द्रपूर, दि.25 सप्टेंबर – दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या 85 व्या जयंतीनिमित्त आज जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्ग केंद्र चंद्रपूर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके तसेच सहाय्यक संचालक भैयाजी येरमे, अण्णासाहेब पाटील समन्वयक अमीरन पठाण आणि कार्यालयाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या प्रसंगी मान्यवराच्या हस्ते अण्णासाहेब पाटील याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिण्यात आली. यावेळी सहायक संचालक भैय्याजी येरमे यांनी अण्णासाहेब पाटील यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने अण्णासाहेब पाटील महामंडळ स्थापन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमानुसार मागासप्रवर्गातील तरुणांना जे उद्योजक बनू इच्छितात व तशी क्षमता असलेल्या तरुण वर्गाला सक्षम बनविण्याच्या दृष्टीने छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान अंतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या.मुंबईमार्फत येणा-या योजना जसे, वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज योजना यांची माहिती दिली. समाजातील सर्वस्तरातील नागरिकांनी प्रशासकीय भवन, रुम नं.6 मधील कौशल्य विकास विभागात सुरु असलेल्या या योजनेच्या अंमलबजावणीची माहिती दिली.
No comments:
Post a Comment