजिक,साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रातील दिशादर्शक व्यक्तिमत्त्व गमावले - ना. सुधीर मुनगंटीवार

 सामाजिक,साहित्यिकशैक्षणिक क्षेत्रातील दिशादर्शक व्यक्तिमत्त्व गमावले - ना. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : सरदार पटेल महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मदनराव धनकर यांच्या निधनाची वार्ता मनाला चटका लावणारी आहे. चंद्रपूरच्या साहित्यिकसामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी दिशादर्शक असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जाण्याने एक व्रतस्थ शिक्षक आणि साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीतील सक्रीय मार्गदर्शक गमावल्याची शोकसंवेदना राज्याचे वनेसांस्कृतिक कार्यमत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

संपूर्ण महाराष्ट्राला चंद्रपूरचा सांस्कृतिक व ऐतिहासिक परिचय व्हावायासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. एक उत्तम अभ्यासकज्येष्ठ साहित्यिक आणि विविध संस्थांचे आधारस्तंभ म्हणून त्यांचा नावलौकीक होता. 2012 मध्ये चंद्रपूर येथे झालेल्या 85 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते कार्याध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वात अखिल भारतातील मराठी साहित्यिकांनी एक उत्तम असे संमेलन अनुभवले.

त्यांच्या निधनामुळे चंद्रपूरच्या सांस्कृतिकसामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहेमी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अशी भावना ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

००००००

Saturday 29 July 2023

जिल्हाधिकाऱ्यांनी केली शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी

 




जिल्हाधिकाऱ्यांनी केली शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी

Ø रहमदनगरमहात्मा ज्योतिबा फुले प्रा. शाळा आणि विठोबा खिडकी परिसराला भेट

चंद्रपूरदि. 29 : चंद्रपूर शहरात गुरुवारी रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नागरी भागात पूरस्थिती निर्माण झाली. अनेक नागरिकांच्या घरात पुराचे पाणी गेल्याने त्या नागरिकांना चंद्रपूर महापालिकेच्या विविध शाळेत स्थलांतरित करण्यात आले. शहरातील या पूरग्रस्त भागाला जिल्हाधिकारी विनय गौडामहानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीपाल यांनी भेट देऊन पुर पिडीत नागरिकांशी संवाद साधला.

जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील रहमत नगर महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक शाळा आणि विठोबा खिडकी या परिसराला भेट देऊन आश्रयास असलेल्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणालेपूरग्रस्त नागरिकांना जिल्हा प्रशासन सर्वतोपरी मदत करेल. नागरिकांनी आश्रय घेतलेल्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचे पाणीभोजन व्यवस्थानिवारा तसेच स्वच्छता अतिशय चांगल्या पद्धतीची असावीअशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

पूर परिस्थितीमुळे आश्रयास असलेल्या नागरिकांची संख्या : चंद्रपूर महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये शहरातील 143 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले असून सद्यस्थितीत एकूण 615 नागरिक आश्रयास ठेवण्यात आले आहे. यात म. ज्योतिबा फुले प्रा. शाळेत 35 कुटुंबनागरिक संख्या 149घुटकाळा येथील किदवाई शाळेत 20 कुटुंबनागरिक संख्या 82लालपेठ येथील माना प्रा. शाळेत 11 कुटूंबनागरीक संख्या 52नागाचार्य मंदिरमहाकाली वार्ड येथे 10 कुटूंबनागरीक संख्या 40महाकाली प्रा. कन्या शाळेत 48 कुटूंबनागरीक संख्या 212,  आणि शहीद भगत सिंह शाळेत 19 कुटूंब,  नागरीक संख्या 80असे एकूण 143 कुटूंबातील 615 नागरिकांचा समावेश आहे.

००००००

Thursday 27 July 2023

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतांना सुरक्षितता आणि नियमांचे पालन आवश्यक



 

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतांना सुरक्षितता आणि नियमांचे पालन आवश्यक

Ø जिल्हाधिका-यांनी घेतली स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक

चंद्रपूर,दि.27 : शाळेत आपल्या पाल्यांचे जाणे-येणे अतिशय सुरक्षित असावे, असे प्रत्येकच पालकांना वाटत असते. ॲटो-रिक्षा असो की खाजगी वाहन किंवा स्कूल बस, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतांना सुरक्षितता महत्वाची असून नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.

नियोजन सभागृह येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे आयोजित स्कूल बस सुरक्षितता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त विपीन पालिवाल, शिक्षणाधिकारी (माध्य) कल्पना चव्हाण, उपशिक्षणाधिकारी अनिता ठाकरे, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्यास सर्व शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, स्कूल बस संघटनेचे प्रतिनिधी, वाहतूक संघटनेचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.

मुलं हे देशाचे भविष्य आहे. देशाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी मुलांची सुरक्षितता महत्वाची आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, वाहनांनी विद्यार्थ्यांचे शाळेत येणे-जाणे सुरक्षित असले पाहिजे. नियमांचे पालन केले तर अपघात टाळता येतात. वाहतूक करणारी शाळेची वाहने चांगल्या अवस्थेत असली पाहिजे. तसेच उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नियमानुसारच ती धावली पाहिजे. स्कूल बस चालविणा-या चालकाने जलदगतीने, अतिशय धोकादायक आणि अपघातास कारणीभूत ठरेल, अशी ड्रायव्हिंग करू नये. तसेच त्याने मद्यप्राशन करून वाहन चालवू नये. याबाबत शाळा व्यवस्थापन, बस चालविणारे चालक आणि पालकांमध्ये योग्य समन्वय ठेवावा. या बैठकीत मिळालेल्या सर्व सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.

तर राज्य परिवहन महामंडळाने शाळेच्या मार्गावरील बसेसची व्यवस्था शाळेच्या वेळापत्रकानुसार ठेवली तर विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. याबाबत परिवहन महामंडळ, उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक शाखेने संयुक्त तपासणी करून याबाबत योग्य निर्णय घ्यावा. वाहतुकीसंदर्भात काही तक्रार असल्यास उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या 7172272555 या क्रमांकावर संपर्क करावा, असे जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी सांगितले.

०००००००

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातंर्गत ‘मेरी माती मेरा देश’ अभियानाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातंर्गत मेरी माती मेरा देश’ अभियानाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

चंद्रपूर, दि. 27 : देशाला स्वांतत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या अंतर्गत जिल्हा प्रशासनाकडून विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात आले. या महोत्सवाचा समारोप म्हणून शासनाने दिलेल्या निर्देशानुसार मेरी माती मेरा देश....मिट्टी को नमन, विरों का वंदन’ हा उपक्रम मोठया उत्साहाने जिल्हाभरात राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सदर उपक्रमाच्या प्रभावी अमंलबजावणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आढावा घेतला.

बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधुमनपा आयुक्त विपीन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे, मनपा उपायुक्त अशोक गराटे, नगर प्रशासन अधिकारी अजितकुमार डोके, नेहरू युवा केंद्राचे समशेर बहादुर यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले,  2021 पासून सुरू झालेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता 15 ऑगस्ट 2023 रोजी होणार आहे. यावर्षी मातीला केंद्रबिंदू ठेवून कार्यक्रम साजरा करण्याच्या शासनाच्या सुचना आहेत.  जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत व तालुक्यातून माती गोळा केली जाणार असून ही माती एकत्रित करत एका कलशातून दिल्लीच्या कर्तव्यपथावर नेली जाणार आहे. तेथे प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या मातीतून ‘अमृतवाटिका’ बाग तयार केली जाणार आहे. जिल्ह्यातील 825 ग्रामपंचायती, 17 नगर परीषद/नगर पंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमाचे आयोजन करावयाचे आहे. शासनाने घालुन दिलेल्या पंचसुत्री अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर व मनपा कार्यक्षेत्रात ध्वज उभारायचा आहे. ध्वजासोबत सेल्फी घेणे, वसुधा वंदन अतंर्गत प्रत्येक गावात वृक्ष लागवड करणे, विरों का वंदन अंतर्गत स्वांतत्र्य सैनिकांना नमन करणे व 15 ऑगस्ट रोजी शिलाफलकम ऊभारून राष्ट्रगिताचे गायन करावयाचे आहे.

जिल्हाधिकारी श्री. गौडा पुढे म्हणाले, देशासाठी बलिदान दिलेले स्वातंत्र्य सैनिक, प्रत्येक सैन्य आणि निमलष्कराशी निगडित लोकांचा व त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात येणार आहे. शिवाय, प्रत्येक गावात 75 झाडे लावण्याचा कार्यक्रमही होणार आहे. शाळा व महाविद्यालयांना तसेच जिल्ह्यातील सामाजिक संस्थाना या उपक्रमात सहभागी करुन घ्यावे. पोलीस विभागाने पोलीस स्टेशन स्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करावे. प्रत्येक गावस्तरावर करण्यात आलेले कार्य पोर्टलवर अपलोड करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. यावर्षी जिल्ह्यातील नागरीकांनी यामध्ये सहभागी होऊन उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी केले आहे.

००००००००

अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना


अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना

 

चंद्रपूर, दि. 27 राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येऊन उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेलहा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन 2023 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भातज्वारीबाजरीमकानाचणी (रागी), तूरमूगउडीदसोयाबीनभुईमुग, सुर्यफुल या पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

पी स्पर्धेची ठळक वैशिष्टे व बाबी :

मूग व उडीद पिकाच्या पीकस्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2023 आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारणगटासाठी रक्कम रु.300 व आदिवासी गटासाठी रक्कम रु. 150 राहील.  स्पर्धेत भाग घेण्‍यासाठी  शेतकऱ्याकडे स्‍वतःच्‍या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे  अनिवार्य आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.

पी स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरीता स्पर्धकास स्वतःच्या शेतावर स्पर्धेकरीता सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पिकांची, भात पिकाच्या बाबतीत किमान 20 आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान 40 आर (1 एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पिकस्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्यजिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे :  

विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), विभागाने  ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, 7/12, 8-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा तसेच बँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत आवश्यक राहिल.

बक्षिसाचे स्वरूप :

सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील पीकनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षीस देण्यात येणार असून यामध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकापातळीवर प्रथम बक्षीस रु. 5 हजार, द्वितीय 3 हजार, तर तृतीय बक्षिस रु. 2 हजार असणार आहे. तर जिल्हा पातळीवर प्रथम बक्षिस रु. 10 हजार, द्वितीय 7 हजार तर  तृतीय बक्षिस रु. 5 हजार असणार आहे. राज्यपातळीवर प्रथम बक्षीस रु. 50 हजार, द्वितीय 40 हजार तर  तृतीय बक्षिस रु. 30 हजार असणार आहे.

खरीप हंगाम सन 2023 पिकस्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, तसेच योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी विभागाचे www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

०००००००

Wednesday 26 July 2023

आता प्रत्येक शासकीय पत्रावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे बोधचिन्ह !

 

आता प्रत्येक शासकीय पत्रावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे बोधचिन्ह !

Ø सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने निर्णय

Ø सर्व शासकीय कार्यालयांच्या दर्शनी भागातही झळकणार बोधचिन्ह

चंद्रपूरदि.26 : आता प्रत्येक शासकीय पत्रावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे बोधचिन्ह लावण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने शासन निर्णयाच्या माध्यमातून जाहीर केला आहे. एवढेच नव्हे तर प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागातही हे बोधचिन्ह झळकणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय पराक्रम शौर्य आणि अतुलनीय कार्याच्या गौरवार्थ आणि स्मरणार्थ राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पकतेचे आणखी एक उदाहरण आता महाराष्ट्राला बघायला मिळणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनानिमित्त ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात सांस्कृतिक कार्य विभाग अनेक वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. त्यात आता शिवरायांचे शौर्य व पराक्रम अधोरेखित करणारे बोधचिन्ह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याच्या अतिशय कल्पक अशा प्रयत्नांना यश आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर पुन्हा एकदा मनामनांत व्हावाजगभरातील प्रत्येक मराठी माणसापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती आणि पराक्रम पोहोचावाया उद्देशातून हा निर्णय घेण्यात आल्याचे 24 जुलैच्या शासन निर्णयात नमूद केले आहे. विशेष म्हणजे प्रत्येक शासकीय कार्यालयाला दर्शनी भागात बोधचिन्ह लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.

श्री. मुनगंटीवार यांच्या कल्पकतेचे कायमच कौतुक होत आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त त्यांनी आयोजित केलेला प्रत्येक उपक्रम अनोखा ठरला. गेट वे ऑफ इंडियाला शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन असो वा रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा असो. प्रत्येक आयोजनातून सांस्कृतिक कार्य विभागाने आपले वेगळेपण सिद्ध केले. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी चंद्रपुरातील सागवान काष्ठ रवाना करण्याचा सोहळा तर अख्ख्या देशाने अनुभवला. तर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये एकमेकांना भेटल्यानंतर वा दूरध्वनीवरील संभाषण सुरू करताना हॅलो ऐवजी वंदे मातरम’ म्हणण्याचा सांस्कृतिक कार्य विभागाचा निर्णय पाळला जात आहे. आता शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या बोधचिन्हाच्या बाबतीत झालेला निर्णय ऐतिहासिक ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

आणखी एक अनोखा उपक्रम : महाराजांच्या काळांतील नाणीगडकिल्लेअष्टप्रधान मंडळ आदी प्रत्येक गोष्ट प्रेरणादायी आहेत. या प्रेरक गोष्टी सर्वांपर्यंत सहजपणे पोहोचविण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यात आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे बोधचिन्ह सर्वदूर पोहोचविण्याच्या निर्णयाची भर पडली आहे.

शिवरायांचा पराक्रम शौर्य अधोरेखित करणारा निर्णय : ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य विभागाची धुरा सांभाळल्यापासून विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या प्रत्येक निर्णयाला कल्पकतेची व संस्कृती रक्षणाची किनार असते. त्यामुळे कुठलाही निर्णय सर्वांचे लक्ष वेधून घेतो आणि कौतुकासही पात्र ठरतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम आणि शौर्य अधोरेखित करणारा निर्णय म्हणून संपूर्ण महाराष्ट्र या निर्णयाकडे कौतुकाने बघत आहे.

००००००

घरकुल योजनेचा निधी लाभार्थ्यांना वेळेवर द्या - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार





घरकुल योजनेचा निधी लाभार्थ्यांना वेळेवर द्या पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

Ø निधी वाटपाबाबत यंत्रणेने समन्वय ठेवण्याचे निर्देश

चंद्रपूरदि. 26 : आपल्या हक्काचे घर असावेहे प्रत्येकाचे स्वप्न असते. या स्वप्नपुर्तीसाठीच केंद्र आणि राज्य सरकारने सर्वांना घरे’ हे प्रमुख उद्दिष्ट ठेवले आहे. घरकुल योजनेनुसार पात्र लाभार्थ्यांना बांधकामाच्या विविध टप्प्यावर निधी उपलब्ध देण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र संबंधित विभागाकडे निधी प्राप्त होऊनही इतर यंत्रणेसोबत समन्वय नसल्याने सदर निधी लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नाहीही गंभीर बाब आहे. याबाबत योग्य समन्वय ठेवून घरकुल योजनेचा निधी लाभार्थ्यांना वेळेवर देण्यासाठी गांभिर्याने कामे करावीतअसे स्पष्ट निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

मुल येथील विश्रामगृहात तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेतांना ते बोलत होत. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडामुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सनसहाय्यक जिल्हाधिकारी मरुगानंथम एम.मूलचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्रामसहाय्यक आयुक्त समाजकल्याण बाबासाहेब देशमुखजिल्हा पुरवठा अधिकारी अजय चरडेतहसीलदार रविंद्र होळी आदी उपस्थित होते.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत चार वर्षात 5461 घरकुल मंजूर झाल्याचे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणालेयासाठी 68.03 कोटींचा निधी आवश्यक होता. यापैकी जिल्ह्याला 34.79 कोटी रुपये प्राप्त झाले. मात्र सामाजिक न्याय विभागगृहनिर्माण विभागजिल्हा परिषद यांच्यात समन्वय नसल्यामुळे सदर निधी लाभार्थ्यांपर्यंत पोहचला नाही. घरकुल योजनेच्या नियमानुसार बांधकामाच्या विविध टप्प्यावर संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा होणे आवश्यक आहे. निधी प्राप्त होऊनही वाटपाबाबत चालढकल करणे ही गंभीर बाब आहेयाची संबंधित यंत्रणेने दखल घेऊन त्वरीत निधी वाटपाचे नियोजन करावेअसे निर्देश त्यांनी दिले.

पुढे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणालेजिल्ह्यात शबरी आवास योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ देण्यासाठी प्रशासनाने त्वरीत सर्व्हे करावामुल तालुक्यातील भगवानपूर येथे 100 टक्के आदिवासी बांधवांना शबरी आवास योजनेतून घरे द्यावीत. केंद्र आणि राज्य शासनाच्या घरकुलसंदर्भात चंद्रपूर जिल्ह्याचे एक मॉडेल विकसीत करावे. गरीब लाभार्थ्यांना घरपोच रेती मिळण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहेअशाही सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

प्रधानमंत्री आवास योजना : मुल नगर परिषद अंतर्गत दोन डीपीआर तयार करण्यात आले आहेत. यात पहिल्या डीपीआर मधील 87 घरकुलांचा समावेश असू 47 घरांना मंजुरी देण्यात आली. यापैकी 35 घरे पूर्ण झाली. तर दुस-या डीपीआर अंतर्गत 73 बांधकामांना मंजुरी देण्यात आली आहे.

जलजीवन मिशन : या अंतर्गत 40 कामे मंजुर असून 35 कामे सुरू आहेत तर 12 पूर्ण झाली आहेत. सदर पाणी पुरवठा योजनेच्या बांधकामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड खपवून घेणार नाही. सदोष बांधकाम आढळल्यास संबंधित कंत्राटदारांना निधी न देण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

ग्रामीण रुग्णालय / उपजिल्हा रुग्णालय : जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतींचे बांधकाम पूर्ण आहेमात्र वीज कनेक्शनमुळे त्या वापरात नाहीअशा इमारतींचा सर्व्हे करून अहवाल सादर करावा. जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांच्या तक्रारी / सुचनांसाठी बॉक्स तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आरोग्य संस्थेला दिले.यावेळी रमाई घरकुलवनहक्क दावेवैयक्तिक दावेघरकुल पट्टे वाटपन.प. अंतर्गत झालेली कामे आदी विषयांचा आढावा घेण्यात आला. बैठकीला मुल तालुक्यातील विविध शासकीय विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

०००००००

जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्तांना 48 तासांच्या आत मदत द्या

 

जिल्ह्यातील  अतिवृष्टी व पूरग्रस्तांना 48 तासांच्या आत मदत द्या

Ø पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकारी यांना आदेश

चंद्रपूर,दि.26 : जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना 48 तासात तातडीने मदत देण्यात यावीअसे आदेश राज्याचे वनसांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्यात यावी] असे निर्देश श्री. ]मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. आपदग्रस्तांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असून कोणीही मदतीपासून वंचित राहू नयेअशा पद्धतीने कार्यवाही करण्याचे निर्देशही श्री. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना अन्नवस्त्र व निवारा याची कमतरता भासणार नाही. याशिवाय त्यांच्या प्राथमिक आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाहीअशा पद्धतीने उपाय करण्याचे आदेशही श्री. मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

शासकीय स्तरावर मदतीचा ओघ सुरू करण्यात आला असून स्थानिक व जिल्हा प्रशासनाने गंभीरतेने मदत व पुनर्वसनाचे कार्य सुरू करावे. या कार्यात कोणताही कसूर ठेवू नयेअसे निर्देशही श्री. मुनगंटीवार यांनी दिले आहेत. अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना करण्यात येणाऱ्या मदतीवर श्री. मुनगंटीवार जातीने लक्ष ठेवून आहेत. आवश्यक त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाचे वेळोवेळी सकारात्मक सूचना देत आहेत. अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या पथकांचे मनोबल वाढवण्याचे कामही श्री. मुनगंटीवार करत आहेत.

००००००

पी.एम. किसान सन्मान निधी 27 जुलै रोजी होणार 14 हप्ता बँक खात्यात जमा



पी.एम. किसान सन्मान निधी  27 जुलै रोजी होणार 14 हप्ता बँक खात्यात जमा

चंद्रपूर, दि. 26 : देशातील अल्पभुधारक शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 1 डिसेंबर 2018 पासून सुरू केलेली असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक रु. 6 हजार रुपये आर्थिक मदत म्हणून देण्यात येत आहे.

सदर योजनेच्या 14 वा हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते  दिनांक 27 जुलै, 2023 रोजी सकाळी 11 वाजता सीकरराजस्थान येथून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमाचे थेट प्रसारण https://pmevents.ncog.gov.in या लिंकच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना बघता येणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यासाठी कृषी विभागाच्यामार्फत तसेच कृषी विज्ञान केंद्रशेतकरी उत्पादक कंपन्याशेतकरी गटफळपीकनिहाय शेतकऱ्यांचे गटआत्मा अंतर्गत स्थापन करण्यात आलेले गटकृषी प्रात्यक्षिके व प्रशिक्षण यामध्ये समाविष्ठ होणारे गटअशा विविध संस्थांमार्फत नियोजन करण्यात आलेले आहे.

या समारंभाच्या माध्यमातून संपूर्ण देशात 8.5 कोटी शेतकऱ्यांना तर महाराष्ट्रातील 85.66 लाख पात्र शेतकऱ्यांना पी. एम. किसान योजनेचा लाभ वितरीत केला जाण्याचा एक ऐतिहासिक क्षण असल्याने या समारंभामध्ये जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावेअसे आवाहन जिल्हा प्रशासनाचे वतीने करण्यात आले आहे.

०००००००

27 जुलै रोजी सर्व अंगणवाड्या, शाळा व महाविद्यालयांना सुट्टी


27 जुलै रोजी सर्व अंगणवाड्या, शाळा व महाविद्यालयांना सुट्टी

Ø अतिवृष्टीच्या पार्श्वभुमीवर आदेश निर्गमित

चंद्रपूर, दि. 27 : चंद्रपूर जिल्‍ह्यात जुलै महिन्यात यापूर्वी अनेक तालुक्‍यात अतिवृष्‍टी होऊन अनेक रस्‍ते पाण्‍याखाली गेल्‍याने व अनेक गावांना पुराचा वेढा पडल्‍याने जनजीवन विस्‍कळित होण्‍याच्‍या घटना घडल्‍या आहेत. भारतीय  हवामान खात्याच्या वर्तवलेल्या अंदाजानुसार 27 जुलै 2023 रोजी चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची  शक्यता आहे.

त्यामुळै कोणत्याही प्रकारची अनुसुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यावर होऊ नये, याकरिता चंद्रपूर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 30 (2)(5) व (18) नुसार प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडीपुर्व प्राथमिक व प्राथमिक शाळाविद्यालये व महाविद्यालये व महाविद्यालये यांना 27 जुलै 2023 रोजी सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे.

मात्र इयत्‍ता दहावी व बारावी पुरवणी परिक्षा वेळापत्रकानूसार सुरू राहतील आणि सर्व निवासी शाळा नियमितपणे सुरू राहतील, याची नोंद घ्यावी. तरी नागरीकांनी भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी व आपात्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षजिल्हाधिकारी कार्यालयचंद्रपूर यांच्या 07172 -251597  आणि 07172- 272480 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

००००००