Search This Blog

Friday, 7 July 2023

विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव सादर करावे

 विद्यार्थ्यांनी  जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव सादर करावे

चंद्रपूर, दि. 07 :  शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये इयत्ता 12 वी विज्ञान शाखेस प्रवेशित असणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे परिपूर्ण भरलेला अर्ज जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, चंद्रपूर येथे दि. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करावा.

तसेच सत्र 2023-24 मध्ये एमएचटी-सीईटी, नीट, जेईई, एमबीए, बी.एड, पीएचडी, बी.एससी ॲग्री, बी. फार्म, बी.एससी नर्सिंग आदी सीईटी देऊन व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छित असणारे व तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला प्रवेशित असणारे विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घ्यावयाचे आहे अशा अर्जदारांनी तात्काळ अथवा त्यांच्या प्रवेशाच्या कमीत कमी 10 दिवसापूर्वी जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज सादर करावा.

जात वैधता प्रमाणपत्राकरीता ऑनलाईन पदधतीने अर्ज करुन, ऑनलाईन सादर केलेल्या प्रस्तावाची छायांकित प्रत, सीईटी प्रत, मूळ शपथपत्रे फॉर्म नं 3 आणि 17 आणि जातीदावा सिध्द करणारे जातीचे व अधिवासाचे मानीव दिनांकापूर्वीचे (अनुसूचित जातीकरीता 10 ऑगस्ट 1950 पुर्वीचे, विमुक्त जाती व भटक्या जमाती करीता 21 नोव्हेंबर 1961 पुर्वीचे व इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्गाच्या उमदेवारांनी 13 ऑक्टोबर 1967 पुर्वीचे) महसुली आणि शैक्षणिक दस्तऐवजांचे छायांकित प्रती कार्यालात सादर करून  ऑनलाईन भरणा केलेल्या पावतीची पोहोच घ्यावी. उमेदवारांनी आवश्यक दस्ताऐवज सादर  करून  जात  प्रमाणपत्र  पडताळणी  तात्काळ  करून घ्यावी, असे आवाहन समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर यांनी केले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment