Search This Blog

Sunday 30 September 2018

सर्जिकल स्ट्राईक भारताने जगाला दिलेला इशारा आहे: ना.अहीर



चंद्रपूरमध्ये माजी सैनिकांच्या सत्कारात शौर्य दिन साजरा

      चंद्रपूर, दि.29 सप्टेंबर- कोणावर कधीही आक्रमण न करणारा भारत, गरज पडल्यास शत्रूच्या सिमेत घुसून आंतकवादयांचा नायनाट करु शकते, असा धडकी भरवणारा संदेश भारताने सर्जिकल स्ट्राईक माध्यमातून जगाला दिला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांनी आज येथे केले.
            चंद्रपूर येथील आयएमए सभागृहात 29 सप्टेंबर, शौर्य दिनानिमित्त जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर व माजी सैनिक संघटना चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने एका देशभक्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलतांना त्यांनी भारताच्या संयमीवृत्तीचे जबाबदार उत्तर म्हणून सर्जिकल स्ट्राईक पुढील अनेक काळ देशवासियांच्यासह लक्षात राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. भारताला गृहीत धरु नये. शांततावादी असणारा हा देश गरज पडल्यास सिमेमध्ये घुसून शत्रूवर प्रहार करण्याची हिंमत ठेवू शकतो. हा इशारा व त्याची प्रत्यक्ष कृती म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या काळात झालेली ही लष्करी कारवाई आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
            या कार्यक्रमाच्या व्यासपिठावर त्यांनी चंद्रपूरच्या भुमीतून भारत मातेसाठी शहीद झालेल्या सुपूत्रांच्या विरमाता व विरपत्नींचा सत्कार केला. यावेळी व्यासपिठावर ब्रिगेडीयर सुनील गावपांडे, कॅप्टन सोहदा, सुभेदार शंकर मेंगरे शौर्यचक्र प्राप्त,  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थाई समिती सभापती राहुल पावडे, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सिध्दार्थ डांगे, जिल्हा सैनिक कल्याण संघटक व जनमाहिती अधिकारी(निवृत्त) सुभेदार मेजर दिनेशकुमार गोवारे, विजय राऊत यांची उपस्थिती होती. यावेळी श्रीमती व्यंकमा गोपाल भिमनपल्लीवार, श्रीमती छाया बालकृष्ण नवले, श्रीमती पार्वती वसंतराव डाहुले, सुभेदार गणपती मेंगरे या वीरमाता, वीरपत्नी व शौर्यचक्र प्राप्त सैनिकांचे सत्कार करण्यात आले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेशकुमार गोवारे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी बोलतांना आजचा दिवस तमाम भारतीयांसाठी गौरवाचा दिवस असल्याचे प्रतिपादन केले. डॉ.महेशर रेड्डी यांनी सर्जिकल स्ट्राईक मध्ये सहभागी होणे किती कष्टाचे असते, याची माहिती दिली. तर ब्रिगेडीयर सुनील गावपांडे यांनी सर्जिकल स्ट्राईक म्हणजे शत्रूच्या भागात जावून तेथे नेमकी कारवाई करत आंतकवांदी हालचाली करणा-या यत्रणेचा संपूर्ण नायनाट करणे होय. या कार्यवाहीमध्ये सामान्य नागरिकांच्या व तेथील इमारती व अन्य बाबींचे नुकसान न करता केवळ अतिरेकी कार्यवाया करणा-यांचा बिमोड केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नगरसेविका सविता कांबळे यांनी केले.
                                                          0000

Saturday 29 September 2018

हेल्मेट चा वापर करीत युवकांनी वाहतूक नियमांचे पालण करावे : ना.हंसराज अहीर



आरटीओ व राज्य मराठी पत्रकार संघातर्फे हेल्मेट वितरण कार्यक्रम आयोजन
      चंद्रपूर, दि.28 सप्टेंबर - देशाचे शिस्तबध्द युवक म्हणून या शहराला हेल्मेट घालणा-यांचे शहर बनविण्यासाठी युवकांनी वाहतूक नियमांचे पालन करायला हवे. सद्या अपघाताचे प्रमाण वाढत असून दरवर्षी रस्ते अपघात 1 लाखापेक्षा जास्त जीव जात असल्याचे प्रमाण बघता दोन चाकी गडी चालवितांना हेल्मेटचा वापर केल्यास हे प्रमाण कमी करता येते, असे विधान करुन तुम्ही हेल्मेट घालून गाडी चालविण्याची जन जागृती करा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हेल्मेट वाटपाच्या कार्यक्रमात केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांनी केले.
            जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित या कार्यक्रमात केंद्रिय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंम्भर शिंदे, संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.महेश पानसे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. चंद्रपूर शहरातील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय यासह दहा महाविद्यालयाचे 150 विद्यार्थ्यांना हेल्मेट वाटप करण्यात आले. जिल्हा वाहतूक सुरक्षा विभाग, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व शहर वाहतुक पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात हेल्मेट वापरासंबंधी जनजागृती करण्याच्या उद्देशाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हेल्मेट वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला होता. हा कार्यक्रम रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यास प्रेरणा देणार आहे. विशेष करुन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघानी या उपक्रमात आपले सर्वोच्च योगदान दिल्याने त्यांचे मी आभार मानतो, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन पोलीस जनसंपर्क अधिकारी मुंडे यांनी केले. तर प्रास्ताविक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शिंदे यांनी केले. या कार्यक्रमात मोठया प्रमाणात विद्यार्थी व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
            या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.महेश पानसे, कार्याध्यक्ष सुनील बोकडे, जिल्हा संघटक राजु कुकुडे, जिल्हा सरचिटणीस जितेंद्र चोरडीया, विनोद दुर्गे, सुनील पाटील, धम्म प्रकाश देवगडे, कवेश कष्टी इत्यादींनी परिश्रम घेतले.
                                                           000

Friday 28 September 2018

बंदच्या काळात नागरिकांना औषधींचा पुरवठा करण्याचे औषध विक्रेत्यांना आवाहन

चंद्रपूर,दि.27 सप्टेंबर- ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट ॲन्ड ड्रगीस्ट यांनी 28 सप्टेंबर 2018 रोजी औषध दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सर्व केमिस्टना बंद मागे घेवून नियमितपणे औषध दुकाने सुरु ठेवून नागरिकांची गैरसोय होणार नाही याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.
तथापि, औषध दुकाने बंद राहिल्यास या  दिवशी नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने औषधांचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जिल्हयातील शासकीय रुग्णालये, सामान्य रुग्णालये व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद व नगर परिषद यांच्या अधिनस्त असलेल्या रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध करुन ठेवण्यात आला आहे. त्यामधून गरजू रुग्णांना औषधांचा पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच खाजगी रुग्णालयांनी सुध्दा रुग्णांना औषध पुरविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.
जिल्हयातील नागरिकांनी बंदच्या दिवशी अन्न व औषध प्रशासन, नवीन प्रशासकीय इमारत चंद्रपूर दूरध्वनी क्र.07172-255612 वर औषधीसाठी संपर्क सावाधा. त्याचप्रमाणे जिल्हयातील पुढील औषध विक्रेत्यांकडे आवश्यकतेनुसार औषधे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने संपर्क करण्यात यावा. चंद्रपूर येथील अमृत फार्मशी-9096095648, जन औषधी मेडीकल-9423116266, अंजनेय मेडिकल-9075011830, चिंतावार मेडिकल-9423388788, भालचंद्र मेडिकल-9420867743, ओम श्री साई मेडिकल-9850599876 व प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र-9404862446,  संजय मेडिकल घुग्गुस-9850369097, बल्लारपूर मधील ए.वन मेडिकोज-9890368784, जलाराम मेडीकल-9422146414, विराट जेनेरीक स्टोअर्स-8698759595, राजूरा येथे हितेश मेडीकल स्टोअर्स-9049969411, श्री साई कृपा मेडीकल-9822878573, कोरपना रेणूका मेडीकल-7083795950 व गुरुदेव मेडीकल-8007513657, जिवती देशमुख मेडीकल स्टोअर्स-9881013685 व कदम मेडीकल स्टोअर्स-9689060620, पोंभूर्णा ओम साई मेडीकल-9545904650 व श्री साई मेडीकल-9823982350, गोंडपिपरी सचिन मेडीकल स्टोअर्स-9421728385 व श्री गुरुदेव मेडीकल-9923681356, भद्रावती अमृत मेडीकल-9850738755 व श्री साई कृपा मेडीकल-9921666400, वरोरा गजानन मेडीकल-8888495323 व गौरकार मेडीकल-9422874425, चिमूर शिवकृपा मेडीकल-9421721256 व श्रावक मेडीकल-7066519451, मूल जगदम्बा मेडीकल -9422839238, साई समर्थ मेडीकल-9421813799 व भाग्यश्री मेडीकल-9637270708, सिंदेवाही सरोज मेडीकल-9423608483 व गुरुकृपा मेडीकल-9403110392, सावली पुजा मेडीकल-9422191804 व व्यंकटेश मेडीकल-9657738400, नागभिड हनुमान मेडीकल-9423116015 व बोरकर मेडीकल-9423638561, ब्रम्हपूरी कांबळे मेडिकल स्टोअर्स-9420210978 व चिन्मय मेडीकल-9158920708 इत्यादी मेडीकल मध्ये जिल्हयातील नागरिकांनी औषधीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन चंद्रपूर येथील अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.
                                                            000

Thursday 27 September 2018

2011 ते 2017 पर्यंतचे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याचे शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि.27  सप्टेंबर - जिल्हयातील सर्व महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या  अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याचे शिष्यवृत्तीफ्रिशिपचे व शिक्षण शुल्कचे  सन 2011 ते 2017 पर्यंतचे ऑनलाईन भरलेले अर्ज महाविद्यालय पातळीवर अथवा सहाय्यक आयुक्तसमाज कल्याण यांचेकडे मोठया प्रमाणात प्रलंबित आहेत. याबाबत महाविद्यालयांना वारंवार कळवूनही अर्ज महाविद्यालयीन स्थरावर प्रलंबित ठेवण्यात येत आहेत. सदर अर्जाची पूर्तता करण्यासाठी महाईस्कॉल पोर्टल काही मर्यादीत कालावधीकरीता सुरु करण्यात आली  आहे.
            परंतु अद्यापही मोठया प्रमाणात अर्ज प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी त्यांच्याकडे असलेले सर्व प्रकारचे प्रलंबित अर्ज 6 ऑक्टोंबर 2018 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय चंद्रपूर यांचेकडे ऑनलाईन सादर करण्यात येवून सदर अर्जाची प्रत व त्यासंबंधीचे सर्व कागदपत्राच्या प्रतीसह अर्ज  समाज कल्याण कार्यालय येथे सादर करण्यात यावे. यानंतर प्रलंबित असणारे सर्व अर्ज संगणक प्रणालीतून काढून टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व महाविद्यालयांनी याची नोंद घ्यावी, असे सहायक आयुक्त यांनी कळविले आहे.
                                                                             000000

प्रधानमंत्री जन आरोग्य या योजनेच्या माध्यमातून गावागावात उत्तम आरोग्याचे आंदोलन राबवा : ना.मुनगंटीवार




ना.अहिरना. मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत
चंद्रपूरमध्ये आयुष्यमान योजनेचा शानदार शुभारंभ

चंद्रपूर दि 23 सप्टेंबर : ज्या देशाचे आरोग्य उत्तम असेल त्या देशाच्या प्रगतीला कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे आयुष्यमान भारत या योजनेच्या माध्यमातून गावागावात उत्तम आरोग्याचे आंदोलन राबवण्याचे आवाहन राज्याचे वित्तनियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रांची येथे या योजनेचे लोकार्पण केले. त्याचवेळी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ना.मुनगंटीवार यांच्यासह केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत एका भव्य व शानदार कार्यक्रमाचे आयोजन आज नियोजन भवनात करण्यात आले.
           चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदमेडिकल कॉलेज ,महानगरपालिकाजिल्हा आरोग्य यंत्रणास्थानिक जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय,इंडीया मेडीकल असोशीएशन  यासह संपूर्ण आरोग्य यंत्रणा, वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर यांच्या लक्षणीय उपस्थितीत रांची येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण नियोजन भवनात दाखविण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या योजनेसंदर्भातील भाषणानंतर उपस्थित मान्यवरांच्याहस्ते गोल्डन ई-कार्डचे वितरण देखील करण्यात आले. या योजनेमध्ये चंद्रपूर जिल्हयातील  2 लाख 74 हजार कुटूंब येणार आहे.
दुपारी साडेबारा वाजता पासून सुरू झालेला कार्यक्रम चार वाजेपर्यंत सुरू होता. या कार्यक्रमाला ना.सुधीर मुनगंटीवारकेंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिरवनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेलजिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळेचंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर,आमदार नानाभाऊ शामकुळेआमदार ॲड. संजय धोटेसभापती ब्रिजभूषण पाझारे सभापती अर्चना  जिवतोडेस्थायी समितीचे अध्यक्ष राहुल पावडे ,जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार,आयुक्त संजय काकडे ,अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी सचिन कलंत्रेअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारेवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मोरे आदी उपस्थित होते 
 यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले कीसर्वांसाठी आरोग्य या उद्दिष्टपूर्तीसाठी आयुष्यमान भारत योजना महत्त्वपूर्ण पाऊल आहे. सध्याची उपलब्ध स्थिती म्हणजे 80 टक्के लोकांसाठी 20 टक्के तोकडी आरोग्य यंत्रणा आहे. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून खासगी आरोग्य यंत्रणा देखील सामान्य लोकांच्या सेवेत येणार आहे. ही योजना राज्यातील दुर्गम ,आदिवासी भागातील बांधवांसाठी उपयोगाची ठरणार आहे. महाराष्ट्रात या योजने सोबतच महात्मा फुले जन आरोग्य योजनाही एकत्रित राबविली जाणार आहे.त्यामुळे जवळपास सगळ्या लोकांना आरोग्य विम्याचे कवच मिळणार आहे. या सर्व उपक्रमासाठी आवश्यकता पडली तर आकस्मिक निधीतून पैसे देऊ असे ,आपण आरोग्य विभागाला सांगितले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
             यावेळी त्यांनी आरोग्यशिक्षण ,पेयजल याकडे आपण लक्ष वेधल्याचे सांगितले. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राला निधी उपलब्ध केला आहे.जिल्ह्यांमध्ये अत्याधुनिक मेडिकल कॉलेजची इमारत उभी राहत आहे .या भागातील नागरिकांना उत्तम प्रतीचे उपचार मिळावे यासाठी टाटा ट्रस्ट च्या मदतीने कॅन्सर हॉस्पिटल उभे राहत आहेत. शिर्डीच्या साईसंस्थानच्या मार्फत जिल्ह्यांमध्ये एमआरआय मशीन मिळाली आहे. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ॲम्बुलन्स उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. पुढील सहा महिन्यात आणखी नव्या ॲम्बुलन्स दिल्या जातील,असेही त्यांनी सांगितले.
          जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निवृत्ती राठोड यांनी 30 खाटांचे आयुष केंद्र उभारण्याचा प्रस्ताव पुढे ठेवला आहे. याबाबतही आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी नव्या यंत्रणेमध्ये उभ्या राहणाऱ्या वेलनेस सेंटर मध्ये चंद्रपूरच्या वेलनेस सेंटरचे वेगळेपण ठासून उठून दिसायला हवे असेही आरोग्य यंत्रणेला बजावले.
            यावेळी बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहिर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेमुळे भारताच्या या योजनेची जगभरात चर्चा होईल व यातून ग्रामीण भारताच्या आरोग्याचा प्रश्न सुटेल अशी आशा व्यक्त केली. आजचा दिवस देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या सोबत ही योजना सुरू होत असल्यामुळे महाराष्ट्रासाठी ही योजना अधिक उपयोगी ठरणार असल्याचे ते म्हणाले. देशभरात दहा कोटी लोकांना याचा लाभ होणार आहे. आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा आहे. त्यामुळे या व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी समर्पित होऊन या योजनेचा यशस्वीतेसाठी प्रयत्न करावा,असे आवाहनही त्यांनी केले. समाजातील वंचित घटकाला लक्षात ठेवून या योजनेची रचना करण्यात आली आहे. राज्यात आयुष्यमान भारत योजना सोबतच महात्मा फुले जन आरोग्य योजना ही एकत्रित राबवली जाणार आहे. त्यामुळे जवळपास 90 टक्के लोकांना याचा लाभ मिळणार आहे ,असेही त्यांनी सांगितले
            यावेळी आमदार नानाभाऊ श्यामकुळे यानीदेखील संबोधित केले .एका महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ आज असून आम्ही सगळे त्याचे साक्षीदार असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी केले. तर आभार प्रदर्शन जिल्हा आरोग्य अधिकारी  प्रकाश  साठे  यांनी  केले. कार्यक्रमाचे  संचालन  सोनाली  रासपायले  यांनी  केले.
            यावेळी कार्यक्रमासाठी जनआरोग्य, संसर्गजन्य, आरोग्य ‍नियंत्रण, ‍ जिल्हा हिवताप, अर्ष, जिल्हा क्षय रोग, सिकल सेल, नर्सिग, आदि विभागाने ‍ परीश्रम घेतले नियोजन भवनात लावण्यात आलेली आरोग्य  प्रदर्शनी  व नर्सिग  विभागाच्या विद्यार्थीनीनी  आयोजीत संदेश मोहिम उल्लेखनीय ठरली
000‍

Wednesday 26 September 2018

अण्णासाहेब पाटील यांना कौशल्य विकास विभागात आदरांजली


द्रपूर, दि.25 सप्टेंबर  दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या 85 व्या जयंतीनिमित्त आज जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्ग केंद्र चंद्रपूर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके तसेच सहाय्यक संचालक भैयाजी येरमे, अण्णासाहेब पाटील समन्वयक अमीरन पठाण आणि कार्यालयाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
            या प्रसंगी मान्यवराच्या हस्ते अण्णासाहेब पाटील याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिण्यात आली.  यावेळी सहायक संचालक भैय्याजी येरमे यांनी अण्णासाहेब पाटील यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने अण्णासाहेब पाटील महामंडळ स्थापन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमानुसार मागासप्रवर्गातील तरुणांना जे उद्योजक बनू इच्छितात व तशी क्षमता असलेल्या तरुण वर्गाला सक्षम बनविण्याच्या दृष्टीने छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान अंतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या.मुंबईमार्फत येणा-या योजना जसे, वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना,  गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज योजना यांची माहिती दिली. समाजातील सर्वस्तरातील नागरिकांनी प्रशासकीय भवन, रुम नं.6 मधील कौशल्य विकास विभागात सुरु असलेल्या या योजनेच्या अंमलबजावणीची माहिती दिली.
                                                               0000

चंद्रपूरच्या ज्युबली हायस्कूलमध्ये गावाकडच्या गुणवंतांचा बोलबाला लोकराज्यवर आयोजित स्पर्धा परीक्षेत ग्रामीण विद्यार्थ्यांनी रोवला झेंडा



चंद्रपूर दि.25 सप्टेंबर  महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांना घडविणाऱ्या चंद्रपूरच्या ज्युबिली हायस्कूलने आपली गुणग्राहकता सुरूच ठेवली आहे. या शाळेमध्ये आजही गरीब परिस्थितीतून वाटचाल करणाऱ्या ग्रामीण भागातल्या गुणवान विद्यार्थ्यांची चलती आहे. नव्हे या शाळेने अशा गुणवान विद्यार्थ्यांना आपल्या मायेची उब दिली आहे. नुकत्याच झालेल्या एका सामान्य ज्ञान स्पर्धेत या शाळेतील ब्रह्मपुरी, नागभीड, केळझर येथील गरीब विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय गेल्या महिन्याभरात लोकराज्य वाचक अभियान राबवित आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये आपले भवितव्य घडविणाऱ्यांच्या विश्वात लोकराज्य या पुस्तकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सप्टेबर 2018लोकराज्य अंकावर ज्युबिली हायस्कूलमध्ये सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. हल्ली मुलांचे वाचन कमी झाले आहे. अशी ओरड होत असताना 200 विद्यार्थ्यांना लोकराज्यचे वाचन करण्याचे सांगण्यात आले. दोन दिवसानंतर नववी ते बारावी या वयोगटातील विद्यार्थ्यांचा सामान्य ज्ञान तपासणारी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेमध्ये ब्रह्मपरी येथील वैष्णवी सोनटक्के तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली. नागभीड येथील अंजली खोबरागडे दुसऱ्या क्रमांकावर राहिली आणि केळझर येथील देवानंद भेंडारे हा पहिल्या क्रमांकावर आला. विशेष म्हणजे ही सर्व मुले आपल्या नातेवाईकांकडे राहून ज्युबिली हायस्कूल मध्ये शिकत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थी घडवणाऱ्या हायस्कूलने  विद्यादानाचे काम मात्र तन्मयतेने सुरू आहे. या सर्व मुलांना 90 टक्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. तर त्यांच्या खालोखाल तेजस्विनी दुपारे, अखिलेश पडवेकर, प्रज्येती रामटेके, कादंबरी काळेरोशनी सोनावणेकरण पोले यांनीही स्पर्धत मुसंडी मारली आहे.
         
शाळेचे प्राचार्य रवींद काळबांडे यांच्या मार्गदर्शनात मंजुषा मोरेपुष्पा कोटेवार, टि.के. खान, हेमावती धनेवार, व्ही.एम. तोडासे संगीता घोडेस्वार, कोमल वालदे, वैशाली परसोडकर यांनी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयासोबत लोकराज्य प्रश्न मंजुषा कार्यक्रमाला संपन्न केले.
                                                00000

चंद्रपूरच्या लाडक्या नेतृत्वाला अखेरचा निरोप शांताराम पोटदुखे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


चंद्रपूर, दि.24 सप्टेंबर- कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, राजकारण, समाजकारण, पत्रकारिता आदी सर्व क्षेत्रात उल्लेखनिय योगदान मागे ठेवत. ज्येष्ठ काँग्रेस नेते देशाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री शांताराम पोटदुखे आज अनंतात विलीन झाले. आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास बिनबा गेट शांतीवन येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.  चारवेळा चंद्रपूरचे खासदार राहीलेल्या या लोकनेत्याला हजारोच्या समुदायानी साश्रूनयनांनी निरोप देण्यात आला.
            चंद्रपूर शहराच्या विकासासाठी सतत झटणा-या या अजात शत्रूच्या व्यक्तिमत्वाच्या अंत्ययात्रेमध्ये सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी सकाळपासून साईमंदिर सिव्हील लाईन स्थित घरामध्ये चंद्रपूरकरांची रिघ लागली होती. वटवृक्ष झालेल्या शैक्षणिक संस्था आणि हजारोच्या आयुष्यात आपल्या कर्तृत्वाने बदल घडवून आणणा-या या हसतमुख व्यक्तिमत्वाला निरोप देण्यासाठी सर्व वयोगटातील अनेक पिढयांनी सिव्हील लाईन परिसरात गर्दी केली होती. दुपारी 12 नंतर  सजवलेल्या रथातून शहराच्या मुख्य मार्गावरुन अंत्ययात्रा काढण्यात आली.
            23 सप्टेंबर रोजी दुपारी 3.23 मिनीटांनी नागपूरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांची प्राण ज्योत मालवली. मृत्यूसमयी त्यांचे वय 86 वर्षे होते. त्यांनी 1980 ते 1984, 1984 ते 1988, 1989 ते 1991, 1991 ते 1996 असे सलग चारवेळा लोकसभेमध्ये चंद्रपूर जिल्हयाचे प्रतिनिधीत्व केले. पी.व्ही.नरसिंहराव सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. डॉ.मनमोहनसिंग हे अर्थमंत्री होते. तर त्यांच्यासोबत अर्थराज्यमंत्री म्हणून शांताराम पोटदुखे यांनी काम बघितले. त्याच्या पश्चात पत्नी सुधा, मुलगा भरत, स्नुषा रमा गोळवलकर, मुलगी भारती चवरे, जावई व नातवंड असा मोठा परिवार आहे.
  राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या निधनाचे वृत्त आल्यानंतर आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले. त्यांनी रात्री मुंबईला निघण्याचा दौरा रद्द केला. रात्री त्यांनी निवासस्थानी जावून भेट दिली. केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांनी देखील आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले. राज्य शासनातर्फे जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी त्यांना पुष्पचक्र अर्पण केले. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी देखील 11 वाजताच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन घेतले. जिल्हा परिषदचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, आमदार नानाभाऊ शामकुळे, आमदार ॲड.संजय धोटे, काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलीया, माजी खासदार नानाभाऊ पडोळे, आमदार विजय वडेट्टीवार, माजी मंत्री संजय देवतळे, माजी मंत्री रंजीत देशमुख, माजी खासदार विजयराव मुडे, माजी खासदार सुरेश वाघमारे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर, माजी नगराध्यक्ष गयाचरण त्रिवेदी आदी मान्यवर उपस्थित होते.


विदर्भाच्या विकासासाठी धडपडणारा नेता हरपला
मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री  शांताराम पोटदुखे यांच्या निधनाने विदर्भाच्या सर्वांगीण  विकासासाठी झटणारा एक महत्त्वाचा नेता आपण गमावला आहेअशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतातश्री. पोटदुखे यांनी  सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ व सरदार पटेल मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात अभियांत्रिकीविज्ञानकलावाणिज्यसमाजकार्यविधी महाविद्यालयांचे एक  मोठे शैक्षणिक जाळे विणले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन वेळा यशस्वी करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. त्यासोबतच विदर्भातील विविध साहित्यविषयक  उपक्रमात त्यांचा सातत्याने पुढाकार होता. सक्रिय राजकारणापासून दूर झाल्यानंतरही ते समाजकारण,सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात अखेरपर्यंत सक्रिय होते. त्यांच्या निधनाने विदर्भाच्या विकासासाठी प्रयत्नशील असणारा एक प्रमुख नेता आपण गमावला आहे.
शांतारामजी पोटदुखे यांच्या निधनाने
आम्ही अजातशत्रू व्यक्तीमत्व गमावले  ना.मुनगंटीवार यांची शोक संवेदना

माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री श्री शांतारामजी पोटदुखे यांच्या निधनाने आम्ही अजातशत्रू व्यक्तीमत्व गमावले असल्याची शोकसंवेदना राज्याचे वित्तनियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
       शांतारामजींनी चंद्रपूर -गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. हे जिल्हे शैक्षणिक दृष्ट्या संपन्न करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. माझे आणि शांतारामजींचे नाते राजकारणापलीकडचे होते . मी लोकसभेच्या दोन निवडणुका त्यांच्या विरोधात लढविल्या. त्यांच्याच सरदार पटेल महाविद्यालयाचा मी विद्यार्थी होतो. मात्र प्रचारादरम्यान त्यांनी नेहमीच माझे कौतुक केले. जेव्हाही मी नवी दिल्लीत गेलो तेव्हा त्यांनी मला कधीही इतरत्र थांबू दिले नाही .आपल्या निवासस्थानावावर थांबायला लावले आपल्या गाडीतून मला संसद भवनात नेले. मी त्यांना नेहमी काका म्हणायचो माझ्या वडिलांचे ते उत्तम मित्र होते. नेहमीच त्यांनी माझ्यावर मुलासारखे प्रेम केले. राजकीय मतभेदाच्या भिंती बाजूला सारून नेहमीच कौतुकाची आशीर्वादाची थाप त्यांनी कायम माझ्या पाठीवर ठेवली. त्यांच्या निधनाने राजकिय सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. परमेश्वर त्यांच्या पुण्यात्म्याला शांती प्रदान करो असेही त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
                                                            0000

मलेरिया, डेंगू, स्क्रब टायफस आदी किटकजन्य आजारावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करा : ना.मुनगंटीवार


जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली उच्चस्तरीय बैठकमोहीम राबविण्याचे निर्देश

            चंद्रपूर दि.18 सप्टेंबर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विविध इस्पितळात व सरकारी रुग्णालयांमध्ये मलेरियाडेंग्यू व अन्य किटकजन्य आजार वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणेला सोबत घेऊन या आजारावर नियंत्रण मिळविणारी मोहीम सक्रियतेने राबवावीअसे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले. मुंबईवरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलतांना त्यांनी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना याबाबतचे निर्देश दिले आहेत.
            जिल्ह्यामध्ये किटकजन्य आजार नियंत्रण करणे गरजेचे असल्याचे वातावरण तयार झाले असून काही लोकांना डेंगू सदृश्य आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय हिवताप लागण झालेल्या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यामधील वेगवेगळ्या क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी ग्रामीण व शहरी भागांमध्ये यासंदर्भातील उपाययोजना आखण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्र्यांनी आजच्या बैठकीत केले. आजार पसरू नये यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, आजार ज्यांना झाला असेल त्यांच्यावर उपचार करणाऱ्या उपाययोजना आणि आजार होऊ नये यासाठी सार्वत्रिक स्वरूपात करायच्या प्रसिद्धी मोहिमेला आखण्याचे आवाहन ना.मुनगंटीवार यांनी आजच्या बैठकीत केले.
जिल्हाधिकार्‍यांनी घेतली बैठक
            पालक मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या संबोधनापूर्वी जिल्‍हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी जिल्ह्यातील किटकजन्य आजाराबाबत सद्यस्थिती जाणून घेतली. पावसाळा संपण्यापूर्वी जिल्ह्यामध्ये मलेरियाडेंग्यू आणि स्क्रब टायपस या आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यामध्ये एकही रुग्ण औषधोपचार मिळाला नाही असा असता कामा नयेअसे त्यांनी या यंत्रणेला बजावले. तसेच गरिबातील गरीब केवळ पैसे नाहीत म्हणून कुठल्याही औषध उपचाराअभावी गंभीर होणार नाही याची काळजी घ्यावीअसेही त्यांनी सांगितले. यासोबतच जिल्ह्यातील जनतेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा लाभ घ्यावा. जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये मलेरिया, डेंगू व अन्य आजाराबाबत इलाज करणारा प्रशिक्षित वर्ग असून सर्व सुविधा जिल्ह्याच्या सामान्य रुग्णालयांमध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालयात देण्याइतपत पैसे नाही म्हणून कोणीही उपचाराविना राहू नयेअसे आवाहनही त्यांनी यावेळी केले.जिल्हा सामान्य रुग्णालयात यासंदर्भात मोफत सर्व सुविधा उपलब्ध केल्या असून जनतेने यासाठी या सुविधांचा वापर करावाअसे आवाहनही त्यांनी केले आहे.
            यावेळी त्यांनी जिल्ह्यांमध्ये हिवताप, डेंग्यू, चिकून गुनिया,, स्क्रब टायफस आदी आजाराबाबत जिल्हाभरात खाजगी व शासकीय रुग्णालयांमध्ये करण्यात आलेल्या रुग्ण संख्येच्या माहिती घेतली. कीटकजन्य शास्त्रीय सर्वेक्षण करण्यात आलेल्या गावांची संख्या व त्याबाबतच्या अहवाल याबद्दलही चौकशी केलीया आजारासाठी आवश्यक असणाऱ्या प्रतिबंधित उपाय योजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना जागरुक करावे व गरज पडल्यास अस्वच्छता ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
            शासकीय यंत्रणा एकीकडे उपाय योजना करीत असताना नागरिकांनी देखील आपले स्वच्छतेचे कर्तव्य निष्ठेने पार पडणे आवश्यक असल्याचे आवाहन त्यांनी केलेडास मारण्यावर उपायोजना, गप्पी मासे पैदास केंद्रमध्ये वाढ करणे, मच्छरदाणीचा मोठ्या संख्येने वापर करणे, स्वच्छता मोहिमेची आखणी करणे, शिक्षकांची व पंचायतराज सदस्यांची कार्यशाळा घेणे, प्रसिद्धी साहित्य वाटप करणे आदी उपाययोजना करण्याबाबत आरोग्य यंत्रणेला सांगितले
            या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकरचंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.साठे,  जिल्हा हिवताप हत्तीरोग अधिकारी डॉ.अनिल कुकडपवार महानगरपालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अंजली आंबटकर, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडेपालकमंत्र्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय इंगोले या सहा आरोग्य यंत्रणेतील अनेक अधिकारी उपस्थित होते.
                                                                        000