Search This Blog

Friday 21 July 2023

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अर्ज आमंत्रित

 

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अर्ज आमंत्रित

       चंद्रपूर, दि.21: जिल्हयात फलोत्पादन व भाजीपाला पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढविण्याकरीता एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजना राबविण्यात येत आहे. फलोत्पादन पिकाचा संशोधन तंत्रज्ञान, प्रसार, काढणीत्तोर तंत्रज्ञान, प्रक्रिया व पणन सुविधा यांच्या माध्यमातुन समुह पध्दतीने सर्वांगीण विकास करणे तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक राहणीमान उंचावणे, पांरपारिक उत्पादन पध्दतीची आधुनिक शास्त्रीय ज्ञानाची सांगड घालुन तंत्रज्ञानाचा विकास व प्रसार आणि प्रचार करणे आदी या योजनेचे उद्दीष्ट आहे.

          एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत पुष्पोत्पादन विकास कार्यक्रम-सुटी फुले, क्षेत्र विस्तार मसाला पिके लागवड-हळद लागवड, मिरची लागवड, ड्रॅगन फ्रृट, सामुहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, फलोत्पादन यांत्रिकीकरण ट्रॅक्टर, पावर टिलर, नॉपसॅक स्प्रे-पंप, संरक्षित शेती-हरीतगृह, शेडनेटगृह, प्लॉस्टीक मल्चिंग, काढणी पश्चात व्यवस्थापन-कांदा चाळ, पॅकहाऊस, एकात्मिक पॅकहाऊस, पुर्वशितकरण गृह, शितखोली, शितगृह, शितसाखळी, शितवाहन, रायपनिंग चेंबर, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, फिरते विक्री केंद्र  इत्यादी घटकाकरीता अनुदान देय आहे.

राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत कांदा चाळ, शेततळे अस्तरीकरण, संरक्षित शेती-हरीतगृह, शेडनेटगृह  व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका (नर्सरी) या बाबीसाठी अनुदान देय आहे.

 शेतक-यांनी https://mahadbtmahait.gov.in. या ऑनलाईन पोर्टलवर जाऊन अर्ज करावेत. ऑनलाईन लॉटरीमध्ये निवड झाल्यानंतरच प्राप्त लक्षांकाच्या मर्यादेत तालुका कृषि अधिकारी, यांच्यामार्फत पुर्वसंमती देण्यात येईल. तसेच अधिक माहितीसाठी संबंधीत तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, चंद्रपूर यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment