भरारी पथकाच्या निरीक्षणाने परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकाराला आळा
चंद्रपूर, दि. 14 : दरवर्षी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयअंतर्गत अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा संपूर्ण राज्यभरात घेण्यात येते. यामध्ये संचालनालय स्तरावरून प्रात्यक्षिक परीक्षेकरीता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना बहुतांश लहान-मोठे खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जोडण्यात येतात आणि त्या परीक्षा केंद्रावर शासकीय प्राचार्यांची नियुक्ती करण्यात येते.
यापूर्वी फार कमी खाजगी औद्योगिक संस्थांना परीक्षेसाठी परीक्षा केंद्र देण्यात येत होते. यावर्षी मात्र, बऱ्याच खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना परीक्षा केंद्र देण्यात आले. प्राचार्य पदाच्या बहुतांश जागा रिक्त आहे व मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे संचालनालय स्तरावरून परीक्षा केंद्रावर खाजगी एम.सी.व्ही.सी शाळेतील पूर्णवेळ शिक्षकांची केंद्राध्यक्ष म्हणजेच केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
भरारी पथकाच्या काटेकोर व शिस्तबद्ध निरीक्षणाने परीक्षेमध्ये होणाऱ्या गैरप्रकाराला वेळीच आळा बसला असून परीक्षा प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे केल्याचा खुलासा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने केला आहे.
०००००००००
No comments:
Post a Comment