Search This Blog

Saturday, 15 July 2023

स्पर्धा पूर्व प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना निरोप

 


स्पर्धा पूर्व प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना निरोप

चंद्रपूरदि.15 :  कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचंद्रपूर येथे आदिवासी उमेदवारांकरीता साडेतीन महिन्याचे स्पर्धा पूर्व प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी जिल्हा कोशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमेआदिवासी निरीक्षक अनिल कुंठेवारडाॅ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राध्यापिका स्निग्धा सदाफलेमार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे तसेच प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

यावेळीजिल्हा कोशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्तभैय्याजी येरमे यांनी उमेदवारांनी योग्य संधीचा लाभ घेवून यशापर्यंत पोहचावे असे उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. आदिवासी निरीक्षक अनिल कुंठेवार यांनी आदिवासी वर्गासाठी असलेल्या योजनांबाबत प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना अवगत केले. तर

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राध्यापिका स्निग्धा सदाफले यांनी व्यक्तीचा दृष्टीकोन हा सकारात्मक ठेवून स्वप्न साकार करावे तर मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे यांनी इच्छा आत्मविश्वास सातत्य नियोजन करून धेय्य प्राप्ती करावी असे सांगीतले.

कार्यक्रमाचे संचालन श्री.गराटे व प्रतीक्षा जांभूळे यांनी तर आभार जीवन गेडाम यांनी मानले. यावेळी संजय राठोडसचीन भगतसचीन तिरणकरश्री.गौरकार व श्रीमती डोंगरे आदींची उपस्थिती होती.

प्रशिक्षण घेऊन नोकरी प्राप्त करणाऱ्यांचा सन्मान:

निरोप समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रशिक्षण पूर्ण करून रेल्वे विभागात नौकरी प्राप्त सुनील शेरकुरे यांना सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले. तसेच साडेतीन महिण्यात आयोजित निबंध स्पर्धागट चर्चा स्पर्धाअंतीम परिक्षा उत्तीर्ण उमेदवारांचे बक्षिस देवून मनोबल वाढविण्यात आले.

००००००

No comments:

Post a Comment