नॅनो खत प्रशिक्षण कार्यशाळेत शेतक-यांना होता येणार ऑनलाईन सहभागी
Ø यू-ट्यूब व्दारे थेट प्रक्षेपण
चंद्रपूर, दि. 11 : इंडियन फार्मर फर्टिलायझर कृषी विभाग, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नॅनो खत प्रशिक्षण कार्यशाळा बुधवार दि. १२ जुलै 2023 सकाळी 11 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे यू-ट्यूब द्वारे थेट प्रक्षेपण होणार असून जास्तीत जास्त शेतक-यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
शेतकऱ्यांनी नॅनो युरीया व नॅनो डीएपी वापरल्यास पारंपरीक खतांएवढेच फायदे होणार असून ही खते पारंपरीक खतांच्या तुलनेने स्वस्त असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक बचत होणार आहे. नॅनो युरीया व नॅनो डीएपी हे एक नत्र व स्फूरदयुक्त आधुनिक खत असून पिकांच्या वाढीसाठी व विकासासाठी आवश्यक असणारे घटकांचा पुरवठा करतात. नॅनो युरीयामध्ये नत्राचे कण हे अतिसुक्ष्म असल्यामूळे ते एकसंघ असतात व पृष्ठभागीय क्षेत्रफळ जास्त असल्यामूळे त्याची कार्यक्षमता पारंपरीक युरीयापेक्षा जास्त असते.
तसेच, नॅनो डीएपीपी मध्ये कणांचा आकार 100 नॅनोमीटर पेक्षा कमी असल्याने बियाणे/ मुळांच्या आंत किंवा पानांवर उपलब्ध रंध्रछिद्रातून आणि इतर छिद्रातून सहज प्रवेश करून शकतात. नॅनो डीएपीचा उपयोग “सीड प्रायमर” म्हणून केल्यास बियाण्यांचे लवकर अंकूरण होऊन पिकाची जोमाने वाढ व गुणवत्ता वाढविण्यास सहाय्यक ठरते. नॅनो युरीया व नॅनो डीएपी ही विद्राव्य खते सर्व पिकांकरीता नत्र व स्फूरदाचा उत्तम स्त्रोत असल्याने यांच्या वापराने पिकातील नत्र व स्फूरदाची कमतरता दूर होते. परिणामी, पिकांच्या उत्पादकतेत वाढ होऊन खर्चात बचत होत असल्याने शेतकऱ्यांच्या एकूण आर्थिक उत्पन्नात वाढ होते.
सदर कार्यशाळेस इफकोचे राज्य विपणन व्यवस्थापक उदय तिजारे नॅनो युरिया व नॅनो डीएपी तांत्रिक वापराबाबत मार्गदर्शन करणार आहेत. वरिल कार्यक्रम कृषी विभागाच्या अधिकृत युटयूब चॅनेल व्दारे https://youtube.com/@user-
००००००
No comments:
Post a Comment