चंद्रपूर, दि.27 सप्टेंबर - जिल्हयातील सर्व महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याचे शिष्यवृत्ती, फ्रिशिपचे व शिक्षण शुल्कचे सन 2011 ते 2017 पर्यंतचे ऑनलाईन भरलेले अर्ज महाविद्यालय पातळीवर अथवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे मोठया प्रमाणात प्रलंबित आहेत. याबाबत महाविद्यालयांना वारंवार कळवूनही अर्ज महाविद्यालयीन स्थरावर प्रलंबित ठेवण्यात येत आहेत. सदर अर्जाची पूर्तता करण्यासाठी महाईस्कॉल पोर्टल काही मर्यादीत कालावधीकरीता सुरु करण्यात आली आहे.
परंतु अद्यापही मोठया प्रमाणात अर्ज प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी त्यांच्याकडे असलेले सर्व प्रकारचे प्रलंबित अर्ज 6 ऑक्टोंबर 2018 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय चंद्रपूर यांचेकडे ऑनलाईन सादर करण्यात येवून सदर अर्जाची प्रत व त्यासंबंधीचे सर्व कागदपत्राच्या प्रतीसह अर्ज समाज कल्याण कार्यालय येथे सादर करण्यात यावे. यानंतर प्रलंबित असणारे सर्व अर्ज संगणक प्रणालीतून काढून टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व महाविद्यालयांनी याची नोंद घ्यावी, असे सहायक आयुक्त यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment