Search This Blog

Thursday, 13 July 2023

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजना


संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजना

चंद्रपूर, दि. 13 : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, होलार, मोची आदीच्या) आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी विविध कर्ज योजना राबविल्या जातात. सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता राज्य व केंद्र शासनाच्या एन.एस.एफ.डी.सी.अंतर्गत योजना राबविण्यात येत असून 4800 लाभार्थ्यांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

एन.एस.एफ.डी.सी.,नवी दिल्ली यांच्या मुदती कर्ज योजनेअंतर्गत स्मॉल बिझनेस रु. 1 लाख, 1.50 लाख व 2 लाख, चर्मोद्योग रु. 2 लाख, लघुरुण वित्त योजना व महिला समृद्धी योजना प्रत्येकी 50,000 या योजनांसाठी मागील प्रलंबित नस्तीकरीता 22.21 कोटी इतका निधी प्राप्त झाला आहे. तसेच सन 2023-24 या आर्थिक वर्षात एन.एस.एफ.डी.सी यांच्या मुदती कर्ज योजनेअंतर्गत स्मॉल बिझनेस रु. 5 लाख लघुरुण वित्त योजना व महिला समृद्धी योजना प्रत्येकी रु. 1.40 लाख तसेच नवीन महिला अधिकारीता योजना रु. 5 लाख मंजूर झालेल्या आहेत.

एन.एस.एफ.डी.सी.,यांच्या शैक्षणिक कर्ज योजनेमध्ये वाढ झाली असून भारतामध्ये 20 लाख व विदेशामध्ये 30 लाख रुपयापर्यंत कर्ज मंजूर करण्यात येईल. योजनेच्या अधिक माहितीसाठी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयास भेट द्यावी, असे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक विजयालक्ष्मी मनिरत्न यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment