Search This Blog

Thursday 6 July 2023

अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांकडून वसतिगृह प्रवेशाकरीता ऑनलाईन अर्ज आमंत्रित

 

अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांकडून वसतिगृह प्रवेशाकरीता ऑनलाईन अर्ज आमंत्रित

चंद्रपूरदि. 07: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचंद्रपूर अंतर्गत असलेल्या आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वस्तीगृहामध्ये सन 2023-24 करीता प्रवेश घेण्यासाठी फक्त अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

ऑनलाइन अर्ज प्री मॅट्रिककनिष्ठ महाविद्यालयपदवीपदविका (डिप्लोमा),  पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी 31 जुलैपर्यंतच अर्ज करता येईल.तर मेडिकल व इंजीनियरिंग विद्यार्थ्यांसाठी 31 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन स्वरूपात अर्ज भरता येईल. तसेच खास बाब अंतर्गत प्रवेशाबाबत लोकप्रतिनिधींच्या शिफारशी दि. 31 ऑगस्ट 2023 पर्यंत या कार्यालयात सादर करता येतील. त्यानंतर आलेल्या शिफारशींचा विचार केला जाणार नाही. याबाबत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावीअसे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी मुरुगानंथम एम. यांनी कळविले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment