Search This Blog

Monday 31 July 2023

वरोरा तहसील कार्यालयाच्यावतीने 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह


वरोरा तहसील कार्यालयाच्यावतीने 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह

Ø विविध उपक्रमांतून नागरिकांना सेवा

चंद्रपूर, दि.31 महसूल विभागाकडून देण्यात येणा-या सेवांची माहिती आणि विभागाद्वारे राबविण्यात येणा-या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी वरोरा तहसील कार्यालयाच्यावतीने 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह राबविण्यात येणार आहे.  या कालावधीत विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार आहे.

1 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता बचत भवन, तहसील कार्यालय, वरोरा येथे महसूल दिन व महसूल दिनाचा शुभारंभ करण्यात येईल. यावेळी रक्तदान शिबीर, आदर्श कर्मचारी प्रमाणपत्र वितरण, कलम-155 अंतर्गत 7/12 दुरुस्ती आढावा आणि स्मशानभुमीबाबत आढावा घेण्यात येईल. 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता लोकमान्य कन्या माध्य. विद्यालय, वरोरा येथे ‘युवा संवाद’ कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद, दाखले विषयक मार्गदर्शन व वाटप, निवडणूक नोंदणी व जागृत मतदार मार्गदर्शन, आधारकार्ड अपडेट करणे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

3 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता बचत भवन, तहसील कार्यालय, वरोरा येथे ‘एक हात मदतीचा’ अंतर्गत नैसर्गिक आपत्ती धनादेश वाटप, नागरिकांना 7/12 व 8-अ वाटप, ई-पीक पाहणी व आपत्ती प्रशिक्षण वर्गाचे आयोजन आहे. 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता बचत भवन, तहसील कार्यालय, वरोरा येथे जनसंवाद कार्यक्रमांतर्गत तहसील मुख्यालयी 6 मंडळाचे फेरफार अदालत शिबीर, सलोखा योजनेबाबत माहिती देणे, आपले सरकार पोर्टलवरील तक्रारी निकाली काढणे, मंडळ निहाय एक रस्ता मोकळा करण्याचे नियोजन आहे. 5 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालय, वरोरा येथे ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ अंतर्गत वृक्षारोपन व परिसराची स्वच्छता, आरोग्य तपासणी शिबीर, कार्यासन सुव्यवस्थित करणे, सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक असणारे विविध दाखले व प्रमाणपत्र वितरीत करणे.

6 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता बचत भवन, तहसील कार्यालय, वरोरा येथे महसूल संवर्गातील कार्यरत / सेवानिवृत्त अधिकारी कर्मचा-यांशी संवाद अंतर्गत सेवापुस्तक अद्ययावत करणे, सेवानिवृत्त कर्मचा-यांचे सेवाविषयक बाबी प्रलंबित असल्यास निकाली काढणे. तर 7 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता बचत भवन, तहसील कार्यालय, वरोरा येथे महसूल सप्ताहाचा समारोप करण्यात येणार असल्याचे वरोराचे तहसीलदार योगेश काटकर यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment