Search This Blog

Thursday 27 September 2018

प्रधानमंत्री जन आरोग्य या योजनेच्या माध्यमातून गावागावात उत्तम आरोग्याचे आंदोलन राबवा : ना.मुनगंटीवार




ना.अहिरना. मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत
चंद्रपूरमध्ये आयुष्यमान योजनेचा शानदार शुभारंभ

चंद्रपूर दि 23 सप्टेंबर : ज्या देशाचे आरोग्य उत्तम असेल त्या देशाच्या प्रगतीला कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे आयुष्यमान भारत या योजनेच्या माध्यमातून गावागावात उत्तम आरोग्याचे आंदोलन राबवण्याचे आवाहन राज्याचे वित्तनियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रांची येथे या योजनेचे लोकार्पण केले. त्याचवेळी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ना.मुनगंटीवार यांच्यासह केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत एका भव्य व शानदार कार्यक्रमाचे आयोजन आज नियोजन भवनात करण्यात आले.
           चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदमेडिकल कॉलेज ,महानगरपालिकाजिल्हा आरोग्य यंत्रणास्थानिक जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय,इंडीया मेडीकल असोशीएशन  यासह संपूर्ण आरोग्य यंत्रणा, वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर यांच्या लक्षणीय उपस्थितीत रांची येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण नियोजन भवनात दाखविण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या योजनेसंदर्भातील भाषणानंतर उपस्थित मान्यवरांच्याहस्ते गोल्डन ई-कार्डचे वितरण देखील करण्यात आले. या योजनेमध्ये चंद्रपूर जिल्हयातील  2 लाख 74 हजार कुटूंब येणार आहे.
दुपारी साडेबारा वाजता पासून सुरू झालेला कार्यक्रम चार वाजेपर्यंत सुरू होता. या कार्यक्रमाला ना.सुधीर मुनगंटीवारकेंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिरवनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेलजिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळेचंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर,आमदार नानाभाऊ शामकुळेआमदार ॲड. संजय धोटेसभापती ब्रिजभूषण पाझारे सभापती अर्चना  जिवतोडेस्थायी समितीचे अध्यक्ष राहुल पावडे ,जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार,आयुक्त संजय काकडे ,अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी सचिन कलंत्रेअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारेवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मोरे आदी उपस्थित होते 
 यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले कीसर्वांसाठी आरोग्य या उद्दिष्टपूर्तीसाठी आयुष्यमान भारत योजना महत्त्वपूर्ण पाऊल आहे. सध्याची उपलब्ध स्थिती म्हणजे 80 टक्के लोकांसाठी 20 टक्के तोकडी आरोग्य यंत्रणा आहे. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून खासगी आरोग्य यंत्रणा देखील सामान्य लोकांच्या सेवेत येणार आहे. ही योजना राज्यातील दुर्गम ,आदिवासी भागातील बांधवांसाठी उपयोगाची ठरणार आहे. महाराष्ट्रात या योजने सोबतच महात्मा फुले जन आरोग्य योजनाही एकत्रित राबविली जाणार आहे.त्यामुळे जवळपास सगळ्या लोकांना आरोग्य विम्याचे कवच मिळणार आहे. या सर्व उपक्रमासाठी आवश्यकता पडली तर आकस्मिक निधीतून पैसे देऊ असे ,आपण आरोग्य विभागाला सांगितले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
             यावेळी त्यांनी आरोग्यशिक्षण ,पेयजल याकडे आपण लक्ष वेधल्याचे सांगितले. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राला निधी उपलब्ध केला आहे.जिल्ह्यांमध्ये अत्याधुनिक मेडिकल कॉलेजची इमारत उभी राहत आहे .या भागातील नागरिकांना उत्तम प्रतीचे उपचार मिळावे यासाठी टाटा ट्रस्ट च्या मदतीने कॅन्सर हॉस्पिटल उभे राहत आहेत. शिर्डीच्या साईसंस्थानच्या मार्फत जिल्ह्यांमध्ये एमआरआय मशीन मिळाली आहे. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ॲम्बुलन्स उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. पुढील सहा महिन्यात आणखी नव्या ॲम्बुलन्स दिल्या जातील,असेही त्यांनी सांगितले.
          जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निवृत्ती राठोड यांनी 30 खाटांचे आयुष केंद्र उभारण्याचा प्रस्ताव पुढे ठेवला आहे. याबाबतही आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी नव्या यंत्रणेमध्ये उभ्या राहणाऱ्या वेलनेस सेंटर मध्ये चंद्रपूरच्या वेलनेस सेंटरचे वेगळेपण ठासून उठून दिसायला हवे असेही आरोग्य यंत्रणेला बजावले.
            यावेळी बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहिर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेमुळे भारताच्या या योजनेची जगभरात चर्चा होईल व यातून ग्रामीण भारताच्या आरोग्याचा प्रश्न सुटेल अशी आशा व्यक्त केली. आजचा दिवस देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या सोबत ही योजना सुरू होत असल्यामुळे महाराष्ट्रासाठी ही योजना अधिक उपयोगी ठरणार असल्याचे ते म्हणाले. देशभरात दहा कोटी लोकांना याचा लाभ होणार आहे. आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा आहे. त्यामुळे या व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी समर्पित होऊन या योजनेचा यशस्वीतेसाठी प्रयत्न करावा,असे आवाहनही त्यांनी केले. समाजातील वंचित घटकाला लक्षात ठेवून या योजनेची रचना करण्यात आली आहे. राज्यात आयुष्यमान भारत योजना सोबतच महात्मा फुले जन आरोग्य योजना ही एकत्रित राबवली जाणार आहे. त्यामुळे जवळपास 90 टक्के लोकांना याचा लाभ मिळणार आहे ,असेही त्यांनी सांगितले
            यावेळी आमदार नानाभाऊ श्यामकुळे यानीदेखील संबोधित केले .एका महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ आज असून आम्ही सगळे त्याचे साक्षीदार असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी केले. तर आभार प्रदर्शन जिल्हा आरोग्य अधिकारी  प्रकाश  साठे  यांनी  केले. कार्यक्रमाचे  संचालन  सोनाली  रासपायले  यांनी  केले.
            यावेळी कार्यक्रमासाठी जनआरोग्य, संसर्गजन्य, आरोग्य ‍नियंत्रण, ‍ जिल्हा हिवताप, अर्ष, जिल्हा क्षय रोग, सिकल सेल, नर्सिग, आदि विभागाने ‍ परीश्रम घेतले नियोजन भवनात लावण्यात आलेली आरोग्य  प्रदर्शनी  व नर्सिग  विभागाच्या विद्यार्थीनीनी  आयोजीत संदेश मोहिम उल्लेखनीय ठरली
000‍

No comments:

Post a Comment